Entertainment News Live Updates 6 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Alia Instagram Followers : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) 2022 हे वर्ष खूप गाजवलं. आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा सुपरहिट ठरला. त्यानंतर आलिया भट्ट चॉकलेट बॉय रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) लग्नबंधनात अडकली. आता आलियाने कतरिना कैफ आणि दीपिका पदुकोणला मागे टाकलं आहे. आलियाने इंस्टाग्रामवर 70 मिलियनचा टप्पा पार केला आहे.
प्रार्थना बेहेरने नेहा कामत या व्यक्तिरेखेला निरोप देताना खास पोस्ट लिहिली आहे. व्यक्तिरेखेचा निरोप घेताना प्रार्थना भावुक झाली आहे. तिने नेहाला एक स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलं आहे,"अभी ना जाओ छोडकर...के दिल अभी भरा नही". तसेच नेहा कामत म्हणून हे शेवटचं रील असेल असंदेखील तिने म्हटलं आहे. प्रार्थनाची ही पोस्ट सध्या व्हायरल होत असून 'आम्हालादेखील आता नेहाची आठवण येईल' अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
Richa Chadha And Ali Fazal Wedding : बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा (Richa Chadha) आणि अली फजल (Ali Fazal) गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. एकमेकांना डेट केल्यानंतर रिचा आणि अली अखेर या महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत.
Chotya Bayochi Mothi Swapna : शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ असा वेगळा विषय हाताळत 'छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' (Chotya Bayochi Mothi Swapna) ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. शिक्षणाच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेच्या माध्यमातून उलगडणार आहे.
Goodbye Trailer Release : बॉलिवूडचे महानायक अमिबाभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या त्यांच्या आगामी 'गुडबाय' (Goodbye) सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून ट्रेलरला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. 'गुडबाय' या सिनेमाच्या माध्यमातून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी यांना व्हेनिस फिल्म फेस्टिव्हलमध्ये जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
‘कोईमोई’च्या रिपोर्टनुसार, मीडियाशी संवाद साधताना कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी एक मोठी अपडेट दिली आहे. अजित यांनी सांगितले की, राजू श्रीवास्तव यांनी पत्नी शिखा श्रीवास्तव यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना अजित सक्सेना यांनी मीडियाला सांगितले की, राजू भैय्या यांची प्रकृती आता पूर्वीपेक्षा चांगली आहे. त्याचे हात पाय किंचित हालचाल करू लागले आहेत.
टीव्हीवरचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नव्या सीझनमध्ये कोण कोण सामील होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. या घरात सामील होणाऱ्या स्पर्धकांमध्ये काही नावे देखील चर्चेत आहेत. यातीलच एक नाव म्हणजे राज कुंद्रा (Raj Kundra). बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा लवकरच ‘बिग बॉस 16’मध्ये दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
अभिनेता, दिग्दर्शक-निर्माते राकेश रोशन (Rakesh Roshan) आज (6 सप्टेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. राकेश रोशन यांचा जन्म 6 सप्टेंबर 1949 रोजी मुंबईत झाला. त्यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
'महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम, लग्न करण्यासाठी बदलला धर्म'; कंगनाची पोस्ट चर्चेत
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या विषयांवर मतं मांडते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात. बॉलिवूडमधील काही व्यक्तींवर कंगना निशाणा साधत असते. आता नुकतीच चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांच्याबाबत कंगनानं एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं सांगितलं आहे की, महेश भट्ट यांचे खरे नाव अस्लम आहे.
‘जगा आणि जगू द्या...’, ‘लायगर’ फ्लॉप होताच निर्माती चार्मी कौरने पोस्ट लिहित सोशल मीडियावरून घेतला ब्रेक!
'लायगर' बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर करण जोहर आणि चार्मी कौर यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. म्हणूनच, चार्मी कौरने आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. करण जोहरने ‘लायगर’ची निर्मिती केली होती. करण जोहर व्यतिरिक्त तेलुगू चित्रपटांची प्रसिद्ध अभिनेत्री चार्मी कौर हिने देखील या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती.
कमाल खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; लैंगिक छळाचा आरोप
वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे चर्चेत असणाऱ्या कमाल आर खानला (Kamaal R Khan) वर्सोवा पोलिसांनी तीन वर्षापूर्वीच्या प्रकरणी अटक केली आहे. त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कमाल आर खानला शनिवारी (3 सप्टेंबर) अटक करण्यात आली आणि रविवारी (4 सप्टेंबर) वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले.
सलमानच्या नव्या चित्रपटाचं नाव जाहीर; लूकनं वेधलं लक्ष
सलमानच्या आगामी चित्रपटाचं नाव 'किसी का भाई किसी की जान' असं आहे. या चित्रपटातील सलमानचा लूक देखील रिव्हिल करण्यात आला आहे. लांब केस, डोळ्यावर गॉगल अशा डॅशिंग लूकमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खान फिल्म्स या नावाच्या युट्युब चॅनलवरुन 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटातील सलमानच्या लूकचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलमानच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.
सेक्रेड गेम्समुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेने ऊस कामगारांच्या मुलांसाठी उभी केली शाळा
बहुचर्चित असलेल्या सेक्रेड गेम्स (sacred games) या वेबसिरीजमुळे चर्चेत आलेल्या राजश्री देशपांडेला (rajshri deshpande) आपण आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिले आहे. मात्र अभिनयाच्या पलीकडे राजश्री करत असलेल्या सामाजिक उपक्रमांची देखील अनेकदा चर्चा होते. तिच्या अशाच एका सामाजिक उपक्रमांने सर्वांचे मनं जिंकले आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आज औरंगाबादच्या ढोरकीन तांड्यावर राजश्रीच्या हस्ते एका जिल्हा परिषदेच्या शाळेचे (zp School) लोकार्पण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे या शाळेची ईमारत राजश्रीने स्वखर्चाने उभी केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -