Entertainment News Live Updates 4 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Sep 2022 02:33 PM
चारू असोपा-राजीव सेनने शेअर केले सुंदर फॅमिली फोटो!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण, आता असे दिसतेय की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तसेच, दोघांमधील वाद देखील मिटले आहेत. चारू आणि राजीव यांनी पॅचअप केले आहे. नुकतेच त्यांनी सुंदर फॅमिली फोटो शेअर केले आहेत.


 





अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या घरी गौराईचं आगमन!

'विक्रम वेधा'चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ दिवशी रिलीज होणार चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर!

अंबानींनच्या गणपतीला दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची हजेरी!

शहरात घडणाऱ्या क्रूर घटनांचा छडा लावण्यासाठी अक्षय कुमार पुन्हा एकदा खाकी वेशात! कसा आहे ‘कटपुतली’?

कधीकाळी लागोपाठ हिट चित्रपट देणाऱ्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) मागे आता ‘फ्लॉप’चा ससेमिरा लागला आहे. सतत तीन चित्रपट सपाटून आपटल्यानंतर आता धसका घेत अक्षयचा नवा चित्रपट ओटीटीवर रिलीज करण्यात आला आहे. साऊथच्या ‘रत्सासन’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकला अक्षय कुमारच्या ‘कटपुतली’ला (Cuttputlli) ओटीटीवर प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्स अशा तिन्ही घटकांचं मिश्रण असणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवटपर्यंत तर नेलं. पण, अचानक शेवटाला हा चित्रपट सोडून दिल्यासारखा वाटला. चला तर, जाणून घेऊया हा कसा आहे हा चित्रपट...


वाचा संपूर्ण रिव्ह्यू

कार्तिक-कियाराच्या 'सत्य प्रेम की कथा'च्या शूटिंगला सुरुवात!

सोनालीच्या कुटुंबाकडून गोवा पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह, सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी हायकोर्टात जाणार!

सोनाली फोगाट यांचे नातेवाईक विकास सिंघमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, त्यांनी सीबीआय चौकशीसाठी भारताचे मुख्य न्यायाधीश यूयू ललित यांना पत्र लिहिले आहे. ते म्हणाले, 'गोवा पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु नाहीये. त्यामागे राजकीय दबाव हे कारण असू शकतो, असे आम्हाला वाटते. त्यामुळे आता आम्ही गोवा उच्च न्यायालयात जाणार आहोत आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणार आहोत.’


 





'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्री राधा सागर रमली गणपती बाप्पांच्या सेवेत

लावणी महाराष्ट्राची ओळख, या कलेला गालबोट लावू नका! अमृता खानविलकरचं चाहत्यांना आवाहन

मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातील अमृताची लावणी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडली. परळीच्या नाथ प्रतिष्ठान आयोजित केलेल्या वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये नुकताच अमृता खानविलकरचा लावणी परफॉर्मन्स ठेवण्यात आला होता. मात्र, हा परफॉर्मन्स सादर केल्यानंतर सदर गणेशोत्सव मंडळावर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता अमृता खानविलकर हिने चाहत्यांना आणी प्रेक्षकांना आपल्या महाराष्ट्राच्या कलेला बदनाम करू नका, असे आवाहन केले आहे.


वाचा संपूर्ण बातमी 

‘कौन बनेगा करोडपती 14’च्या मंचावर कॉमनवेल्थ गेम्स विजेत्यांचा सन्मान, साइखोम मीराबाई चानूंसह निखत झरीन खेळणार खेळ!

अलीकडे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील भारताच्या कामगिरीचा गौरव करत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 14 मध्ये येत्या आठवड्यात या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणार्‍या साइखोम मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) आणि निखत झरीन (बॉक्सिंग) यांचे हॉटसीटवर स्वागत करण्यात येणार आहे.


 





बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, ‘बॉबी’मधून जिंकली प्रेक्षकांची मनं!

दिवंगत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांचा जन्म 04 सप्टेंबर 1952 रोजी मुंबईत झाला. हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनयाचा वारसा असणाऱ्या प्रसिद्ध कपूर कुटुंबात ऋषी कपूर जन्मले. त्यामुळे मनोरंजनाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं.


वाचा संपूर्ण बातमी


 





Superstar Singer 2 Winner: दणक्यात पार पडला ‘सुपरस्टार सिंगर 2’चा महाअंतिम सोहळा, मोहम्मद फैज ठरला विजेता!

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय शो ‘सुपरस्टार सिंगर 2’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. स्पर्धक मोहम्मद फैज याने या पर्वाची ट्रॉफी जिंकली आहे. सोनी टीव्हीच्या या सिंगिंग रिअॅलिटी शो ‘सुपरस्टार सिंगर 2’ला अखेर तीन महिन्यांच्या तगड्या स्पर्धेनंतर आपला विजेता मिळाला आहे. जोधपूरच्या मोहम्मद फैजने या शोचे विजेतेपद जिंकत लोकांच्या प्रेमासोबत 15 लाख रुपये बक्षीस म्हणून जिंकले आहेत.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार सुबोध भावे; दिवाळीत देशभरात घुमणार शिवगर्जना


'हर हर महादेव' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून या सिनेमात कोणते कलाकार असतील याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकतचं या सिनेमाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'हर हर महादेव' या सिनेमात बहुआयामी अभिनेता सुबोध भावे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे.


'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून सुरुवात


'जम्मू फिल्म फेस्टिव्हल'ला आजपासून (3 सप्टेंबर) सुरुवात झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात 15 देशांतील 54 सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. जम्मूत सप्टेंबर 2019 मध्ये पहिल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनामुळे गेलं दोन वर्ष हा महोत्सव झाला नव्हता. पण यंदा मात्र जल्लोषात महोत्सव पार पडणार आहे.


31 वर्षानंतर 'चारचौघी' नाटकाचा रंगभूमीवर प्रयोग


मराठी नाट्यविश्वात सध्या नवे-नवे प्रयोग होत आहेत. अनेक दर्जेदार नाटकांचे प्रयोग सध्या रंगभूमीवर होत आहेत. सध्या सुरू असलेल्या नाटकांना नाट्यरसिक उत्तम प्रतिसाद देत आहेत. नाटकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने लवकरच रंगभूमीवर एक नवीन नाटक येणार आहे. 'चारचौघी' असे या नाटकाचे नाव आहे.


'ब्रह्मास्त्र'ने रिलीजआधीच केला रेकॉर्ड


बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा आगामी 'ब्रम्हास्त्र' सिनेमा 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. रिलीजआधीपासूनच हा सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. शुक्रवारी या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली असून सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना महामारीनंतर हा सिनेमा चांगली कमाई करू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.


रश्मिका आणि बिग बींच्या ‘गुडबाय’चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला!


बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन सध्या प्रचंड चर्चेत आहेत. त्यांच्याकडे सध्या अनेक नव्या चित्रपटांची रांग लागली आहे. अमिताभ बच्चन यांना रुपेरी पडद्यावर पाहणे नेहमीच रोमांचक असते. नुकतीच ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील त्यांची झलक प्रेक्षकांनी पाहिली होती. आता बिग बींनी चाहत्यांना आणखी एक खास भेट दिली आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर आगामी चित्रपट ‘गुडबाय’चे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये त्यांच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदनादेखील झळकली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.