Entertainment News Live Updates 28 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Aug 2022 07:59 PM
Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य आलं यशसमोर

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. अशातच मालिकेत आता नवा ट्विस्ट आला आहे. अविनाश नेहाचा पहिला नवरा असल्याचं सत्य यशसमोर आलं आहे. 

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचा चौथा सीझन 'या' दिवशी पासून होणार सुरू

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. चौथ्या सीझनचे दोन प्रोमो आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे हा सीझन कधी सुरू होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 25 सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पुण्यात फ. मु. शिंदे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात

पुण्यात फ. मु. शिंदे लिखित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व सुशीकुमार शिंदे यांनी हजेरी लावली आहे. 

केदार शिंदेंच्या 'महाराष्ट्र शाहीर'ची रिलीज डेट जाहीर

'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर झालीए. 28 एप्रिल 2023 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. या सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणारे. तर शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 

'दृश्यम 3' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता मोहनलालच्या दृश्यमने प्रेक्षकांची मनं जिंकलीयत. आतापर्यंत या सिनेमाचे दोन भाग प्रदर्शित झाले असून दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळालीए. त्यामुळे  'दृश्यम-3' रिलीज होणार की नाही? असा प्रश्न मोहनलालच्या चाहत्यांना पडलेला असताना निर्मात्यांनी यासंदर्भात अधिकृत घोषणा केलीए. माझविल एंटरटेनमेंट अवॉर्ड्सदरम्यान निर्मात्यांनी 'दृश्यम-3' लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलय. त्यामुळे सध्या Drishyam 3 हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करतोय.

आलियाचे 'गंगूबाई' आणि 'आरआरआर' ऑस्करच्या शर्यतीत? कोणता सिनेमा मारणार बाजी?

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा  'गंगुबाई काठियावाडी' हा सिनेमा ऑस्करच्या शर्यतीत समाविष्ट झाला आहे. या सिनेमाला ऑस्कर नामांकन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे आलियाचा 'आरआरआर' हा सिनेमादेखील ऑस्करच्या शर्यतीत आहे. त्यामुळे आलिया भट्टचा कोणता सिनेमा ऑस्करसाठी नामांकित होणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानानं शेअर केला खास व्हिडीओ

Liger : विजय देवरकोंडाची बॉक्स जादू ऑफिसवर नाहीच; जाणून घ्या लायगरच कलेक्शन

लायगरचे बॉक्स ऑफिस कलेक्शन


रमेश बाला यांनी एका ट्वीट शेअर केला आहे. या ट्वीटमध्ये रमेश बाला यांनी लायगर या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत माहिती दिली.  शनिवारी या चित्रपटानं जवळपास 4.10 ते 4.50 कोटींची कमाई केली. लायगर या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 33.12 कोटींची कमाई केली. तर पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कमाईत जवळपास 50 टक्के घसरण झाली. या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी 16 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली. आता रविवारी या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस किती झालं? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळेल.

ओ शेठ आणि लय गुणाची हाय या गाण्यांच्या सुपरहिट यशानंतर संध्या प्रनिकेत ही आगळी वेगळी जोडी घेऊन येत आहे बाप्पाचं एक गोड गाणं

ओ शेठ आणि लय गुणाची हाय या गाण्यांच्या सुपरहिट यशानंतर संध्या प्रनिकेत ही आगळी वेगळी जोडी घेऊन आली आहे बाप्पाचं एक गोड गाणं ज्या गाण्यात सोज्वळता आणि प्रत्येकाला थिरकायला लावणारी ऊर्जा असं सगळं आहे. तसेच गाण्याचे शब्द संध्या प्रनिकेत चे असून या गाण्याला संगीतबद्ध सुद्धा संध्या प्रनिकेत ने स्वतःच केलं आहे. आपल्याला त्यांच्या कम्पोजिशनबद्दल तर माहितीच आहे. ओ शेठ ऐकलं तर माणूस नाचायला लागतो आणि लय गुणाची हाय ऐकलं की प्रेमाची गुलाबी थंडी मनावर रंगांची उधळण करून जाते. हा तर आता आपण नवीन गाण्यासंदर्भात बोलूया पहिल्यांदाच त्यांनी दोघांनी फेस्टिव्हल सॉंग करण्याचा विचार केला हे गाणं शब्द आणि चालीनं असं खुलल की त्यांनी हे गाणं आदर्श शिंदे यांच्या कडून गाऊन घेतलं. आता या गाण्यातून तुम्हाला ही संध्या प्रनिकेत ची स्टार जोडी स्वतः दिसणार आहे. तर गाणं ऐकण्यासाठी आत्ताच सज्ज व्हा, आणि येत्या गणेशोत्सवात आपल्या लाडक्या जोडीचं हे गजानना तुझ्याविना गाणं नक्की आपल्या घरात आणि जवळच्या मंडळात वाजवा. गणपती बाप्पा मोरया. 


Shivani Surve : अभिनेत्री शिवानी सुर्वेचा डॅशिंग लूक; 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे'मधील शिवानीचा लूक रिव्हील

Asia Cup 2022: हाँगकाँगच्या खेळाडूंना बॉलिवूडची भूरळ; 'काला चष्मा' वरील भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल

Bigg Boss Marathi 4 : 'फुल टू राडा असणार बॉस...'; बिग बॉस सीझन-4 चा प्रोमो चर्चेत, महेश मांजरेकरांच्या लूकनं वेधलं लक्ष

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या एडविन आणि दत्ता प्रसाद गावकर यांना मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आलं

Sonali Phogat : सोनाली फोगाट हत्याप्रकरणात आरोपी असलेल्या एडविन आणि दत्ता प्रसाद गावकर यांना मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे.  भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या हत्येप्रकरणी आता आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर वासी या दोघांना अटक केली होती. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


टिकटॉकस्टार सोनाली फोगटचा मृत्यू नसून हत्याच, कुटुंबियांचा आरोप; गोवा पोलिसांनी दाखल केला गुन्हा


टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सोनाली फोगाटचा भाऊ रिंकू ढाका याने पोलिसात तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप नेत्या सोनाली फोगाट यांचे गोव्यात हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना गोव्यतील सेंट अँथोनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले.


‘बनी’च्या शिरपेचात मनाचा तुरा, अमेरिकेतील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पार पडले स्क्रिनिंग!


जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील ‘फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल’मध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या ‘आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित - दिग्दर्शित 'बनी' (Bunny) या एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 'बनी'चे स्क्रिनिंग येत्या 27 ऑगस्ट 2022 रोजी, सायंकाळी टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्या. त्यातून 137 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील 'गुठली लड्डू' आणि मराठीतील 'बनी' या दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली.


Drishyam 3 : अभिनेते मोहनलाल यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांच्याकडून ' दृश्यम 3' ची घोषणा


Drishyam 3 : अभिनेते मोहनलाल (Mohanlal) यांच्या  दृश्यम (Drishyam) या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या चित्रपटाचे आतापर्यंत दोन भाग रिलीज झाले आहेत. या दोन्ही भागांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.   दृश्यम-3 (Drishyam 3) रिलीज होणार की नाही? असा प्रश्न मोहनलाल यांच्या चाहत्यांना पडला होता. आता क्राईम थ्रिलर असणाऱ्या दृश्यम या चित्रपटाचा तिसरा भागाची निर्माते अँटोनी पेरुम्बावूर यांनी अधिकृतपणे घोषणा केली आहे. माझविल एंटरटेनमेंट अवॉर्ड्स या कार्यक्रमामध्ये अँटोनी पेरुम्बावूर (Antony Perumbavoor) यांनी 'दृश्यम-3' बाबत माहिती दिली आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.