Entertainment News Live Updates 30 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 30 Nov 2022 05:17 PM
Arjun Kapoor: मलायकाच्या प्रेग्नन्सीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर भडकला अर्जुन, म्हणाला, 'आमच्या वैयक्तिक आयुष्याशी...'

Arjun Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरु असते. दोघेही एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. गेल्या काही दिवसांपासून मलायकाच्या प्रेग्नन्सीबाबत सोसल मीडियावर चर्चा सुरु आहे. मलायकाच्या प्रेग्नन्सीबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर आता अर्जुन हा भडकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन अर्जुननं अफवा पसरवणाऱ्यांना सुनावलं आहे. 


Ayushmann Khurrana: आयुष्मान खुरानानं शेअर केला खास फोटो

Ayushmann Khurrana: अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'एन एक्शन हीरो' (An Action Hero) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं सध्या आयुष्मान प्रमोशन करत आहे. नुकताच आयुष्माननं एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो फुल और कांटे या चित्रपटातील अजय देवगणच्या स्टंटप्रमाणेच स्टंट करताना दिसत आहे. 





Kiara Advani Siddarth Malhotra : कियारा अन् सिद्धार्थ जानेवारीत घेणार सात फेरे?

Kiara Advani Siddarth Malhotra : कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यामुळे त्यांच्या लग्नाची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अशातच कियारा आणि सिद्धार्थ येत्या जानेवारीत सात फेरे घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. पण मीडिया रिपोर्टनुसार, कियारा आणि सिद्धार्थ जानेवारी महिन्यात लग्नबंधनात अडकणार नाहीत.

Bigg Boss Marathi 4 : तेजस्विनी लोणारीला सोडावं लागणार बिग बॉसचं घर

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व सध्या विविध कारणाने चर्चेत आहे. एका टास्कदरम्यान तेजस्विनी लोणारीला (Tejaswini Lonari) दुखापत झाली आहे. त्यामुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला घर सोडावं लागणार आहे. 





Raveena Tondon: 'आम्ही वाघिणीच्या वाटेत आलो नाही'; वाघिणीचं फोटोशूट केल्या प्रकरणी रवीना टंडनचं स्पष्टीकरण

Raveena Tondon: रवीना सध्या एका फोटोशूटमुळे अडचणीत अडकली आहे. रवीना टंडननं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन वाघिणीच्या फोटोशूटबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. 'काही वृत्तवाहिन्यांनी आम्ही वाघिणीच्या जवळ गेल्याचं दाखवलं, मात्र आम्ही परवानाधारक गाईड आणि गाडीतून गेलो होतो. त्यांना सगळ्या सीमा माहिती असतात. वाघ राजासारखा फिरत असतो आपण केवळ मूकप्रेक्षक असतो. आपली एखादीही अचानक केलेली हालचाल त्यांना विचलीत करु शकते. आमच्या सुदैवाने आम्ही कोणतीही हालचाल केली नाही.  आम्ही शांतपणे केटी वाघिणीला पाहात राहिलो. आम्ही तिच्या वाटेत आलो नाही. यापूर्वी केटी वाघीण पर्यटकांच्या वाहनांजवळ येण्याच्या घटना घडल्या आहेत.' असं रवीनानं म्हटलंय.

Phulala Sugandh Maticha : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेचं होणार पुन:प्रसारण

Phulala Sugandh Maticha : 'फुलाला सुगंध मातीचा' (Phulala Sugandh Maticha) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील ही मालिका नेहमी पहिल्या तीन क्रमांकावर असते. पण आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे चॅनलने या मालिकेचं पुन:प्रसारण करण्याचा निर्णय घेतला आहे. 





The Kashmir Files : इस्त्राइलच्या राजदूतांनी नदाव लॅपिडवर साधला निशाणा

The Kashmir Files : 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाताचे ज्यूरी नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांचं 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाबाबतचं वक्तव्य चांगलचं गाजलं. त्यांच्यावर आता भारतातील इस्त्राइलचे राजदूत नाओर गिलॉन (Naor Gilon) यांनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी भारतीयांची माफीदेखील मागितली आहे. 





Akshaya-Hardeek Wedding : वेडिंग वालं घर सजलं; राणादाच्या हातावर पाठकबाईंच्या नावाची मेहंदी

Akshaya-Hardeek Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी येत्या 2 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. अक्षया आणि हार्दिकच्या लग्नापूर्वीच्या विधींना आता सुरुवात झाली आहे. केळीचे खांब आणि फुलांनी हार्दिकचं लग्नघर सजवण्यात आलं आहे. हार्दिक आणि अक्षयाच्या मेहंदी सोहळ्यातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 





Pallavi Joshi: 'हा लोकांचा चित्रपट...'; 'द कश्मीर फाइल्स'च्या वादानंतर पल्लवी जोशी यांची पोस्ट

