Tata Group Employee Diwali Bonus News : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना देवमाणूस का मानलं जायचं? याची प्रचिती त्यांच्या अंत्यविधीनंतरच्या 24 तासांतचं पुन्हा एकदा आली आहे. कारण दिवाळीचा ठरलेला 49 हजारांचा बोनस (Diwali Bonus) आज सकाळपासूनच लाखो कामगारांच्या खात्यात जमा होऊ लागलाय. टाटा परिवाराची ही कृती पाहून कामगार वर्ग मोठा भावनीक झाला आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमधील टाटा कंपनीत (Tata Comapny) इतिहासात पहिल्यांदाच खंडेनवमीच्या पूजेत खंड पडला आहे. याचं प्लांटमधील सगळे कामगार एकवटले होते, त्यांनी कंपनीत रतन टाटांना श्रद्धांजली वाहिली.
आपला देव माणूस गेला, कालचं अंत्यविधी पार पडला. यामुळं हा कामगार वर्ग दुःखाच्या छायेत आहे. मात्र, अंत्यविधीला अद्याप 24 तासही उलटले नाहीत, तोवर या लाखो कामगारांच्या खात्यात टाटा परिवाराकडून दिवाळीचा बोनसही जमा करण्यात आला आहे. इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 49 हजारांहून अधिकचा बोनस देत, दुःखात असणाऱ्या सर्व कामगारांची दिवाळी मात्र गोड केली आहे. टाटा परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच बोनस देण्यात आला आहे. त्यांची ही कृती पाहून कामगार वर्ग आणखीनच भावनीक झाला आहे.
रतन टाटा यांचं 9 ऑक्टोबर रोजी निधन
टाटा उद्योग समूहाला (Tata Industries Group) यशाच्या नव्या शिखरावर नेऊन ठेवणारे उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण उद्योगविश्वासह भारतभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील अनेक भावूक, आठवणीत राहावेत असे प्रसंग समोर येत आहेत. टाटा उद्योग समूह फक्त भारतच नव्हे तर जगातील अनेक देशांत पसरलेला आहे. या उद्योग समूहाच्या 30 पेक्षा जास्त कंपन्या आहेत. या कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. जवळपास 100 देशांत टाटा उद्योग समहूाचा उद्योग विस्तारलेला आहे. रतन टाटा यांनी 1991 ते 2012 या काळा टाटा समूह आणि टाटा सन्स या अद्योग समूहाचे अध्यक्षपद सांभाळलेले आहे. या काळात त्यांनी टाटा उद्योग समूहाला नव्या शिखरावर नेऊन ठेवला. रतन टाटा हे ऑक्टोबर 2016 ते जानेवारी 2017 या काळात टाटा उद्योग समूहाचा अंतरिम अध्यक्ष होते.
महत्वाच्या बातम्या: