Entertainment News Live Updates 5 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Aug 2022 06:46 PM
Dharmaveer : ब्लॉकबस्टर 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

'धर्मवीर' (Dharmaveer) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. या सिनेमाने सिनेमागृहाबाहेर हाऊसफुल्लचे बोर्ड अभिमानाने झळकवले होते. त्यानंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील रिलीज झाला. आता या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर (World Television Premiere) होणार आहे. 





Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत सलग चौथ्या आठवड्यात पहिल्या क्रमांकावर

टीआरपीच्या शर्यतीत 'रंग माझा वेगळा' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

Dagdi Chaawl 2 : 'दगळी चाळ 2' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, पोस्टर आऊट

Dagdi Chaawl 2 : 'दगळी चाळ 2' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाळ काही विसरत नसते असे म्हणत या सिनेमाचे नवे पोस्टर आऊट झाले आहे. 18 ऑगस्टला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Raqesh Shamita Song : ब्रेकअपनंतर राकेश-शमिताचं नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; 'तेरे विच रब दिसदा' सोशल मीडियावर व्हायरल

Raqesh Shamita Song : बॉलिवूड अभिनेत्री शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि राकेश बापट (Raqesh Bapat) ब्रेकअपमुळे सध्या चर्चेत आहेत. बिग बॉस ओटीटीमुळे शमिता आणि राकेश चर्चेत आले होते. आता ब्रेकअपनंतर शमिता शेट्टी आणि राकेश बापटचे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'तेरे विच रब दिसदा' (Tere Vich Rab Disda) असे या गाण्याचे नाव आहे. 





Bigg Boss 16 : भाईजानच्या बहुचर्चित कार्यक्रमात फरमानी नाजची एन्ट्री? 'बिग बॉस 16' लवकरच होणार सुरू

Bigg Boss 16 : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) लोकप्रिय कार्यक्रम बिग बॉस (Bigg Boss) प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतो. लवकरच या कार्यक्रमाचे सोळावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या कार्यक्रमात 'हर हर शंभू' गाणं गाणारी फरमानी नाज (Farmani Naaz) सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिका उत्कंठावर्धक वळणावर; अविनाशचं सत्य येणार सिम्मीसमोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आता परीचा ड्रायव्हर म्हणून नेहाच्या पहिल्या नवऱ्याची मालिकेत एन्ट्री झाली आहे. आता अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचे सत्य सिम्मीसमोर आलं आहे. 





Genelia DSouza : रितेश देशमुखने जेनेलिया डिसूजाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

रितेश देशमुखने खास व्हिडीओ शेअर करत जेनेलिया डिसूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 





‘रक्षा बंधन’च्या प्रमोशनसाठी आलेल्या अक्षय कुमारलाही आवरला नाही मिसळ चाखण्याचा मोह!

'रक्षा बंधन’च्या प्रमोशन निमित्ताने अक्षय कुमार आणि चित्रपटाची टीम पुण्यात आली होती. प्रमोशनचा कार्यक्रम पार पडल्यानंतर अक्षय कुमारने चक्क पुण्यातील एका हॉटेलमध्ये मिसळ पाववर ताव मारला होता. अक्षय कुमारचा मिसळ चाखतानाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


 





बहिणीचा आवाज ऐकून अक्षय कुमार झाला भावूक!

रक्षाबंधन स्पेशलच्या दिवशी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘सुपरस्टार सिंगर 2’मध्ये पोहोचणार आहे. शोचा लेटेस्ट प्रोमो सोनी टीव्हीने शेअर केला आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार भावूक होताना दिसत आहे. अक्षय भावूक होण्यामागचे कारण म्हणजे त्याची बहीण अलका भाटिया! अलकाने आपल्या भावासाठी एक सुंदर मेसेज पाठवला आहे, जो ऐकून खिलाडी कुमार भावूक झाला आहे.


 





अभिनेत्री सोनम कपूरने सोशल मीडियावर शेअर केले सुजलेल्या पायाचे फोटो!

अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या तिच्या गर्भारपणाचा आनंद घेत आहे आणि ती अनेकदा तिच्या आई होण्याच्या या प्रवासाचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह शेअर करत असते. मात्र, ज्याप्रकारे प्रत्येक महिलेला गरोदरपणात काही किरकोळ समस्यांना सामोरे जावे लागते, त्याच पद्धतीने अभिनेत्रीलाही गरोदरपणात काही बदल जाणवत आहेत. आज अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर सुजलेल्या पायांचा फोटो शेअर केला आहे.



राखी सावंतचा प्रियकर आदिलला बिष्णोई गँगकडून धमक्या!

राखी सावंतने तिचा प्रियकर आदिलला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. या कथित धमक्या आदिलला बिश्नोई टोळीकडून मिळत असल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. 'ड्रामा क्वीन' या नावाने प्रसिद्ध असलेल्या राखी सावंतचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये तिने फोनमधील ही धमकी दाखवली आहे. मात्र, राखीने बिश्नोई गँगला कडक ताकीद देत आदिल खानपासून दूर राहण्यास सांगितले आहे.


 





रणवीर सिंहला पुन्हा मिळाली न्यूड फोटोशूटची ऑफर!

रणवीर सिंहने नुकतेच एका मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटवरून बराच वाद निर्माण झाला होता. इतकंच नाही, तर काही राज्यांमध्ये रणवीरविरोधात तक्रारही करण्यात आली होती. मात्र, बॉलिवूड इंडस्ट्रीने रणवीरला खूप सपोर्ट केला. अभिनेत्याला खूप ट्रोल केले जात असताना, पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स म्हणजेच ‘पेटा इंडिया’ने रणवीरला त्यांच्या एका मोहिमेसाठी न्यूड फोटोशूट करण्याची विनंती केली आहे.


 





नेहा-परीचा 'मंगळागौर' स्पेशल मराठमोळा लुक

हृतिक रोशनने दिवंगत अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांना वाहिली श्रद्धांजली

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे 4 ऑगस्ट रोजी निधन झाले. मिथिलेश चतुर्वेदी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 'कोई मिल गया', 'गदर', 'बंटी और बबली' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘कोई मिल गया’ या चित्रपटात मिथिलेश चतुर्वेदींसोबत काम केलेल्या हृतिक रोशनने एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. हृतिकने सोशल मीडिया पोस्टद्वारे मिथिलेश चतुर्वेदी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


 





अजय देवगणने काजोललां दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अजय देवगणने पत्नी काजोलच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.


 





‘स्वतःच्या मानलेल्या भावाशीच निशाचं अफेयर!’, पती करण मेहराने केला गौप्यस्फोट

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेता करण मेहरा याने नुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आपली विभक्त पत्नी निशा रावल, तिचा बॉयफ्रेंड आणि कुटुंबियांबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यादरम्यान त्याने निशावर अनेक आरोप केले आहेत. करणने सांगितले की, तो कटाचा शिकार ठरला आहे. निशा तिच्याच मानलेल्या भावासोबत रिलेशनशिपमध्ये असून, दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा खुलासाही त्याने केला.


 





टॉम क्रुझ ‘मिशन इम्पॉसिबल’ सोडणार?

हॉलिवूडच्या ‘मिशन इम्पॉसिबल’ (Mission Impossible) या चित्रपटाने प्रेक्षकांचे हृदयावर राज्य केलं आहे. या चित्रपटाचा मोठा चाहतावर्ग जगभरात पसरलेला आहे. या चित्रपटातील मुख्य अभिनेता टॉम क्रुझ (Tom Cruise) यानेही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. मात्र, आता अभिनेता टॉम क्रुझ हा चित्रपट सोडणार असल्याची चर्चा हॉलिवूडसह जगभरात रंगली आहे.


वाचा संपूर्ण बातमी


 





मॉडेलिंगमधून करिअरची सुरुवात, हिंदीच नव्हे तर साऊथ चित्रपटविश्वही गाजवणारी जिनिलिया डिसूजा!

बॉलिवूडची क्युट अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) आज (5 ऑगस्ट) आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलिया डिसूजा बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वात क्युट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला तिच्या गोड हास्यामुळे मॉडेलिंग विश्वात वाहवा मिळाली होती. फार कमी वेळात जिनिलिया डिसूजाने भारतातील अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला.


 





Happy Birthday Kajol : वयाच्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण, मराठीशीही खास नातं!

