Entertainment News Live Updates 8 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Aug 2022 06:29 PM
Yog Yogeshwar Jai Shankar : 'योगयोगेश्वर जय शंकर' मालिकेचा होणार रक्षाबंधन विशेष भाग

'योगयोगेश्वर जय शंकर' (Yog Yogeshwar Jai Shankar) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेचा खास रक्षाबंधन विशेष भाग होणार आहे. तर पावनीच्या भूमिकेत सृष्टी पगारे दिसणार आहे. 

Kaun Banega Crorepati : 21 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर धुलीचंद अग्रवाल खेळणार 'कोन बनैगा करोडपतीचा खेळ

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी होण्याची गेल्या 21 वर्षांपासून प्रतीक्षा करत होतो. 'कौन बनेगा करोडपती'च्या मंचावर येणं हे माझं स्वप्न होतं, असे धुलीचंद अग्रवाल म्हणाले. धुलीचंद यांनी तीन लाइफलाइन न घेता 50 लाख जिंकले आहेत. त्यामुळे आता ते 75 लाख जिंकणार का याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. 





Brahmastra : 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील 'देवा देवा' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Ranbir Kapoor Brahmastra New Song Deva Deva : Brahmastra : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'केसरिया' (Kesariya) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. या गाण्याने अनेक रेकॉर्ड केले. आता या सिनेमातील 'देवा देवा' (Deva Deva) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 

Karthikeya 2 : 'कार्तिकेय 2'चा ट्रेलर आऊट

Karthikeya 2 Trailer Launch : 'कार्तिकेय' (Karthikeya) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक या सिनेमाच्या सीक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. 'कार्तिकेय' हा सिनेमा 2014 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या सिनेमाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 

Shah Rukh Khan: सेल्फी काढायला आलेल्या व्यक्तीवर वैतागला शाहरुख; आर्यननं केलं असं काही, वेधलं अनेकांचे लक्ष

पाहा व्हिडीओ:



50 लाखांच्या प्रश्नासाठी आमिर खानला घ्यावी लागली ‘लाईफलाईन’ची मदत! तुम्हाला माहितीये का या प्रश्नाचं उत्तर?

‘केबीसी 14’च्या पहिल्या भागामध्ये आमिर खान, मेजर डीपी सिंह आणि कर्नल मिताली मधुमिता यांच्यासोबत प्रश्नोत्तरांचा खेळ खेळण्यात आला. दोघांनी मिळून अतिशय अवघड प्रश्नांची उत्तरे दिली, पण 50 लाखांच्या प्रश्नावर त्यांचा खेळ अडकला. उत्तर माहित नसल्याने त्यांना लाईफलाईनची मदत घ्यावी लागली. प्रश्न असा होता की, यापैकी कोणत्या भारतीय राष्ट्रपती जोडीने एकमेकांना भारतरत्न प्रदान केले आहे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी चार पर्याय देण्यात आले होते होते. 1) एस राधाकृष्णन- व्हीव्ही गिरी, 2) व्हीव्ही गिरी- झाकीर हुसेन, 3) झाकीर हुसेन- प्रतिभा पाटील, 4) राजेंद्र प्रसाद- एस राधाकृष्णन.


या प्रश्नाचे अचूक उत्तर होते पर्याय क्रमांक चार म्हणजेच राजेंद्र प्रसाद- एस राधाकृष्णन.

Delhi Crime Season 2 : 'दिल्ली क्राइम 2' चा दमदार ट्रेलर रिलीज; शेफाली शाह उलगडणार मर्डर मिस्ट्री?

Delhi Crime Season 2 : ओटीटीवरील 'दिल्ली क्राईम' (Delhi Crime) या वेब सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या सीरिजचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'दिल्ली क्राईम 2'च्या ट्रेलरमध्ये दिसत आहे की, शेफाली शाहला  (Shefali Shah) या सिझनमध्ये मर्डर मिस्ट्रीचा उलगडा करावा लागणार आहे.


पाहा ट्रेलर: 


Masoom Sawaal Controversy: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो, ‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या मेकर्सविरोधात गुन्हा दाखल!

'मासूम सवाल' हा हिंदी चित्रपट सॅनिटरी पॅडवर भगवान कृष्णाचा फोटो दाखवल्याच्या दृश्यामुळे वादात सापडला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्याच्या पोलिसांनी चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय, त्यांचे प्रोडक्शन हाऊस आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमविरोधात एफआयआर नोंदवला आहे.