Pallavi Joshi: प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांनी  द कश्मीर फाइल्स (The Kashmir Files)या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. हा चित्रपट सध्या चर्चेक आहे.  53 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच गोव्यात पार पडला. दरम्यान नदाव लॅपिड (Nadav Lapid) यांनी 'द कश्मीर फाइल्स' सिनेमासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. ते म्हणाले,"द कश्मीर फाइल्स' या सिनेमाचा 'इफ्फी' सारख्या महोत्सवात समावेश होणं ही धक्कादायक बाब आबे. तसेच हा सिनेमात प्रपोगंडा आणि वल्गर सिनेमा आहे". त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. नदाव लॅपिड यांच्या वक्तव्यावर आता पल्लवी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 



Rana Daggubati: 'लोक साऊथ चित्रपटांची खिल्ली उडवायचे'; राणा दग्गुबातीनं दाक्षिणात्य चित्रपटांबाबत सांगितलं

Rana Daggubati: दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबातीचा(Rana Daggubati) चाहता वर्ग मोठा आहे. राणाला बाहुबली (Baahubali) या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भल्लाल देव ही भूमिका राणानं साकारली. नुकताच राणाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये राणा हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबाबात बोलताना दिसत आहे.



Raveena Tondon : रवीना टंडनच्या अडचणीत वाढ

Raveena Tondon : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या (Raveen Tondon) अडचणीत वाढ झाली आहे. रवीनाने नुकतीच ताडोबाची सैर केली आहे. या सफारीदरम्यानचे तिचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये रवीना वाघाच्या जवळ जाताना दिसत आहे. वाघाच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न केल्याने रवीनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. 





Drishyam 2 Box Office Collection : अजय देवगणचा 'दृश्यम 2' 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील

Drishyam 2 Box Office Collection : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) सध्या बहुचर्चित 'दृश्यम 2' (Drishyam 2) या सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 12 दिवस पूर्ण झाले असले तरीही या सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर कायम आहे. आता हा सिनेमा 150 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. 





Vivek Agnihotri : 'द कश्मीर फाइल्स'च्या वादादरम्यान विवेक अग्निहोत्रींची मोठी घोषणा

Vivek Agnihotri On The Kashmir Files Unreported : 'द कश्मीर फाइल्स'च्या (The Kashmir Files) वादादरम्यान दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट करत 'द कश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड' (The Kashmir Files Unreported) बनवणार असल्याची माहिती दिली आहे.



Prabhas Kriti Sanon Relationship : क्रिती सेनन दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या प्रेमात? चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन

Prabhas Kriti Sanon Relationship : बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेननचा (Kriti Sanon) 'भेडिया' (Bhediya) सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अशातच क्रिती सध्या दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभाससोबतच्या (Prabhas) अफेरच्या चर्चांमुळे चर्चेत आहे. प्रभास आणि क्रितीच्या अफेरची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान आता क्रितीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या सर्व चर्चांवर मौन सोडलं आहे. 


पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळविणाऱ्या मराठी सिनेमांना आता दुप्पट अनुदान  


Mumbai News:  गेल्या काही वर्षात मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावर विविध विभागात पुरस्कार मिळत आहेत. या मराठी सिनेमांना राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारे प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.  सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली  चित्रपट उद्योगातील चित्रपट, टिव्ही, ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते, तंत्रज्ञ यांच्या समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुनगंटीवार म्हणाले की, प्रोत्साहन अनुदान दुप्पट करण्यामागे महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय  आणि राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार विजेते चित्रपट  अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे आणि या चित्रपट  निर्मात्यांनी अधिक चांगल्या सिनेमाची निर्मिती भविष्यात करावी हा उद्देश आहे. मराठी चित्रपटांना प्रतिष्ठा मिळावी, प्राईम स्लॉट मिळावा यासाठी लवकरच महाराष्ट्रातील मल्टिप्लेक्स मालकांसोबत बैठक घेण्यात येईल.


Bigg Boss 16 : 'बिग बॉस'च्या घरात 'गोल्डन बॉईज'ची दमदार एन्ट्री


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो बिग बॉस 16 हा टीआरपीच्या शर्यतीत अव्वल शो पैकी एक आहे. आजकाल हा शो सर्वांचा आवडता झाला आहे. या शो ला अधिक रंजक बनविण्यासाठी, बिग बॉसच्या घरात दोन वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार आहेत. आणि हे वाईल्ड कार्ड स्पर्धक दुसरे कोणी नसून गोल्डन बॉईज म्हणून प्रसिद्ध असलेले सनी नानासाहेब वाघचौरे आणि संजय गुजर आहेत.


Vikram Gokhale: दिवंगत अभिनेते विक्रम गोखले यांच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित


Vikram Gokhale: काही कलाकार आपल्या उपस्थितीनं वातावरणात नवचैतन्य निर्माण करतात, पण काही अनुपस्थितीतही आपली उणीव भासू देत नाहीत. ते गेले तरी त्यांचं काम कायम बोलत रहातं. असाच काहीसा अनुभव सध्या मनोरंजन विश्व घेत आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले यांनी जरी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात ते कायम रसिकांसोबत राहणार आहेत. याच शोकाकूल वातावरणात सिनेरसिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांनी अभिनय केलेला 'सूर लागू दे'  (Sur Lagu De) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर 'सूर लागू दे'च्या पोस्टरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.