Entertainment News Live Updates 31 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 31 Dec 2022 04:40 PM
Urfi Javed : 'तुमच्यासारखे राजकारणी...'; चित्रा वाघ यांच्या ट्वीटला उर्फीचा रिप्लाय

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली. त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या या ट्वीटला उर्फीनं रिप्लाय दिला आहे. उर्फीच्या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले. 



Tunisha Sharma: अभिनेता शिजान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Tunisha Sharma:  अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणी पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या शिझान खान याला ठाणे मध्यवर्ती तुरुंगात आता आणण्यात आले. तुनिषा प्रकरणात शिजान खानच्या अडचणीत वाढ कोर्टानं सुनावली 14 दिवसांची कोठडी. अभिनेता शिजान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Urfi Javed: सुजलेला चेहरा, डोळ्या खाली काळा डाग; फोटो शेअर करुन उर्फी जावेद म्हणाली, 'मला कोणी मारलं नाही, हे...'

Urfi Javed: आपल्या अतरंगी स्टाईल आणि फॅशनमुळे चर्चेत असणाऱ्या उर्फी जावेदनं (Urfi Javed) नुकताच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केली आहे.  या फोटोमध्ये उर्फीचा चेहरा हा सुजलेला दिसत आहे तर तिच्या डोळ्या खाली काळा डाग दिसत आहे. हा फोटो शेअर करुन उर्फीनं तिच्या आय फिलर्सबाबत सांगितलं. 



Sheezan Khan : शिझान खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Sheezan Khan : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी शिझान खान (Sheezan Khan) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून तो पोलिसांच्या ताब्यात आहे. आता त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 





Janhvi Kapoor : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवासोबत जान्हवी कपूरचं जोडलं जातंय नाव

Janhvi Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. पण सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. जान्हवी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या नातवाला म्हणजेच शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) डेट करत आहे.



Chala Hawa Yeu Dya : 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेता अडचणीत

Ankur Wadhave : फेसबुक (Facebook) हॅक होण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत मनोरंजनसृष्टी संबंधित अनेक कलाकारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. अशातच आता 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) फेम अंकुर वाढवेचं (Ankur Wadhave) फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे.  





Riya Kumari : रिया कुमारी हत्येप्रकरणात नवा ट्वीस्ट; पतीनेच कट रचल्याचा पोलिसांना संशय

Riya Kumari : झारखंड (Jharkhand) येथील लोकप्रिय अभिनेत्री रिया कुमारी (Riya Kumari) हत्येप्रकरणी नवी अपडेट समोर आली आहे. तिच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिच्या पतीला ताब्यात घेतलं आहे. हत्येचा कट पतीनेच रचल्याचा पोलिसांना संशय आहे. 

Urfi Javed: 'हिला तात्काळ बेड्या ठोका'; उर्फी जावेदचा व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांनी केली मुंबई पोलिसांकडे मागणी

Urfi Javed: अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या वेगवेगळ्या अतरंगी लूकमुळे चर्चेत असते. उर्फी ही  अतरंगी लूक करुन फोटोशूट करते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. अनेक लोक उर्फीला तिच्या या फॅशनमुळे ट्रोल करतात तर काही जण तिचं कौतुक देखील करतात. आता नुकतेच भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एक ट्वीट शेअर करुन उर्फी जावेदवर निशाणा साधला आहे. उर्फीला बेड्या ठोका, अशी मागणी या ट्वीटच्या माध्यमातून चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. 


Abhijeet Bichukale : सध्या महाराष्ट्राला माझ्याशिवाय पर्याय नाही : अभिजीत बिचुकले

Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. "माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार", असा दावा अभिजीत बिचुकलेने केला आहे. 

Abhijeet Bichukale : "माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली मुख्यमंत्री करणार", अभिजीत बिचुकलेचा दावा

Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा एका वक्तव्यामुळे तो चर्चेत आला आहे. "माझ्या पत्नीला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करणार", असा दावा अभिजीत बिचुकलेने केला आहे. 

The Legend Of Maula Jatta : 'द लेजेंड ऑफ मौला जट्ट' पाकिस्तानी सिनेमा भारतात प्रदर्शित होणार?

The Legend Of Maula Jatt Release In India : 'ल लेजेंड ऑफ मौला जट्ट' (The Legend Of Maula Jatta) हा पाकिस्तानी सिनेमा 30 डिसेंबरला भारतात प्रदर्शित होणार होता. पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. जगभरात धुमाकूळ घातलेल्या या सिनेमावर भारतात विरोध होत आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Sidharth Kiara Marriage: 'लव्ह बर्ड' सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाचा मुहूर्त ठरला


Sidharth Kiara Wedding Date: बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani)  यांच्या अफेअरच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. या दोघांच्या नात्यांबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे रिपोर्ट्सनुसार पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाला मोजक्याच नातेवाई आणि मित्रापरिवाराला आंत्रित करण्यात आल्याचं समजतेय. सिद्धार्थ अथवा कियारा यांच्याकडून लग्नाबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण नुकतेच दोघांना प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांच्या घरी जाताना पाहिले. त्यानंतर या दोघांच्या लग्नाच्या चर्चा उडायला सुरुवात झाली. 


Animal First Look : रणबीर कपूरच्या 'Animal' सिनेमाची रिलीज डेट जाहीर


Ranbir Kapoor Animal First Look : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) बहुप्रतिक्षीत आगामी सिनेमा 'Animal' चं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. याबरोबरच, निर्मात्यांनी या चित्रपटाबाबत एक मोठी घोषणा केली आहे, ती म्हणजे चित्रपटाचा फर्स्ट लूक 31 डिसेंबरला मध्यरात्री प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरचे चाहते या सिनेमाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत असल्याची माहिती आहे. 


Ghar Banduk Biryani : नागराज मंजुळेंचा बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिर्याणी' लवकरच येणार भेटीला


Ghar Banduk Biryani : 'घर बंदुक बिर्याणी' (Ghar Banduk Biryani) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही महिन्यांपूर्वी या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची उत्सुकता आहे. नुकतेच या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. 'घर बंदुक बिर्याणी' या सिनेमाची निर्मिती नागराज मंजुळे (Nagraj Manjule) करत आहेत. तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा जंगल अवताडेने सांभाळली आहे. या सिनेमात नागराज मंजुळे दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाची निर्मिती करण्यासोबत या सिनेमात अभिनयदेखील केला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.