Ind vs Aus 3rd Test Team India playing 11 : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली होती. पर्थमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला होता, न्यूझीलंडविरुद्धच्या क्लीन स्वीपनंतर टीम इंडिया जोरदार पुनरागमन केले. पण ॲडलेड पिंक बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्सच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीही खराब राहिल्याने त्यांचा दारुण पराभव झाला.






आता तिसरा कसोटी सामना 15 डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत भारतीय संघात प्लेइंग-11 मध्ये काही बदल करण्याची गरज आहे. आर अश्विन आणि हर्षित राणाचा तिसऱ्या सामन्यातून पत्ता कट होऊ शकतो. त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि आकाश दीपला संधी मिळू शकते. 


पर्थमध्ये वॉशिंग्टन सुंदरशी खेळला होता, पण त्याला ॲडलेडमध्ये प्लेइंग 11 मधून वगळले होते. अश्विनला त्याचा अनुभव आणि मैदानावरील चांगल्या कामगिरीच्या जोरावर संधी देण्यात आली. पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही. अश्विनला केवळ 1 विकेट घेता आली आणि दोन्ही डावात फलंदाजी करताना त्याला केवळ 29 धावांचे योगदान देता आले. अशा स्थितीत भारताने पुन्हा एकदा सुंदरकडे वळले पाहिजे, जो गेल्या काही कसोटींमध्ये अश्विनपेक्षा चांगली कामगिरी करत आहे.






ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने आतापर्यंत फक्त हर्षित राणावरच विश्वास दाखवला आहे. पर्थमध्ये पदार्पण करताना त्याने प्रभावित केले परंतु ॲडलेडमध्ये तो खूपच खराब गोलंदाजी करताना दिसला. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीमुळे टीम इंडियाला अपेक्षित असलेल्या बॅटने तो विशेष काही करू शकला नाही. अशा परिस्थितीत मोहम्मद शमीच्या शैलीत गोलंदाजी करणाऱ्या आकाशदीपला भारताने संधी द्यायला हवी. आकाशने भारतातही चांगली कामगिरी केली होती आणि त्याला प्रथम श्रेणी क्रिकेटचाही खूप अनुभव आहे.


हे ही वाचा -


Ind vs Aus 2nd Test : रात गयी, बात गई! सिराज- हेडच्या वादाबाबत विचारताच रोहित शर्मातील मुंबईकर जागा झाला, म्हणाला...


Rohit Sharma : त्याच्यासाठी नेहमी..., टीम इंडियाच्या ढाण्या वाघासाठी रोहित शर्माचा खास संदेश, तिसऱ्या कसोटीत हुकमी एक्का परतणार?