Actor Rohit Basfore Death: 'फॅमिली मॅन 3' फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, जंगलात फिरायला जातोय सांगून घरातून गेला, रात्री मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांना फोन आला
Actor Rohit Basfore Death: 'फॅमिली मॅन' तिसऱ्या सीझनमधल्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. कुटुंबानं मात्र अभिनेत्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे.

Family Man Season 3 Actor Rohit Basfore Death: मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) मुख्य भूमिकेत असलेली वेब सीरिज 'फॅमिली मॅन' (Family Man Season 3) फार गाजली. 'फॅमिली मॅन'च्या (Family Man) तिसऱ्या सीझनमधल्या आपल्या दमदार भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता रोहित बासफोर (Actor Rohit Basfore) याचा मृत्यू झाला आहे. रविवारी संध्याकाळी रोहित आपल्या मित्रांसोबत आसामच्या गर्भांगा जंगलात फिरायला गेला होता. त्यानंतर तो थेट मृतावस्थेत आढळून आला. कुटुंबानं अभिनेत्याची हत्या झाल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोहित बासफोर त्याच्या मित्रांसह जंगलात फिरायला गेला होता. आसामचा रहिवासी रोहित काही महिन्यांपूर्वी त्याच्या गावी परतला होता. रविवारी दुपारी अभिनेता मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यासाठी दुपारी 12:30 च्या सुमारास तो घराबाहेर पडला. घरातून निघताना त्यानं त्याच्या कुटुंबाला सांगितलं की, तो एका सहलीला जात आहे. रात्री होत आली तरी, रोहित घरी परतला नाही. त्यानंतर कुटुंबानं त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याच्याशी काहीच संपर्क होऊ शकला नाही. त्यानंतर रोहितच्या एका मित्राचा त्याच्या कुटुंबीयांना फोन आला. त्यानं जंगलात रोहितचा अपघात झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली. तसेच, त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, रुग्णालयात पोहोचताच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं.
रोहितच्या शरीरावर जखमांच्या खुणा
अभिनेता रोहितच्या आकस्मिक निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यानंतर कुटुंबानं एसडीआरएफशी संपर्क साधला. त्यानंतर एसडीआरएफनं रोहितचा मृतदेह ताब्यात घेतला आणि तो तपासणीसाठी पाठवला. रोहितच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा आढळल्याची पुष्टी पोलिसांनी केली आहे. रोहितचं शवविच्छेदन गुवाहाटी मेडिकल कॉलेज रुग्णालयात करण्यात आलं. शवविच्छेदन अहवालात रोहितच्या शरीरावर अनेक जखमा होत्या, ज्यामध्ये त्याच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर अवयवांवर गंभीर जखमा आढळून आल्या.
कुटुंबीयांचा चार जणांवर संशय
रोहित बासफोरच्या कुटुंबीयांना रोहितचा अपघात झालेला नसून घातपात झाला असल्याचा संशय आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्याचा अलिकडेच पार्किंगवरुन वाद झाला होता आणि रणजीत बासफोर, अशोक बासफोर आणि धरम बासफोर या तीन लोकांपासून त्यांच्या जीवाला धोका असल्याचं रोहित म्हणाला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. रोहितच्या कुटुंबीयांनी जिम मालक अमरदीपचं नावही घेतलं, ज्यानं रोहितला पिकनिकसाठी बोलावलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणाचा तपास सध्या सुरू असून चार आरोपी फरार असल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























