Entertainment News Live Updates 'मेड इन हेवन 2' सीरिजचा ट्रेलर रिलीज

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 01 Aug 2023 05:07 PM
OMG2 Trailer: ओएमजी-2 चा ट्रेलर उद्या होणार रिलीज

 OMG2 Trailer:  नुकतीच अक्षय कुमारनं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अक्षयनं लिहिलं, 'विश्वास रखने के लिए आभार, ओएमजी-2 चा ट्रेलर उद्या रिलीज होणार आहे.'





'Chandu Champion' सिनेमातील कार्तिक आर्यनचा फर्स्ट लूक आऊट!

Kartik Aaryan Film Chandu Champion First Look : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनच्या (Kartik Aaryan) आगामी 'चंदू चैंपियन' (Chandu Champion) या सिनेमातील फर्स्ट लूक आऊट झाला आहे. हा क्रीडा विषयक सिनेमा असून या सिनेमात अभिनेत्याच्या एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे.





Vaishali Mhade : मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे : वैशाली माडे

Vaishali Mhade : लोकप्रिय गायिका वैशाली माडे (Vaishali Mhade) सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मुळे (Saregamapa Little Champs) चर्चेत आहे. 'सारेगमप' या लोकप्रिय कार्यक्रमाची वैशाली स्पर्धक होती. आता 'सारेगपम लिटिल चॅम्प्स' या कार्यक्रमाचं परीक्षण करताना ती दिसणार आहे. दरम्यान "मी संगीत निवडलं नाही, तर संगीताने मला निवडलं आहे", असं वक्तव्य वैशाली माडेने केलं आहे. 

Made In Heaven 2 trailer: लग्न, ड्रामा आणि इमोशन्स; बहुप्रतिक्षित 'मेड इन हेवन 2' सीरिजचा ट्रेलर रिलीज

Made In Heaven 2 trailer मेड इन हेवन (Made In Heaven)  या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मेड इन हेवन ही सीरिज  2019 मध्ये प्रदर्शित झाली. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. नुकताच मेड इन हेवन-2 (Made In Heaven 2) या सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Angus Cloud : हॉलिवूड अभिनेता एंगस क्लाउडचं वयाच्या 25 व्या वर्षी निधन

Angus Cloud Passed Away : हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. हॉलिवूड अभिनेता आणि 'यूफोरिया' (Euphoria) फेम एंगस क्लाउडचं निधन (Angus Cloud) झालं आहे. वयाच्या 25 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्याने अभिनेत्याने प्राण सोडले आहेत. 

Dada Kondke Birth Anniversary : 'दादांची दादगिरी'; दादा कोंडकेंच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना गोल्डन ज्युबिली सिनेमे पुन्हा पाहायला मिळणार

Dada Kondke Birth Anniversary Special : मराठमोळे अभिनेते दादा कोंडके (Dada Kondke) यांची 8 ऑगस्टला 91 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना त्यांचे गाजलेले सिनेमे पाहायला मिळणार आहेत. दादांच्या विनोदाच्या सरी येत्या 6 ऑगस्टपासूनच बरसणार आहेत. 


Dada Kondke Birth Anniversary : 'दादांची दादगिरी'; दादा कोंडकेंच्या जयंतीनिमित्त प्रेक्षकांना गोल्डन ज्युबिली सिनेमे पुन्हा पाहायला मिळणार

Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉस फेम राकेश बापट रुग्णालयात दाखल; फोटो शेअर करत दिली चाहत्यांना माहिती

Raqesh Bapat Hospitalised: बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) फेम अभिनेता राकेश बापट (Raqesh Bapat)  हा सध्या त्याच्या हेल्थमुळे चर्चेत आहे.  राकेशनं नुकताच हॉस्पिटलमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करुन त्यानं चाहत्यांना माहिती दिली की, तो रुग्णालयात दाखल झाला आहे. राकेशला का रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे? याबाबत त्यानं कोणतीही माहिती अजून चाहत्यांना दिलेली नाही.



Mitali Mayekar Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीकडे गुड न्यूज? अभिनेत्रीने एबीपी माझाला दिली माहिती

Mitali Mayekar Siddharth Chandekar : मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत (Siddharth Chandekar) लग्नबंधनात अडकली आहे. आता त्यांच्या लग्नाच्या दोन वर्षांनंतर अभिनेत्री आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्रीच्या एका पोस्टमुळे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. पण अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर आई-बाबा होणार नसल्याचं अभिनेत्रीने एबीपी माझासोबत बोलताना स्पष्ट केलं आहे.  


Mitali Mayekar Siddharth Chandekar : सिद्धार्थ-मितालीकडे गुड न्यूज? अभिनेत्रीने एबीपी माझाला दिली माहिती

Sai Lokur: तमन्ना भाटियाच्या गाण्यावर थिरकली सई लोकूर; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले, 'वजन कमी कर...'

Sai Lokur: बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो आणि व्हिडीओ सई सोशल मीडियावर शेअर करते. नुकताच सईनं अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या (Tamannaah Bhatia)  कावाला  (Kaavaalaa) या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी सईला ट्रोल केलं आहे.



