Entertainment News Live Updates 5 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2022 05:02 PM
'एकदा काय झालं'च्या शूटिंगदरम्यान एकही प्लास्टिकची बाटली वापरण्यात आली नाही.

Ekda Kay Zala : 'एकदा काय झालं' (Ekda Kay Zala) या सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आल्यापासून या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एकही प्लास्टिकची बाटली वापरण्यात आली नाही.

Man Udu Udu Zhala : गुंडागिरी सोडून इंद्रा करणार चांगल्या कामाला सुरुवात; समाज स्वीकारणार का?

Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या नव-नविन ट्विस्ट येत आहेत. इंद्राचे सत्य देशपांडे सरांसमोर आल्यानंतर मालिकेत एक वेगळचं वळण आलं आहे. इंद्राने गुंडागिरी सोडून चांगलं काम करण्याचा निर्णय घेतला आहे. पण समाज इंद्राला स्वीकारायला तयार नाही. 



Google Mid Year Search 2022 List : गुगल सर्चवर बॉलिवूड कलाकरांचा दबदबा

Google Mid Year Search 2022 List : गुगलनं (Google) गेल्या सहा महिन्यामध्ये सर्वात जास्त सर्च करण्यात आलेल्या आशियामधील सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे. 2022 या वर्षातील सहा महिन्यांत सर्वात जास्त गुगलवर सर्च करण्यात आलेल्या सेलिब्रिटींमध्ये प्रथम क्रमांकावर हा साऊथ कोरियन म्युझिक बँड बीटीएसमधील एका कालाकार आहे. तर टॉप 10 कलाकरांपैकी बॉलिवूडमधील 6 कलाकारांच्या नावाचा समावेश या यादीत आहे. गेल्या सहा महिन्यात गुगलवर सर्वात जास्त ज्यांच्याबद्दल सर्च करण्यात आलं अशा सेलिब्रिटींची नावे पाहूयात......


वाचा सविस्तर बातमी

'गॉडफादर' चा टीझर व्हिडीओ रिलीज

पाहा टीझर:


डार्लिंग्सचा धमाकेदार टीझर रिलीज

पाहा टीझर:





हृतिक रोशनने युपीमध्ये शूट करण्यास नकार दिला? चित्रपटाचे निर्माते म्हणतात...

Hrithik Roshan, Vikram Vedha : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि हृतिक रोशन (Hrithik Roshan) यांचा आगामी चित्रपट ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) हा आगामी चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. आर माधवन (R Madhavan) आणि विजय सेतुपती (Vijay sethupathi) यांच्या 'विक्रम वेधा'च्या हिंदी रिमेकची घोषणा झाल्यापासून लोक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, सध्या हा चित्रपट एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकत्याच अशा चर्चा समोर आल्या होत्या की, हृतिकने मेकर्ससमोर अशी अट ठेवली की, ज्यामुळे त्यांना चित्रपटाचे बजेट दुप्पट करावे लागले होते.


वाचा संपूर्ण बातमी

'मी आता विवाहित महिला आहे, नीट बोला'; चाहतीला दीपिकाचं उत्तर

Deepika Padukone : प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) बॉलिवूड बरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली. सध्या दीपिका ही पती रणवीर सिंहसोबत (Ranveer Singh) सुट्टीसाठी परदेशात गेली आहे. दीपिका आणि रणवीरनं कॅलिफोर्नियामधील San Jose मध्ये होणाऱ्या कोंकणी संमेलनमध्ये सहभाग घेतला. या संमेलनातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये संमेलनातील एक दीपिकाची चाहती म्हणते, 'आम्ही तुझ्यावर प्रेम करतो' यावर दीपिकानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.  


पाहा व्हिडीओ:



‘गॉडफादर’मध्ये दिसणार मेगास्टार चिरंजीवीचा जबरदस्त लूक! चित्रपटाचे पोस्टर पाहिलेत का?

Chiranjeevi, Godfather : सध्या दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मनोरंजनाचा धडाका सुरु आहे. ‘गॉडफादर’ (Godfather) हा साऊथचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात साऊथचा मेगास्टार अर्थात अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi) या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील त्यांचा पहिला लूक रिलीज करण्यात आला. चिरंजीवीचा हा लूक पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. चाहतेच नाही तर, कलाकार देखील त्यांच्या या लूकला जबरदस्त म्हणत आहेत.


