मुंबई : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज आहेत. एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याची शक्यता असल्याचे वक्तव्य त्यांचे प्रवक्ते करत आहेत. एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही, असे वक्तव्य रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (सचिन खरात गट) राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केले आहे. 


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे असलेले मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहे. तर राज्याच्या गृहखात्यावरुन भाजप (BJP) आणि शिंदेंच्या शिवसेनेत (Shiv Sena Shinde Faction) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे बोलले जात आहे. त्यातच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यानंतर एकनाथ शिंदे हे मोठा निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी केले होते. यावरून सचिन खरात यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. 


नेमकं काय म्हणाले सचिन खरात?  


सचिन खरात यांनी म्हटलंय की, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना चालू केल्यानेच महायुतीला यश मिळाल्याची चर्चा राज्यामध्ये आहे. निकालाला इतके दिवस होऊन सुद्धा आजतागायत महायुतीचे सरकार स्थापन झालेले नाही. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, असं त्यांचे प्रवक्ते बोलत आहेत. म्हणूनच आमचं मत आहे की, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वाभिमानी असतील तर सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील होणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. 


महायुतीतील खातेवाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार? 


दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्यामुळे ते साताऱ्यातील दरे गावात विश्रांतीसाठी गेले होते. यामुळे महायुतीच्या बैठका रखडल्याचे दिसून आले होते. मात्र रविवारी एकनाथ शिंदे दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी परतले. त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नसल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेतली. यांच्या सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. त्यातच सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चादेखील झाली. या चर्चेनंतर मंगळवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत चर्चेला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे. आता महायुतीतील खातेवाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  


आणखी वाचा 


आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करुन दाखवलंय, कशा रितीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य