 





‘शाहरुख खानच्या ज्या ऑफिसमधून हाकलंल, आज तिथेच माझी वाट पाहिली जातेय!’, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत!

फैसल शेखसोबत आमिरनं रिक्रिएट केला 'अंदाज अपना अपना' मधील हा सिन; पाहा व्हिडीओ

Laal Singh Chadhha : नागार्जुन यांनी पाहिला 'लाल सिंह चड्ढा' ; म्हणाले, 'हा चित्रपट तुम्हाला हसवेल आणि रडवेलही...'

Laal Singh Chadhha : नुकतेच 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chadhha) या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करण्यात आले. या  स्क्रिनिंगला चिरंजीवी, एस एस राजामौली, पुष्पा चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार आणि सुपरस्टार नागार्जुन यांनी हजेरी लावली. चित्रपट पाहिल्यानंतर आता नागार्जुन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



ओळखा पाहू 'ही' कोण?


'या' महिन्यात होणार आलियाची डिलिव्हरी!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्ट चार महिन्यांची गरोदर असून, डिसेंबरच्या अखेरीस ती आपल्या बाळाला जन्म देऊ शकते.


 





जोडी एक नंबर! ‘लाफ्टर क्वीन’ भारती सिंहचं पती हर्षसोबत रोमँटिक फोटोसेशन

Priyanka Chopra : प्रियंका चोप्रानं शेअर केला फॅमिली फोटो


रशियन अभिनेत्यासोबत जमली आयुषी टिळकची जोडी, ‘पोर ब्युटीफुल’मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

अभिनेता सुयश टिळकची (Suyash Tilak) पत्नी अभिनेत्री आयुषी टिळक (Aaysuhi Tilak) पहिल्यांदाच ‘पोर ब्युटिफुल’ (Por Beautiful ) या म्युझिक व्हिडीओमधून आपल्या भेटीस आली आहे. ‘दादला बुलेवाला’ या गाण्याला मिळालेल्या यशानंतर सिग्नेचर ट्युन्सनं एबी एंटरटेन्मेंटच्या सहकार्यानं निर्मिती केलेल्या या म्युझिक व्हिडीओमध्ये स्टीफन ब्लाझेंको हा रशियन अभिनेताही पहिल्यांदाच मराठी म्युझिक व्हिडीओमध्ये चमकत आहे.


 


गिरणी कामगाराच्या लेकाने अवघं मनोरंजन विश्व गाजवलं! वाचा दादा कोंडके यांच्याबद्दल...

मराठी मनोरंजन विश्वात अनेक विनोदी कलाकार होऊन गेले. पण, या विनोदी कलाकारांच्या यादीत नेहमीच अग्रक्रमी राहिले ते नाव म्हणजे दादा कोंडके (Dada Kondke). अभिनेते दादा कोंडके यांनी प्रेक्षकांना नुसतंच हसवलं नाही, तर त्यांचं भरपूर मनोरंजन देखील केलं. त्यांचे हावभाव, त्त्याची भाषा, पेहराव आणि चित्रपटांची हटके नावं यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले. विषय कोणताही असो, तो आपल्याला हवा तसाच वळवायचा आणि तो समोरच्याला विनोदाच्या माध्यमातून अतिशय मार्मिक भाषेत पटवूनही द्यायचा, यात त्यांची हातोटी होती. केवळ अभिनयच नाही, तर त्यांनी दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपले नशीब आजमावले होते.


वाचा संपूर्ण बातमी

सलमान खान विरोधात केस लढलेल्या वकिलाच्या गाडीची ऑन ड्युटी जवानाला धडक, अपघातात जवानाचा मृत्यू

राजस्थानच्या जोधपूरमध्ये भरधाव गाडीने एका पोलीसाला धडक दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. कार चालक एका वकिलाने भरधाव वेगात निष्काळजीपणे गाडी चालवत नाकाबंदी दरम्यान ड्युटीवर उभ्या असलेल्या पोलीसाला जोरदार धडक दिली. या घटनेत ऑन ड्युटी जवानाचा मृत्यू झाला आहे. कार चालक वकीलाचा सलमान खानशी देखील खास संबंध आहे. सलमान खानविरोधातील कळवीट शिकार प्रकरणात वकील महिपाल बिष्णोई यांनी बिष्णोई समाजाच्या वतीने केस लढवली होती.

'खतरों के खिलाडी 12' टास्कदरम्यान रुबिना दिलैकचा अपघात

 रुबिना दिलैक (Rubina Dilaik) छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बॉसनंतर रुबिना 'खतरों के खिलाडी 12' (Khatron Ke Khiladi 12) या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली. या कार्यक्रमात रुबिना वेगवेगळे स्टंट करताना दिसून येते. असेच स्टंट करताना आता रुबिनाचा अपघात झाला आहे. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


 





'लाल सिंह चड्ढा'साठी जुनैदची निवड झाली होती; आमिर खानने केला खुलासा

बॉलिवूड अभिनेता आमिर खान (Aamir Khan) सध्या 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha) या सिनेमामुळे चर्चेत आला आहे. 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमासाठी आमिरच्या लेकाची म्हणजेच जुनैदची (Junaid Khan) निवड झाली होती. एबीपी माझाच्या 'हार्ट टू हार्ट' या खास कार्यक्रमात आमिरने यासंदर्भात खुलासा केला आहे. 


 


शैलेश लोढांच्या एक्झिटवर निर्माते असित कुमार मोदींची प्रतिक्रिया!

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टपणे सांगताना दिसत आहेत की, 'अभिनेत्याला परत यायचे असेल तर तो येऊ शकतो, अन्यथा शो कोणत्याही कारणाने थांबणार नाही.’ 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'कौन बनेगा करोडपती 14'चा आज होणार ग्रॅंड प्रीमियर!


'कौन बनेगा करोडपती 14' (Kaun Banega Crorepati 14) हा छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रम आहे. यंदादेखील या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सांभाळणार आहेत. आज या लोकप्रिय कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. सोनी टीव्हीवर या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. 'कौन बनेगा करोडपती 14'मध्ये प्रेक्षकांना अनेक रोमांचक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये आमिर खान सहभागी होणार आहे. 'कौन बनेगा करोडपती 14' हा कार्यक्रम आज रविवारी 7 ऑगस्टला रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवदेखील साजरा करण्यात येणार आहे.


'लाल सिंह चड्ढा' आमिरला पुन्हा का करावा वाटला? जाणून घ्या फरफेक्टनिस्ट काय म्हणाला...


आमिर 'लाल सिंह चड्ढा' का करावा वाटला हे सांगताना म्हणाला,"90 च्या दशकात मी 'फॉरेस्ट गंप' हा सिनेमा पाहिला होता. 14 वर्षांपूर्वी अतुल कुलकर्णीने 'लाल सिंह चड्ढा' या सिनेमाची संहिता लिहिली. अतुलने 'लाल सिंह चड्ढा'ची संहिता लिहिल्यानंतर मी त्याला या सिनेमासाठी नकार दिला होता. त्यानंतर दोन वर्षांनी अतुलच्या सांगण्यानुसार मी पुन्हा या सिनेमाची संहिता वाचली. मला 'लाल सिंह चड्ढा'चे कथानक खूप आवडले. 'लाल सिंह चड्ढा' हा सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. लालची गोष्ट प्रेक्षकांना कळावी हा या सिनेमामागचा उद्देश होता. त्यामुळे या सिनेमावर काम करण्याचा मी निर्णय घेतला.


'विक्रांत रोणा' ची बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई; जाणून घ्या कलेक्शन


जगभरातील बॉक्स ऑफिसवर 'विक्रांत रोणा' या चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा गाठला आहे. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं 8.14 कोटींची कमाई केली आहे. ओपनिंग-डेला या चित्रपटानं 1.11 कोटींची कमाई केली. एका रिपोर्टनुसार, विक्रांत रोणा या चित्रपटानं दहाव्या दिवशी तीन कोटींची कमाई केली. लवकरच हा चित्रपट 200 कोटी क्लबमध्ये सामील होईल, असंही म्हटलं जात आहे.


'नवऱ्याचा फोन चेक करता का?'; मेधा मांजरेकरांनी दिलं मजेशीर उत्तर


'बस बाई बस' (Bus Bai Bus) या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. अभिनेते सुबोध भावे (Subodh Bhave) हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहेत. कार्यक्रमामध्ये अभिनेत्री मेधा मांजरेकर (Medha Manjrekar) यांनी देखील हजेरी लावली आहे. झी मराठीच्या सोशल मीडियावर या कार्यक्रमाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर करण्यात आला. सुबोध भावे हे मेधा यांना विचारतात घरातल्या गृहिणीला देखील अभिनय करावा लागतो? यावर मेधा, हो असं उत्तर देतात. तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका महिलेनं मेधा मांजरेकर यांना प्रश्न विचारला की,'नवऱ्याचा फोन चेक करता का कधी?' या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिलं, 'आता नाही करत'

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.