Vijay Shankar Hits Three Sixes Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या सध्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये बडोदा आणि तामिळनाडू यांच्यातील सामन्यात विजय शंकरने पांड्याच्या षटकात तीन षटकार ठोकले. भारतीय अष्टपैलू विजय शंकरने बुधवारी हार्दिक पांड्याचा चांगला समाचार घेतला आणि त्याच्या एका षटकात तीन षटकार मारले.
दोन दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सने (CSK) मेगा लिलावात या खेळाडूला 1.2 कोटी रुपयांना विकत घेतले. आता 33 वर्षीय खेळाडूने आपल्या कामगिरीने संघ व्यवस्थापनाला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. बुधवारी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा ग्रुप बी सामना तामिळनाडू आणि बडोदा यांच्यात खेळला गेला. यामध्ये बडोद्याने तीन गडी राखून विजय मिळवला.
विजय शंकरची मेहनत पाण्यात...
भारताच्या 33 वर्षीय अष्टपैलू खेळाडूने या सामन्यात 22 चेंडूंचा सामना केला आणि 42 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. यादरम्यान त्याने 190.90 च्या स्ट्राईक रेटने चार षटकार ठोकले. मात्र, तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही. विजय शंकरने भारतीय संघासाठी 12 एकदिवसीय आणि नऊ टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे.
सामन्यात काय घडलं?
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या तामिळनाडूने नारायण जगदीसनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर 20 षटकांत 6 बाद 221 धावा केल्या. यादरम्यान लुकमानने तीन तर कृणाल आणि निनादने प्रत्येकी एक विकेट घेतली. प्रत्युत्तरात हार्दिकच्या 69 धावांच्या स्फोटक खेळीमुळे बडोद्याने 20 षटकांत सात गडी गमावून 222 धावा केल्या आणि सामना जिंकला.
पांड्याने गुरजपनीत सिंगवर साधला निशाणा
पांड्याने गुरजपनीत सिंगवर निशाणा साधला. त्याने डावाच्या 17व्या षटकात 26 वर्षीय गोलंदाजाविरुद्ध चार षटकार आणि एक चौकार लगावला. या षटकात एकूण 29 धावा आल्या. गुरजपनीत हा तोच गोलंदाज आहे ज्याला दोन दिवसांपूर्वी मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्सने (CSK) 2.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्याची मूळ किंमत 30 लाख होती.
हे ही वाचा -