Entertainment News Live Updates 7 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Jul 2022 04:45 PM
‘पोन्नियिन सेलवन’ चित्रपटामधील तृषाचा लूक रिव्हील; साकारणार राजकुमारी कुंडवईची भूमिका

काली पोस्टर वादावर महुआ मोईत्रा यांनी केलेल्या वक्तव्याचं प्रकाश राज यांच्याकडून समर्थन; म्हणाले, 'रॉकस्टार...'

Mahua Moitra Kaali Poster Controversy : सध्या काली या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी वक्तव्य केलं होतं. महुआ मोईत्रा यांनी एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'मला अशा भारतात राहायचे नाही जिथे हिंदू धर्माबद्दल भाजपचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टीकोन प्रचलित असेल आणि बाकीचे लोक धर्माभोवती घुटमळतील.  मी मरेपर्यंत या विषयी लढा देईल. तुम्ही गुन्हा दाखल करा. मी कोणत्याही न्यायालयात लढा द्यायला तयार आहे.'  महुआ मोईत्रा यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी समर्थन केलं आहे. 


 वाचा सविस्तर बातमी 

अभिनेता श्रीजीत रवीला पोक्सो अॅक्ट अंतर्गत अटक; दोन अल्पवयीन मुलींनं केली होती तक्रार

Sreejith Ravi Arrested : मल्याळम चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रीजीत रवी (Sreejith Ravi) याला दोन अल्पवयीन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोक्सो या (POCSO) कमलाअंतर्गत त्याला अटक करण्यात आली आहे. 


वाचा सविस्तर बातमी

'शमशेरा' मधील 'फितूर' गाणं रिलीज

पाहा गाणं 


Mika Di Vohti : मिका सिंहला 'ही' मुलगी वाटते सर्वात बेस्ट? 'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा

Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. सध्या या स्वयंवरामध्ये मिकाला एक मुलगी आवडली आहे. स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये मिकासोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन अनेक सुंदर आणि हुशार मुली आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक मुलगी मिकाला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात मुली मिकावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पण, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे मिका सिंहला या कार्यक्रमामधील कोणती मुलगी सर्वात जास्त आवडते.


वाचा सविस्तर बातमी

राकेश रोशन यांचा वर्क-आऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल

'काली'च्या दिग्दर्शिकेचं पुन्हा वादग्रस्त ट्वीट; शंकर-पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचा फोटो शेअर करत म्हणाली...

Ranbir Kapoor Video : बॉलिवूडमधील प्रसिद्ध रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) लवकरच शमशेरा (Shamshera)हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  या चित्रपटामध्ये रणबीरसोबतच वाणी कपूर (Vaani Kapoor)आणि संजय दत्त (Sanjay Dutt) हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 22 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रणबीर सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा रणबीरचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काही फोटोग्राफर्स रणबीरला शुभेच्छा देताना दिसत आहेत. 


वाचा सविस्तर बातमी

अर्जुन कपूरनं रणवीर सिंहला दिल्या हटके शुभेच्छा

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Kailash Kher Birthday: वयाच्या 14 व्या वर्षी सोडलं घर; आयुष्य संपवण्याचाही केला होता प्रयत्न, जाणून घ्या कैलाश खेर यांच्याबद्दल


Kailash Kher : प्रसिद्ध गायक कैलाश खेर (Kailash Kher) यांच्या आज 49 वा वाढदिवस आहे. 7 जुलै 1973 मध्ये उत्तर प्रदेश येथे कैलाश यांचा जन्म झाला. कैलाश हे सध्या बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहेत. कैलाश यांना बालपणापासूनच संगीत क्षेत्राची आवड होती पण या गोष्टीला त्यांचे कुटुंब विरोध करत होते. संगीतक्षेत्रात काम करण्यासाठी कैलाश यांनी 14 व्या वर्षी घर सोडले. त्यानंतर त्यांनी लहान मुलांना संगीत शिकवण्यास सुरुवात केली. 


Mika Di Vohti : मिका सिंहला 'ही' मुलगी वाटते सर्वात बेस्ट? 'स्वयंवर : मिका दी वोटी'मध्ये फराह खान घेणार मुलींची परीक्षा


Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. सध्या या स्वयंवरामध्ये मिकाला एक मुलगी आवडली आहे. स्वयंवर- मिका दी वोटीमध्ये मिकासोबत लग्न करण्याचे स्वप्न घेऊन अनेक सुंदर आणि हुशार मुली आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रत्येक मुलगी मिकाला इम्प्रेस करण्याचे प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात मुली मिकावरचं प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पण, प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न उपस्थित होत आहे, तो म्हणजे मिका सिंहला या कार्यक्रमामधील कोणती मुलगी सर्वात जास्त आवडते.


‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत'; रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.