 90च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री काजोल (Kajol) आज (5 ऑगस्ट) तिचा 48वा वाढदिवस साजरा करत आहे. मुळातच चित्रपटांची कौटुंबिक पार्श्वभूमी असणाऱ्या काजोलला देखील बालपणापासून अभिनयाची आवड होती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान निर्माण केले आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


After Operation London Cafe : अभिनेत्री मेघा शेट्टी करणार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण


आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे (After Operation London Cafe) सिनेमाचे दुसरे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. निर्माते दिपक राणे यांनी आपल्या या सिनेमातून कन्नड सुपरस्टार मेघा शेट्टीला मराठी सिनेमात लाँच केले आहे.  मेघा शेट्टी (Megha Shetty) ही कन्नड टीव्ही आणि सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मेघाची जोथे जोलाई ही मालिका चांगलीच गाजली होती. ट्रायबल रायडींग आणि दिलपसंद या सिनेमातही मेघाने काम केले आहे. कन्नड इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त अभिनेत्री म्हणून मेघाचे नाव घेतले जाते. 


'सोशल मीडिया स्टार' नील सालेकरकडून चाहत्यांना खास गिफ्ट; 'जिंकलो' गाणं रिलीज


सोशल मीडियावरील (Social Media) स्टार असणारा नील सालेकर (Neel Salekar) हा इन्स्टाग्रामवर नेहमी आपल्या चाहत्यांसाठी वेगवेगळा कंटेन्ट घेऊन येत असतो. त्या नीलचं एक भन्नाट गाणं रिलीज झालं आहे. नील सालेकर उर्फ जस्ट नील थिंग्सने गली गँगच्या डी'इव्हिल आणि कांचनसोबत 'जिंकलो' हे गाणं रिलीज केले आहे. वाढदिवसाचं औचित्य साधत नीलनं त्याच्या चाहत्यांना हे गिफ्ट दिलं आहे. इंस्टाग्रामवर एक मिलियनचा टप्पा नीलनं पार केला. याचं सेलिब्रेशन करत नीलने त्याच्या मित्रांसोबत मिळून हे गाणं तयार केलं.


ब्रह्मास्त्रमधील 'देवा देवा' गाणं होणार रिलीज; पाहा टीझर


प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि  आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा  'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटामधील केसरिया (Kesariya) हे गाणं 17 जुलै रोजी रिलीज झालं. आता या चित्रपटामधील 'देवा देवा' (Deva Deva) या गाण्याचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. गाण्याच्या टीझरमध्ये रणबीर, आलियाला आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे दिसत आहेत.


'या' भूमिकेसाठी घेतले 12 कोटी? करीनानं दिलेल्या उत्तरानं वेधलं अनेकांचे लक्ष


गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की, सीता ही भूमिका करीना साकारणार आहे. एका रिपोर्टनुसार, बाहुबली या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे लेखक विजयेंद्र प्रसाद हे  सीता: द इनकार्नेशन या चित्रपटाचं शूटिंग करणार आहेत. हा चित्रपट पाच वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय विजयेंद्र प्रसाद यांनी घेतला आहे, असं म्हटलं जात आहे. एका रिपोर्टनुसार सीता ही भूमिका साकारण्यासाठी करीनानं 12 कोटींची डिमांड केली. ज्यामुळे तिला अनेकांनी ट्रोल केलं. या सर्व गोष्टींवर करीनानं प्रतिक्रिया दिली की, या चित्रपटाची तिला ऑफर देखील आली नाही.


Aboli : ‘अबोली’ मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; साकारणार वकिलाची भूमिका


स्टार प्रवाहवरील ‘अबोली’ (Aboli) मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. सोहमच्या खुनाचा आरोप अबोलीवर आहे. अबोलीने खरंच हा खून केलाय की तिला विनाकारण यात अडकवलं जातंय याची उकल मालिकेच्या पुढील भागांमधून होईलच. पण सध्या खुनाचं हे नाट्य कोर्टापर्यंत येऊन पोहोचलं आहे.अबोलीच्या बाजून केस लढणार आहे नामांकित वकील अजिंक्य राजाध्यक्ष. सुप्रसिद्ध अभिनेता गौरव घाटणेकर (Gaurav Ghatnekar) हा अजिंक्य राजाध्यक्ष ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.