साऊथ सुपरस्तर चिरंजीवीचा हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट अनेक कारणामुळे चाहते आणि प्रेक्षक यांच्यासाठी खास असणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

नयनतारा अन् विग्नेश शिवनचा खास रोमँटिक फोटो, प्रेमात रमलेल्या जोडीला पाहून चाहते म्हणतात...

Nayanthara, Vignesh Shivan : साऊथ क्वीन अभिनेत्री नयनातारा (Nayanthara) हिने नुकतीच निर्माता-दिग्दर्शक विग्नेश शिवन (Vignesh Shivan) याच्यासोबत लग्नगाठ बांधली. नवीनच लग्न झालेलं हे जोडपं सध्या त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. लग्न पार पडल्यापासून नयनतारा आणि विग्नेश शिवन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून रोमँटिक फोटो शेअर करत आहेत. नुकताच त्यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये दोघे रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. दोघांना एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहून चाहते देखील खुश झाले आहेत.


नुकताच विग्नेश शिवन याने एक फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या फोटोत तो पत्नी-अभिनेत्री नयनतारा हिच्या मिठीत दिसत आहे. त्यांचे चाहते या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. हा फोटो पाहून दोघेही एकमेकांच्या प्रेमात आणि संसारात रमले आहेत, याची खुणगाठ पटते.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


हिंदू देवतेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या हातात सिगारेट अन् LGBTQचा झेंडा, ‘काली’ डॉक्युमेंट्रीचं पोस्टर पाहून संतापले नेटकरी!


बॉलिवूड चित्रपटांमधून सातत्याने हिंदू देवदेवतांचा अपमान केला जातो, यावरून अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. आताही अशीच एक घटना घडली आहे. मात्र, यावेळी नेटकरी प्रचंड संतापले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालय, अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही तर, सदर व्यक्तीला अटक आकारण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे. ‘काली’ नावाच्या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरवरून हा वाद सुरु झाला आहे. चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांच्या 'काली' या माहितीपटाच्या पोस्टरमुळे देशाभरात संतापाची लाट उसळली आहे.


‘अनन्या’च्या भावना व्यक्त झाल्या 'न कळत'; रोमँटिक गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!’ असे म्हणणाऱ्या ‘अनन्या’चा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. आता ‘अनन्या’ चित्रपटातील एक रोमँटिक गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हृता दुर्गुळे आणि चेतन चिटणीस यांच्यात खुलत जाणारे हळूवार नाते यात दिसत आहे. ‘न कळत’ असे या गाण्याचे बोल असून बेला शेंडेचा सुमधूर आवाज या गाण्याला लाभला आहे. तर अभिषेक खणकर यांनी हे गाणे शब्दबद्ध केले असून समीर साप्तीसकर यांनी गाण्याला संगीत दिले आहे.


संजय जाधव दिग्दर्शित 'तमाशा लाईव्ह' चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित


गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे 'तमाशा लाईव्ह'. या चित्रपटाचे नावच इतके निराळे आहे की, या चित्रपटाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण होते. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक दिसत आहे. 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या 15 जुलै रोजी हा भव्य चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 


'साई तुझं लेकरू'; 'टाइमपास 3' मधील धम्माल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला


आई -बाबा आणि साईबाबाची शपथ असं म्हणणारा दगडू साईबाबांचा किती मोठा भक्त आहे, हे यापूर्वीच आपण दोन भागांमध्ये पाहिले आहे. दगडूचे हेच साईप्रेम 'टाइमपास 3' मध्येही पाहायला मिळणार आहे. 'साई तुझं लेकरू' हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून साईच्या चरणी दगडूचे कुटुंब आणि मित्र प्रार्थना करताना दिसत आहेत.


बहुचर्चित 'आर्या'चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीला; निर्मात्यांनी केली घोषणा


बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुष्मिता सेनच्या बहुचर्चित 'आर्या' या वेबसीरिजचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी नुकतीच यासंदर्भात घोषणा केली आहे. लेडी डॉनच्या भूमिकेत पुन्हा एकदा सुष्मिता सेन दिसणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.