Entertainment News Live Updates 6 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Aug 2022 04:43 PM
IFFM : 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्टपासून होणार सुरू

IFFM : 'इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न' (IFFM) हा भारताबाहेर आयोजित होणार सर्वात मोठा फिल्म फेस्टिव्हल आहे. या महोत्सवात समीक्षकांची पसंती मिळालेले 100 हून अधिक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतात. 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न' 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. तसेच या महोत्सवात 'माली'चा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. 

Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' 'या' दिवशीपासून होणार सुरू

Bigg Boss 16 Premier Date : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. गेली 15 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच 'बिग बॉस 16'चा (Bigg Boss 16) प्रीमियर होणार आहे. बिग बॉसचे 16 वे पर्व सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये होणार असल्याच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 1 ऑक्टोबर 2022 रोजी कलर्स चॅनलवर या बहुचर्चित कार्यक्रमाचा प्रीमियर होणार आहे. निर्माते लवकरच अधिकृतरित्या यासंदर्भात अधिकृत घोषणा करणार आहेत. 

Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांची मागील तीन तासापासून चौकशी सुरू

Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणात वर्षा राऊत यांची मागील तीन तासापासून चौकशी सुरू आहे. खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा पत्राचाळ प्रकरणात, तसेच अलिबाग येथे जागा घेतल्याचा आरोप असल्यानं चौकशी सुरू आहे. तसेच, शिवसेना खासदार आणि वर्षा राऊत यांचे पती संजय राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. अलिबाग येथे जागा खरेदी करताना रोखीने व्यवहार झाले असल्याचा ईडीनं आरोप केला आहे. वर्षा राऊत यांच्या अकाउंटमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त पैसे आले आहेत. त्यासंदर्भात ही चौकशी केली जात आहे. 

Ghatkopar : घाटकोपरच्या पंत नगरमध्ये इमारतीच्या संरक्षक भिंत शेजारी असलेल्या निर्माणाधीन भाग कोसळला

Ghatkopar : घाटकोपरच्या पंत नगरमध्ये एका इमारतीची संरक्षक भिंत शेजारी असलेल्या निर्माणाधीन इमारतीच्या पायावर कोसळला आहे. शेजारी सुरू असलेल्या बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप इमारतीतील रहिवाशांनी केल्या. तसंच प्रशासनानं याकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणीही स्थानिकांनी केलेय.

मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न, स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध एफआयआर दाखल!

मनोरंजन विश्वात आपले नशीब आजमवण्यासाठी आलेल्या एका अभिनेत्री-मॉडेलवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी स्टॉक ब्रोकर जिग्नेश मेहताविरुद्ध (Jignesh Mehta) अंधेरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 





‘बिग बॉस मराठी 4’च्या सूत्रसंचालनाची धुरा दुसऱ्याच अभिनेत्याच्या हातात? पाहा काय म्हणाले महेश मांजरेकर...

महेश मांजरेकर म्हणाले की, ‘मी काही या बिग बॉस शोचा बांधील नाही. माझा तीन वर्षांचा करार होता. मी तीन वर्ष इमानेईतबारे हे काम केलं. हा मला आताही त्यांनी घेतलं तर, करायला आवडेल. मी तितक्याच मेहनतीने ते काम करेन. पण, जर दुसरं कुणी सूत्रसंचालन करणार असेल, तर मी त्यालाही प्रोत्साहन देईन आणि तितक्याच उत्साहाने हा कार्यक्रम बघेन.’    


वाचा संपूर्ण बातमी

न्यूड फोटोशूटच्या वादादरम्यान करण जोहरने शेअर केली पोस्ट, म्हणाला 'I love you Ranveer!'

Shahrukh Khan : पंजाबी गाण्यावर थिरकला शहारुख; पाहा व्हिडीओ

Liger Aafat Song: लायगर चित्रपटातील ‘आफत’ गाणं रिलीज

आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार? अभिनेता शशांक केतकरची पोस्ट चर्चेत

अभिनेता अभिजीत खांडकेकरचं ओटीटीवर पदार्पण, ‘दुरंगा’मध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका!

