Entertainment News Live Updates 29 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Aug 2022 11:58 PM
Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' मालिकेत उत्कर्ष शिंदे साकारणार संत चोखामेळा

Dnyaneshwar Mauli : 'ज्ञानेश्वर माउली' (Dnyaneshwar Mauli) या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडवत भक्तिरसात तल्लीन केलं आहे. माउली आणि त्यांची भावंडं यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, श्रीसार्थ ज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या आहेत. आता या मालिकेत उत्कर्ष शिंदे (Utkarsh Shinde) संत चोखामेळांच्या भूमिकेत दिसून येणार आहे. 

Ketaki Chitale : केतकी चितळेचं फेसबुकवर कमबॅक

Ketaki Chitale : अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे केतकीला तुरुंगवास भोगावा लागला होता. तसेच तिला तिच्या फेसबुक अकाऊंटचा वापर करण्यालाही मनाई करण्यात आली होती. पण आता तिला तिचं फेसबुक अकाऊंट परत मिळाले आहे. 

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज क्वॉरंटाईनचा शेवटचा दिवस आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीतदेखील सुधारणा होत आहे. अमिताभ यांनी दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याची माहिती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. 

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या सीझनचा प्रोमो आऊट

Bigg Boss Marathi : 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चाहते या कार्यक्रमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोमध्ये महेश मांजरेकर  (Mahesh Manjrekar) राग शांत करण्याच्या 101 उपायांविषयी बोलत आहेत. 





करीना कपूरनं शेअर केला बॅडमिंटन खेळतानाचा व्हिडीओ

वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या मुलाने सुरु केला बिझनेस! अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिली माहिती

दिमाखात पार पडला ‘प्रवाह पिक्चर पुरस्कार नामांकन सोहळा 2022’, दिग्गजांची खास उपस्थिती!

न्यूड फोटोशूट प्रकरणी अभिनेता रणवीर सिंह पोलिसांसमोर हजर, जबाब नोंदवताना लीगल टीमही सोबत!

अभिनेता आज (29 ऑगस्ट) चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये सकाळी 7 वाजता हजर झाला होता. यावेळी जवळपास दोन तास त्याची चौकशी आणि जबाब नोंदणी प्रक्रिया सुरु होती. यावेळी त्याची लीगल टीम देखील त्याच्या सोबत पोलीस स्टेशनला हजर होती. या दरम्याने त्याने पोलिसांना त्यांच्या कामात सहकार्य केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विदेशी कंपनीसोबत या फोटोशूटसंदर्भात झालेल्या काँट्रॅक्टची माहिती देखील रणवीर सिंहने (Ranveer Singh) पोलिसांना दिली. याशिवाय येत्या काळातही गरज पडल्यास पोलिसांना सहकार्य करण्याचं आश्वासन अभिनेत्याने दिलं आहे.


 





कार्तिक आर्यननं शेअर केला खास व्हिडीओ

वीकेंडलाही थिएटरवर शुकशुकाट! बॉक्स ऑफिसवर ‘लायगर’ची अवस्था बिकट

दिग्दर्शक पुरी जगन्नाथ यांचा 'लायगर' (Liger) हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला. मात्र तरीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची कमाई 50 टक्क्यांनी कमी झाली. तिसऱ्या दिवशी कमाईचे आकडे 60 टक्क्यांपर्यंत खाली आले आणि आता चौथ्या दिवशी त्याची स्थिती आणखी बिकट झाली आहे.


वाचा संपूर्ण बातमी 

मंगळागौरसाठी सजल्या श्वेता, अंतरा अन् चित्रा! अभिनेत्री पूर्वाच्या लूकवर खिळल्या नजरा...

Ayushmann Khurrana आणि Ananya Pandey यांचे सेलिब्रेशन

भारत-पाकिस्तान सामन्यात अभिनेत्री उर्वशी रौतेलाची हजेरी! सोशल मीडियावर ट्रोल होतेय अभिनेत्री

उर्वशी रौतेला रविवारी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना पाहण्यासाठी दुबईला पोहोचली होती. मात्र, अभिनेत्रीला स्टेडियममध्ये पाहताच चाहते आश्चर्यचकित झाले होते. अनेकांनी अभिनेत्रीला ट्रोलही करायला सुरुवात केली. यावेळी उर्वशी (Urvashi Rautela) अतिशय गंभीरपणे मॅच पाहताना दिसली.


 





बालकलाकर म्हणून केली करिअरची सुरुवात, आता साऊथचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो नागार्जुन!

Nagarjuna Birthday : अभिनेता नागार्जुनने (Nagarjuna Akkineni) दाक्षिणात्य तसेच, हिंदी चित्रपट विश्वात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. आज (29 ऑगस्ट) नागार्जुन आपला वाढदिवस साजरा करत आहे.


 





'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर; केदार शिंदेंनी केली खास पोस्ट शेअर

 केदार शिंदेंच्या (Kedar Shinde) 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर झाली आहे. 


 





ललित मोदी नव्हे, पुन्हा एकदा ‘एक्स’ बॉयफ्रेंड रोहमनसोबत दिसली सुष्मिता सेन!

सध्या  सुष्मिता ललित मोदी यांना डेट करत आहे. मात्र, आता पुन्हा एकदा ती एक्स बॉयफ्रेंड रोहमनसोबत स्पॉट झाली आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अभिनेते मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांच्याकडून 'दृश्यम 3' ची घोषणा


अभिनेते मोहनलाल यांच्या  दृश्यम या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग रिलीज झाले आहेत. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.  दृश्यम-3 रिलीज होणार की नाही? असा प्रश्न मोहनलाल यांच्या चाहत्यांना पडला होता. आता क्राईम थ्रिलर असणाऱ्या दृश्यम या चित्रपटाचा तिसऱ्या भागाची निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. माझविल एंटरटेनमेंट अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये अँटोनी पेरुम्बावूर यांनी 'दृश्यम-3' बाबत माहिती दिली आहे.


बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 'या' दिवशी पासून होणार सुरू


बिग बॉस मराठी हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चौथ्या सीझनचे दोन प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे हा सीझन कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 25 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


'महाराष्ट्र शाहीर' सिनेमाची रिलीज डेट जाहीर


केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर' (या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केलं आहे. आता या सिनेमाची रिलीज डेटदेखील जाहीर झाली आहे.


अभिनेत्री शिवानी सुर्वेचा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' मधील डॅशिंग लूक


'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या सिनेमातील अभिनेत्री शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक आज शिवानीच्या वाढदिवसानिमित्त रिलीज करण्यात आला आहे. 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' या सिनेमाचं शूटिंग मराठी आणि कन्नड भाषेत झालं असून हा सिनेमा हिंदी, तेलुगु, मल्याळम, तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे. पुढील वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


कोरोनाची लागण झाल्यानंतर अमिताभ बच्चन यांची बदलली लाईफस्टाईल


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते घरीच कोरोनावर उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झाली असली तरी ते सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह आहेत. प्रकृतीसंदर्भात माहिती देणारा एक ब्लॉग त्यांनी लिहिला आहे. आपली सर्व कामं आपण स्वत: करतोय असं ते ब्लॉगच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.