Akshay Kumar : ओह माय गॉड... खिलाडी कुमारचा 'OMG 2' फक्त प्रौढांनाच पाहता येणार? नेमकं प्रकरण काय?

Akshay Kumar OMG 2 : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'ओह माय गॉड 2' (OMG 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. सेन्सॉरने या सिनेमातील तब्बल 20 दृश्यांवर कात्री लावली आहे. पण आता सेन्सॉरने या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट दिलं आहे. त्यामुळे 11 ऑगस्टला हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


Akshay Kumar : ओह माय गॉड... खिलाडी कुमारचा 'OMG 2' फक्त प्रौढांनाच पाहता येणार? नेमकं प्रकरण काय?

Kangana Ranaut Reviews Oppenheimer: 'सर्वात महत्वाचा चित्रपट...'; 'ओपनहाइमर'चं कंगनाकडून तोंडभरुन कौतुक, शेअर केला व्हिडीओ

Kangana Ranaut Reviews Oppenheimer:  'ओपनहाइमर' (Oppenheimer) या चित्रपटाचं सध्या देशभरात कौतुक होत आहे. ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan) दिग्दर्शित  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. ओपनहाइमर या चित्रपटाचं अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून कौतुक करत आहेत. नुकताच अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) देखील एक खास व्हिडीओ शेअर करुन ओपनहाइमर या चित्रपटाचं  कौतुक केलं आहे.



Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने चार दिवसांत पार केला 50 कोटींचा टप्पा

Rocky Aur Rani Ki Prem Kahani Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. वीकेंडला चांगली कमाई केल्यानंतर आता या सिनेमाने रिलीजच्या चार दिवसांत 50 कोटींचा टप्पा पार केला आहे. 


Rocky Aur Rani Ki Prem Kahani : आलिया-रणवीरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ने चार दिवसांत पार केला 50 कोटींचा टप्पा; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...

Kiara Advani Sidharth Malhotra : सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्विमिंग करताना दिसली कियारा आडवाणी; पाहा व्हिडीओ

Kiara Advani Sidharth Malhotra : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीने नुकताच 31 वा वाढदिवस साजरा केला आहे. वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओने चाहत्यांसह नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्विमिंग करताना दिसत आहे. 



Kaun Banega Crorepati : 'ज्ञानदार, धनदार आणि शानदार...' कौन बनेगा करोडपती 15 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; प्रोमो आऊट

Kaun Banega Crorepati : 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाची अर्थात 'कौन बनेगा करोडपती 15'ची (Kaun Banega Crorepati 15) चाहत्यांना उत्सुकता आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Ghoomer motion poster: अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांच्या 'घुमर' चं पोस्टर आलं प्रेक्षकांच्या भेटीस


Ghoomer motion poster:  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अभिनेता अभिषेक बच्चनच्या (Abhishek Bachchan) आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतेच  अभिषेकने त्याच्या घूमर (Ghoomer) या  आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेत्री सैयामी खेर (Saiyami Kher) देखील दिसत आहे. अभिषेकनं शेअर केलेल्या घूमर या चित्रपटाच्या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


Jawan Song Zinda Banda: शाहरुखचा जबरदस्त डान्स आणि डॅशिंग लूक; 'जवान' मधील 'जिंदा बंदा' गाणं रिलीज


Jawan Song Zinda Banda:  अभिनेता शाहरुख खानच्या  (Shah Rukh Khan)  जवान  (Jawan)  या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. या प्रीव्यूमध्ये शाहरुखचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. आता या जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा'  (Zinda Banda) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यामध्ये शाहरुख हा अनेक डान्सर्ससोबत डान्स करताना दिसत आहे.
'जिंदा बंदा' या गाण्यात शाहरुखसोबतच सान्या मल्होत्रा, प्रियामणी, गिरिजा ओक, संजीता भट्टाचार्य या अभिनेत्री देखील थिरकताना दिसत आहेत. या गाण्यामध्ये शाहरुख हा रेड शर्ट ब्लॅक पँट आणि गॉगल अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. गाण्याच्या शेवटच्या भागात शाहरुख हा व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पँट अशा लूकमध्ये दिसतो.  'जिंदा बंदा' या गाण्याची कोरिओग्राफी प्रसिद्ध कोरिओग्राफर शोबीनं केली आहे.


Ashok Saraf : अशोक सराफ यांनी केला ज्येष्ठ रंगकर्मींचा कृतज्ञता सन्मान; म्हणाले,"ही मदत नव्हे भेट"


Ashok Saraf : अष्टपैलू अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नुकताच 75 वा वाढदिवस साजरा झाला असून त्यानिमित्ताने त्यांचं 'मी बहुरूपी' हे पुस्तक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या पुस्तकातून मिळालेला निधी त्यांनी वयोवृद्ध कलावंत आणि रंगमंच तंत्रज्ञ यांना दिला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.