अभिजीत खांडकेकर (Abhijeet Khandkekar) हा लोकप्रिय मराठी अभिनेता ‘दुरंगा’ या सीरिजमध्ये नामांकित क्राईम रिपोर्टर विकास सोराडे व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. त्याची व्यक्तिरेखा समित पटेलची खरी बाजू उलगडून लोकांसमोर आणण्याच्या प्रयत्न करताना दिसेल.


 





'थॉर'ने केलं मीराबाई चानू यांचं कौतुक!

कॉमनवेल्थ गेम्स 2022मध्ये मीराबाई चानू यांनी मिळवलेल्या विजयाचे कौतुक करताना एका सोशल मीडिया युझरने ‘थॉर’ फेम अभिनेता ख्रिस हेम्सवर्थला ट्विटरवर टॅग केले आणि लिहिले की, 'थॉरला आपला हातोडा मीराबाईंना देण्याची वेळ आली आहे.' या ट्विटवर कमेंट करताना ख्रिसने देखील उत्तर दिले आणि लिहिले, 'ती त्यासाठी खरंच पात्र आहे. अभिनंदन, सायखोम, तू महान आहेस.'


 





Urfi Javed : उर्फी जावेदचा ग्लॅमरस लूक

कामातून ब्रेक घेत शाहरुख खान पाहणार 'डार्लिंग्स'!

अखेर आलिया भट्टचा पहिला प्रॉडक्शन चित्रपट 'डार्लिंग्स' रिलीज झाला आहे. शाहरुख खाननेही ट्विट करून चाहत्यांना माहिती दिली की तो त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून ब्रेक घेऊन आलियाचा 'डार्लिंग्स' पाहणार आहे.


 





अरिजित सिंहच्या आवाजातील 'लाल सिंग चड्ढा'चे नवीन गाणे रिलीज!

आमिर खान आणि करीना कपूर खान यांचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. आमिर टीमसोबत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, आता ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाची गाणी रिलीज होत आहेत. नुकतेच या चित्रपटातील ‘तेरे हवाले’ हे गाणे रिलीज झाले. हे गाणे अरिजित सिंहने गायले आहे.


 





एअर होस्टेस ते अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास, लग्नासाठी धर्म बदलल्याने नेहमीच चर्चेत राहिली दीपिका कक्कर!

‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून घरांघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री दीपिका कक्कर आज (6 ऑगस्ट) तिचा 36वा वाढदिवस साजरा करत आहे.


 





लहान वयातच गायली 100हून अधिक गाणी, अभिनयातही आजमावलं नशीब! वाचा आदित्य नारायणबद्दल..

केवळ प्रसिद्ध गायक उदित नारायण (Udit Narayan) यांचा मुलगा अशी ओळख न मिळवता, आदित्य (Aditya Narayan) याने स्वतःच्या मेहनतीवर बॉलिवूड विश्वात आपले स्थान निर्माण केले. गायक, अभिनेता आणि होस्ट अशा विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या आदित्य नारायण याचा आज (6 ऑगस्ट) वाढदिवस आहे. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'कोण होणार करोडपती'च्या मंचावर उलगडणार सई ताम्हणकरच्या अभिनय कारकिर्दीचा प्रवास


'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात सई ताम्हणकर आणि सौम्या डाबरीवाल सहभागी होणार आहेत.


'लाल सिंह चड्ढा' आणि 'रक्षा बंधन'च्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात


सध्या सोशल मीडियावर अक्षय कुमार आणि आमिर खान चर्चेत आहेत. आमिरचा 'लाल सिंह चड्ढा' आणि अक्षयचा 'रक्षा बंधन'  लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमांच्या अॅडव्हांस बुकिंगला सुरुवात झाली आहे.


'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


'धर्मवीर' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.


ब्रेकअपनंतर राकेश-शमिताचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला


बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी आणि राकेश बापट ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीमुळे शमिता आणि राकेश चर्चेत आले होते. आता ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'तेरे विच रब दिसदा' असे या गाण्याचे नाव आहे.


रक्षा बंधन’च्या प्रमोशनसाठी आलेल्या अक्षय कुमारलाही आवरला नाही मिसळ चाखण्याचा मोह!


बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार सध्या अनेक शहरांत दौरे करत आहे. याच चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि ‘रक्षा बंधन’ या चित्रपटाची टीम पुण्यात आली होती. प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने चक्क पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला होता. अक्षय कुमारचा मिसळ चाखतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.