Rajputana Biodiesel :राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओची दमदार लिस्टींग, गुंतवणूकदारांची जोरदार कमाई , 90 टक्के रिटर्नमुळं पैसाच पैसा
राजपुताना बायोडिझेलच्या एसएमई आयपीओचं नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर दमदार लिस्टींग झालं आहे. या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीओ लिस्ट होताना राजपुताना बायोडिझेलच्या शेअरची किंमत 247 रुपये होती. ती थोड्याच वेळात 259 रुपयांवर पोहोचली. म्हणजेच गुंतवणूकदारांना 99.5 टक्के परतावा मिळाला आहे.
राजपुताना बायोडिझेलच्या आयपीओच्या एका शेअरची किंमत 130 रुपये निश्चित करण्यात आली होती. एखाद्या गुंतवणूकदाराला एका लॉटमध्ये बोली लावायची असल्यास 1 हजार शेअर घ्यावे लागणार होते.
राजपुताना बायोडिझेल एसएमई आयपीओच्या एका लॉटसाठी किमान123000 ते कमाल 130000 रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. राजपुताना बायोडिझेलचा आयपीओ 700 पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीनं 24.70 कोटी रुपयांच्या उभारणासाठी 1900000 शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला होता.
राजपुताना बायोडिझेलचे प्लांट राजस्थानमध्ये आहेत. ज्या गुंतवणूकदाराला 130 च्या एका शेअर प्रमाणं ज्यांनी बोली लावली असेल त्यांना एका दिवसात 1 लाख 29 हजार 350 रुपयांचा फायदा झाला.