Entertainment News Live Updates 4 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 04 Dec 2022 02:50 PM
Tumchi Mulgi Kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' आता बंगाली भाषेत डब होणार

Tumchi Mulgi kay Karte : 'तुमची मुलगी काय करते' (Tumchi Mulgi kay Karte) ही वेगळ्या धाटणीची मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. चित्तथरारक अशा या  मालिकेत अनेक रंजक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत. आता ही मालिका बंगाली भाषेत डब होणार आहे. 





Aamir Khan : वडिलांना पाहून दु:ख व्हायचं : आमिर खान


Aamir Khan : नुकत्याच एका मुलाखतीत बालपणीच्या आठवणींना उजाळा देत आमिर म्हणाला,"माझ्या वयाच्या दहाव्या वर्षी आम्हाला आर्थिक चणचणीचा सामना करावा लागला होता. एका सिनेमाच्या निर्मितीसाठी वडिलांनी बॅंकेतून कर्ज घेतलं होतं. पण त्यानंतरही त्यांना त्या सिनेमाची निर्मिती करता आली नाही. तसेच ते कर्ज फेडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली". 

'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; माधुरी दीक्षितनं ‘मेरा दिल ये पुकारे’ गाण्यावरील डान्सचा ट्रेंड फॉलो केल्यानं नेटकरी संतापले

Madhuri Dixit: पाकिस्तानमधील आयेशा नावाच्या तरुणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, आयेशा ही लता मंगेशकर यांच्या 'मेरा दिल ये पुकारे आजा' या गाण्यावर डान्स करत आहे. आयेशाचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर 'मेरा दिल ये पुकारे आजा' डान्स करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल झाला. या ट्रेंडला अनेक नेटकऱ्यांनी तसेच सेलिब्रिटींनी फॉलो केलं. आता हा ट्रेंड बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितनं  (Madhuri Dixit) देखील फॉलो केला आहे. माधुरीनं 'मेरा दिल ये पुकारे आजा' गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला कमेंट करत अनेक नेटकरी माधुरीला ट्रोल करत आहेत. 



Sayali Sanjeev : सायली संजीवच्या उपस्थितीत दादरमध्ये रंगली बाईक रॅली

Sayali Sanjeev On Goshta Eka Paithanichi : 'गोष्ट एका पैठणीची' (Goshta Eka Paithanichi) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी दादरमध्ये खास बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भरजरी पैठणी, मराठमोळा साजश्रृंगार करुन बाईकस्वारी करायला निघालेल्या महिलांनी शनिवारी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क परिसर दुमदुमला होता. 





Kochu Preman: मल्याळम अभिनेते कोचु प्रेमन यांचे निधन; केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

Kochu Preman: मल्याळम चित्रपटसृष्टीतील आणि छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेतेकोचु प्रेमन (Kochu Preman) यांचे शनिवारी (3 डिसेंबर) निधन झाले. वयाच्या 68 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोचु प्रेमन यांच्या निधनानं मल्याळम मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोचु प्रेमन यांनी नाटकामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात विनोदी भूमिका साकारल्या. तसेच अनेक मल्याळम मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. 



Fu Bai Fu : टीआरपी मिळत नसल्याने महिन्याभरातच 'फू बाई फू' घेणार प्रेक्षकांचा निरोप

Fu Bai Fu : 'फू बाई फू' (Fu Bai Fu) हा छोट्या पडद्यावरील कार्यक्रम सध्या चर्चेत आहे. नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण या कार्यक्रमाला चांगला टीआरपी मिळत नसल्याने चॅनलने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. टीआरपीच्या शर्यतीत हा कार्यक्रम पहिल्या 30 मालिकांमध्येदेखील नाही. 





Akshaya Hardeek Wedding : "मला माझ्या लग्नात नऊवारी, खोपा, दागिने..."; लग्नानंतर पाठकबाईंची पोस्ट चर्चेत

Akshaya Hardeek Wedding : लग्नानंतर अक्षयाने लग्नसोहळ्याचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत एक खास पोस्ट लिहिली आहे. अक्षयाने लिहिलं आहे,"मला माझ्या लग्नात अगदी पारंपरिक लूक करायचा होता. नऊवारी, खोपा, पारंपारिक दागिणे सर्व काही पारंपरिक... कारण मला आवडतं". 





