Nagpur:बंटी शेळके आता तरी थांबा, नाना पटोले विरोधात तुमचे वक्तव्य थांबवा, अन्यथा तुम्हाला जशास तसा उत्तर देऊ, अशा शब्दात नागपूरच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंटी शेळके यांना इशारा दिला आहे. नागपूरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांनी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आणि राज्यात झालेल्या काँग्रेस पक्षाच्या पराभवाचा खापर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या डोक्यावर फोडणे सुरू केले आहे.नाना पटोले आरएसएसचे एजंट असून त्यांनी जाणून बुजून राज्यात काँग्रेसला पराभूत होऊ दिले, असा बंटी शेळके यांचा आरोप आहे.सोमवारी बंटी शेळके यांनी काँग्रेस कार्यालयात शिरून बैठक घेण्याचे प्रयत्न केले होते. मात्र काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस कार्यालयाला कुलूप लावल्यामुळे बंटी शेळके यांनी फूटपाथवरच बैठक घ्यावी लागली होती. त्यावेळी ही बंटी शेळके यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत बंटी शेळके यांना गप्प राहण्याचा इशारा दिला आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी बंटी शेळकेंना दिली तंबी
तुम्हाला जी तक्रार करायची आहे, ती पक्षाच्या अंतर्गत बैठकीत करा, प्रसारमाध्यमांमध्ये जाऊन प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्ष च्या विरोधात बोलले तर आम्ही पण गप्प बसणार नाही. नाना पटोले विरोधात बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.बंटी शेळके यांना मिळालेले 80 हजार मतं काँग्रेस कार्यकर्त्यांची मेहनत आहे त्यामुळे मध्य नागपूर मध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचं काम केलं नाही असा खोटा आरोप शेळके यांनी करू नये असंही काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा म्हणणं आहे... बंटी शेळकेच्या वागणुकीमुळे नागपुरातील काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते नाराज होते. बंटी शेळके खुद्द सर्वात निष्क्रिय नेते असून नगरसेवक म्हणून काहीच काम केले नाही मग लोकं त्याला मतदान कसं करतील असा सवालही काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
बंटी शेळके काय काय म्हणाले होते?
हस्तक्षेप करून मला उमेदवारी देण्यात आली. हे नाना पटोले यांना पटले नाही. त्यामुळे आपल्या विश्वासातील काही नेते आणि कार्यकर्त्यांमार्फत त्यांनी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांना त्यांना मदत पुरवली. याशिवाय, बंटी शेळके यांनी नाना पटोलेंवर उमेदवारी विकल्याचाही आरोप केला होता. बंटी शेळके म्हणाले, राहुल गांधी यांनी उमेदवारी दिल्याने मी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार होतो. पंजा चिन्हावर लढलो. असे असतानाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात एकट्याच्या बळावर निवडणूक लढावी लागली. प्रचारात संघटनेची मदत झाली नाही. पटोलेंनी या मतदारसंघात प्रचारासाठी नेत्यांना पाठवले नाही. ते स्वतः ही प्रचारासाठी आले नाही. कुठलीही मदत केली नाही, अशा शब्दात बंटी शेळके यांनी नेत्यांच्या उपस्थितीत पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती..