Entertainment News Live Updates 6 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 06 Nov 2022 05:03 PM
Alia-Ranbir Welcome Baby Girl : बाळाची आत्या म्हणजेच रिद्धिमा कपूरकडूनही खास शुभेच्छा

Alia-Ranbir Welcome Baby Girl : प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आलिया भट्ट आज आई झाली. आनंदाच्या या अनोख्या प्रसंगी अनेक लोक रणबीर आणि आलियाचे अभिनंदन करत आहेत. दरम्यान, मुलीच्या आत्या म्हणजेच रिद्धिमा कपूरनेही आपला आनंद व्यक्त केला आहे. 



    

Sambhajiraje Chatrapati : सिनेमॅटिक लिबर्टी म्हणून काही इतिहास दाखवायचा? : संभाजीराजे छत्रपती

Sambhajiraje Chatrapati : "वेडात मराठे वीर दौडले सात" काय तो पोशाख हे काय मावळे आहेत का? चित्रपट बनवता ही चांगली गोष्ट आहे. पेंढारकर यांनी काय छान चित्रपट बनवले होते. मात्र, आता लोकांना आवडतं म्हणून काही चित्रपट बनवायचे का? अशा शब्दांत माजी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी या चित्रपटावर टीका केली आहे. सिनेमॅटिक लिबर्टी सध्या सुरू आहे ते आम्ही मान्य करू. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला चालू शकत नाही, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.

Sachin Tendulkar: 'अभिमानास्पद...'; प्रशांत दामलेंसाठी मास्टर ब्लास्टर सचिननं केली खास पोस्ट

Prashant Damle : मराठी चित्रपट आणि नाटकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारे प्रशांत दामले (Prashant Damle) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतात. प्रशांत दामले यांनी नुकताच 12,500 प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. या निमित्तानं सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी प्रशांत दामले यांना शुभेच्छा देत आहेत. नुकतीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरनं (Sachin Tendulkar) प्रशांत दामले यांच्यासाठी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. ही पोस्ट शेअर करुन सचिननं प्रशांत दामले यांचे कौतुक केलं आहे. 



Alia-Ranbir Welcome Baby Girl : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने दिल्या रणबीर-आलियाला शुभेच्छा

Alia-Ranbir Welcome Baby Girl : अभिनेत्री आलिया भट्ट आई झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटीही नुकत्याच आई-बाबा झालेल्या रणबीर-आलियाला शुभेच्छा देतायत. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही तिच्या इन्स्टाग्रामवरून रणबीर-आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

Alia Ranbir Baby: आई होताच आलियानं शेअर केली पहिली पोस्ट; म्हणाली...

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या परीचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे.  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अनेक नेटकरी सध्या आलिया आणि रणबीरला शुभेच्छा देत आहेत. नुकतीच आलियानं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून आलियानं आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. 





Alia-Ranbir Welcome Baby Girl: आलिया आणि रणबीरला कन्यारत्न; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

Alia Bhatt Ranbir Kapoor: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर  (Ranbir Kapoor) यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. रणबीर आणि आलिया हे आई-बाबा झाले आहेत. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न झालं आहे. आलियानं सर एच एन रिलायन्स रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म दिला. आलियाला आज सकाळी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. 

Alia Bhatt and Ranbir Kapoor : सोनी राझदान पोहोचल्या रिलायन्स रुग्णालयात

Alia Bhatt and Ranbir Kapoor :  आलिया भट्टची आई सोनी राझदान या रिलायन्स रुग्णालयात पोहोचल्या आहेत. आलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. 





Prabhas : नेटफ्लिक्सवर भडकले प्रभासचे फॅन्स; Unsubscribe Netflix हॅशटॅग झाला ट्रेंड

Prabhas : प्रभास (Prabhas) हा त्याच्या चित्रपटांमुळे नेहमी चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून तो ‘आदिपुरुष’ (Adipurush) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटातील वापरण्यात आलेल्या व्हिएफएक्सला अनेक जण ट्रोल करत आहेत. नुकताच नेटफ्लिक्स इंडोनेशियानं (Netflix) प्रभासच्या साहो या चित्रपटामधील एका   व्हिडीसीनचाओ शेअर केला आहे. नेटफ्लिक्सकडून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओची अनेक जण खिल्ली उडवत आहेत. आता प्रभासचे चाहते नेटफ्लिक्सवर भडकले आहेत. सध्या Unsubscribe Netflix हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. 



Rubina Dilaik: 31 किलोचा घागरा परिधान करुन ‘झलक दिखला जा 10’ च्या मंचावर थिरकली रुबिना

Jhalak Dikhhla Jaa 10: ‘झलक दिखला जा 10’ या शोमधून सध्या अभिनेत्री रुबिना दिलैक (Rubina Dilaik) ही प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. या शोमध्ये नुकत्याच एका परफॉर्मेन्ससाठी रुबिनानं 31 किलोचा घागरा परिधान केला होता. 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Alia-Ranbir Baby: Alia Bhatt Delivery : आलिया भट्ट लवकरच देणार गोड बातमी; प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल


Alia Bhatt and Ranbir Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) ही जोडी सध्या त्यांच्या होणाऱ्या बाळामुळे चर्चेत आहे. लवकरच त्यांच्या घरी एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. आलिया भट्ट प्रसूतीसाठी रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आलिया सर एच एन रिलायंस रुग्णालयात ( Sir H. N. Reliance Foundation Hospital ) बाळाला जन्म देणार आहे. 


चीनच्या लाखो लोकांचा आवाज बनले बप्पी लाहिरींचे गाणे


चीनमध्ये कोरोनाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चीनमध्ये कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे लोकांची उपासमार होता आहेत. ही भयानक परिस्थीती दाखवण्यासाठी चीन मध्ये लोक हातात रिकामी भांडी घेऊन सरकारचा निषेध नोंदवत आहेत. यावेळी हे लोक चीनच्या भाषेत 'जी मी, जी मी' म्हणजे 'मला तांदूळ दे, मला तांदूळ दे' असे म्हणत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत. त्यामुळे चीनमध्ये बप्पी लाहिरी यांच्या 'जिम्मी जिमी' गाण्याने धुमाकूळ गातला आहे. 


19 वर्षाच्या अब्दुवर फिदा जान्हवी कपूर


बिग बॉसचा खेळ हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सध्या सुरु असलेला बिग बॉस सीझन 16 (Big Boss 16) हा देखील प्रेक्षकांना चांगलाच आवडू लागला आहे. दिवसेंदिवस या शोची रंगत आणखीनच वाढतेय. यामध्येच आता शोच्या नुकत्याच दाखविण्यात आलेल्या प्रोमोमध्ये जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून एन्ट्री करणार आहे. या एपिसोडमध्ये जान्हवी कपूर चक्क 3 फूट उंचीच्या अब्दु रोजिकबरोबर (Abdu Rozik) फ्लर्ट करताना दिसणार आहे. जान्हवीला अब्दु इतका आवडला आहे की तिने चक्क आपला फोन नंबरही अब्दुला शेअर केला आहे. 


'खाकी द बिहार चॅप्टर'सीरिजचा धमाकेदार ट्रेलर रिलीज


'मिर्झापूर' (Mirzapur) या धमाकेदार सीरिजनंतर आता आणखी एक यूपी-बिहारवर आधारित सीरिज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. नेटफ्लिक्सची आगामी क्राईमवर आधारित वेब सिरीज 'खाकी-द बिहार चॅप्टर'चा (Khakee The Bihar Chapter) ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या सीरिजमध्ये करण टॅकर आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, रवी किशन, आशुतोष राणा देखील दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.