Salman Khan : 'किसी का भाई किसी की जान'मधील भाईजानचा हटके लूक समोर

Salman Khan On Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) बहुचर्चित 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता या सिनेमातील भाईजानचा लूक समोर आला आहे. 





Gangubai Kathiawadi : आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' ऑस्करच्या शर्यतीत?

Gangubai Kathiawadi : 'ऑस्कर' (Osar) हा सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. यंदा 'द कश्मीर फाइल्स' आणि 'आरआरआर' या सिनेमांना ऑस्करसाठी न पाठवता 'छेल्लो शो' या गुजराती सिनेमाला ऑस्करसाठी पाठवल्याने अनेक वाद झाले. आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमाला पुढील ऑस्करसाठी पाठवण्याची तयारी सुरू असल्याचं समोर आलं आहे. 





Shashi Kapoor Death Anniversary : दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची कारकीर्द जाणून घ्या..

Shashi Kapoor : बॉलिवूडचा 'चॉकलेट हिरो' म्हणून लोकप्रिय असलेले शशी कपूर (Shashi Kapoor) त्यांच्या हास्यासाठीदेखील लोकप्रिय होते. 40 च्या दशकात त्यांनी सिनेसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली. पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर यांच्यामुळे त्यांना घरातच अभिनयाचा वारसा मिळाला होता. शशी कपूर यांचे खरे नाव बलबीर राज कपूर होते.


Shashi Kapoor Death Anniversary : राज कपूर यांची 'टॅक्सी'...बॉलिवूडचा लिजेंड अभिनेता; दिवंगत अभिनेते शशी कपूर यांची कारकीर्द

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Tharla Tar Mag: 'ठरलं तर मग!' मालिकेमध्ये अमित भानुशाली साकारणार 'ही' भूमिका


Tharla Tar Mag:  छोट्या पडद्यावरील ठरलं तर मग (Tharla Tar Mag) या मालिकेत अभिनेता अमित भानुशाली हा अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.  या भूमिकेसाठी त्याने तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेबाबत अभिनेता अमित भानुशाली यानं सांगितलं. तो म्हणाला, ठरलं तर मग मालिकेत मी अर्जुन सुभेदार ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. ही भूमिका साकारण्यासाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागतेय. आता पर्यंत मी रोमँटिक हिरोची भूमिका साकार प्रवाहसोबत मी मन उधाण वाऱ्याचे ही मालिका केली होती. 9 वर्षांनंतर पुन्हा एकदा या लाडक्या वाहिनीसोबत काम करताना प्रचंड आनंद होत आहे. रली आहे. या मालिकेतील पात्र आजवर साकारलेल्या भूमिकांच्या पूर्णपणे वेगळं आहे. अर्जुन एक नामांकित वकील आहे. खूप कमी बोलणारा आणि कडक शिस्तीचा. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारताना माझी कसोटी लागतेय. आमचे दिग्दर्शक सचिन गोखले मला हे पात्र उभं करण्यासाठी खूप मदत करत आहेत.


पाकिस्तानी चित्रपट 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' ला जगभरातील प्रेक्षकांची पसंती


'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend of Maula Jatt) हा पाकिस्तानी चित्रपट सध्या जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट 13 ऑक्टोबरला रिलीज झाला.  'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' मध्ये अभिनेता फवाद खान (Fawad Khan) आणि अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं जगभरातील बॉक्स ऑफिसवर जवळपास 220 कोटींची कमाई केली आहे. 


'काहीही साम्य नाही'; तुंबाड आणि कांताराची तुलना करणाऱ्यांवर भडकला दिग्दर्शक


फक्त देशातच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या कांतारा (Kantara) या दाक्षिणात्य चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाला आणि चित्रपटाच्या कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटाचा दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचं अनेकांनी कौतुक केलं. कांतारा या चित्रपटाची तुलना तुंबाड (Tumbbad) या चित्रपटासोबत अनेक लोक करत होते. या दोन्ही चित्रपटांची तुलना करणाऱ्यांवर आता दिग्दर्शक आनंद गांधी (Anand Gandhi) भडकला आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.