नांदेड: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात रोहित पवार यांच्या कामाचे कौतुक केले होते. रोहित पवार हे जामखेडमध्ये चांगले काम करत आहेत, असे अजितदादांनी म्हटले होत. यावर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादांच्या (Ajit Pawar) कौतुकद्गोरांबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, माझ्या मतदारसंघात मी मनापासून काम केले आहे. जेव्हा व्यक्ती हा दमदार काम करतो, तेव्हा विरोधकदेखील स्तुती करतात. तशी स्तुती दादांनी माझी केलेली आहे, त्याचं मी स्वागत करतो, असे रोहित पवार यांनी म्हटले. ते नांदेडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 


मंत्रिमंडळाच्या तीन बैठकांमध्ये सरकारने फक्त खैरात वाटण्याचं काम सुरू केलेलं आहे. काही मंडळ स्थापन केलेली आहेत. पण याच्या आधी त्यांनी 9 मंडळाची स्थापना केली होती त्याला रुपया देखील दिलेला नाही.  आता नवीन मंडळाची घोषणा करत आहेत. आता या सर्व घोषणा बघितल्या तर आता कुठेतरी तिथे असणाऱ्या अधिकाऱ्यांची चर्चा सुरू झालेली आहे. जानेवारीपर्यंत आपल्याला पगार तरी मिळेल का? अशी चर्चा आयएएस अधिकाऱ्यांनी सुरू केल्याचे रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  


आता सरकारच्या कारभारात शिस्त नसल्यामुळे अजित दादा हे पहिल्या दहा मिनिटात बैठकीतूनच बाहेर पडले. अजितदादा बैठकीतून गेल्यामुळे हे सरकार किती भ्रष्टाचार आणि चुकीचे नियोजन करुन आपल्या राज्याला अडचणीत आणत आहे, हे दिसून येते.  गुजरातचे नेते जे दिल्लीत बसलेले आहेत त्यांना फक्त गुजरातची काळजी आहे आणि गुजरातच्या नेत्यांना महाराष्ट्राची नेहमी नेहमी काळजी लागते. महाराष्ट्र नेहमी गुजरातच्या पुढे राहिलेला आहे.  जर महाराष्ट्राला आपण आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणलं तर कायमस्वरूपी गुजरात हा एक नंबर वर राहील असे गुजरातमधील नेत्यांना वाटत असले तरी फक्त महिना थांबा महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.


गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा माणूस- रोहित पवार


बिग बॉस हिंदीमधील स्पर्धेक गुणरत्न सदावर्ते यांनी अलीकडेच एक वक्तव्य केले होते. मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे सरकार पाडण्यासाठी एसटी आंदोलन केले, असे सदावर्ते यांनी म्हटले होते. याविषयी विचारणा केली असता रोहित पवार यांनी म्हटले की, गुणरत्न सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांनी काय काय पराक्रम केलेले आहेत, जे एसटीचा महामंडळ आहे, त्याचा वाट लावण्याचे काम सदावर्ते यांनी केलेले आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते हेच जे महाशय आहेत, जे देवेंद्र फडणवीस यांना देव समजतात. मराठा आरक्षणात खोडा घालण्याचे काम गुणरत्न सदावर्ते यांनी केले. त्यांना फक्त भुंकण्यासाठी ठेवले आहे, अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी केली.


आणखी वाचा


मोठी बातमी : अजित पवार आणि प्रकाश आंबेडकरांनी एकत्र यावं, दादांच्या बड्या नेत्याची पुन्हा एकदा साद!