Entertainment News Live Updates 28 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jul 2022 04:36 PM
‘धागों से बांधा’ गाणं झालं रिलीज

Raksha Bandhan Title Song Dhaagon Se Baandhaa : ‘रक्षाबंधन’ चित्रपटामधील ‘धागों से बांधा’ गाणं रिलीज झालं आहे. 


पाहा गाणं: 





Secrets Of The Kohinoor: 'सीक्रेट्स ऑफ द कोहिनूर' मधून उलगडणार कोहिनूर हिऱ्याचा इतिहास; मनोज वजपेयींची डॉक्यूमेंट्री 'या' दिवशी होणार रिलीज

प्रतीक गांधी साकारणार महात्मा गांधींची भूमिका; हंसल मेहतांच्या नव्या सीरिजची घोषणा

Web Series On Mahatma Gandhi : प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता (Hansal Mehta) यांची नवी वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. लेखक रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांच्या 'गांधी बिफोर इंडिया' आणि 'गांधी-द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड' या दोन पुस्तकांवर हंसल मेहता यांची ही नवी वेब सीरिज आधारित असणार आहे. हंसल मेहता यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन माहिती दिली. या सीरिजमध्ये महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) हा साकारणार आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Dharmaveer : 'फक्त मराठी सिने सन्मान 2022' मध्ये धर्मवीर चित्रपटाची बाजी; पटकावले सात पुरस्कार

Dharmaveer : ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेना (Shiv Sena) हा पक्ष रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांचा जीवनपट "धर्मवीर" (Dharmaveer) मुक्काम पोस्ट ठाणे. या चित्रपटाच्या माध्यमातून रसिकप्रेक्षकांसमोर मांडण्यात आला होता. 13 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम लाभल्यानंतर आता या चित्रपटावर पुरस्कारांचाही वर्षाव होऊ लागला आहे. 'फक्त मराठी सिने सन्मान २०२२' च्या पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत.  


वाचा सविस्तर बातमी 

Shamshera Box Office Collection Day 6 : रणबीरचा 'शमशेरा' ठरला फ्लॉप; सहाव्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर दिसली नाही जादू, पाहा कलेक्शन

Shamshera Box Office Collection Day 6 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)  ‘शमशेरा’ (Shamshera) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये रणबीरनं दुहेरी भूमिका साकारली. रणबीरसोबतच चित्रपटामध्ये  वाणी कपूर (Vaani Kapoor) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपट 22 जुलै रोजी रिलीज झाला होता. रिलीज होऊन सहा दिवस झाले तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करु शकला नाही. रिलीज झाल्यानंतर पहिल्या वीकेंडला या चित्रपटानं  31.75 कोटींची कमाई केली. 


वाचा सविस्तर बातमी 

'धोका: राऊंड द कॉर्नर' चा जबरदस्त टीझर रिलीज

पाहा टीझर: 


आलियानं शेअर केले खास लूकमधील फोटो

अभिनेत्री अथिया शेट्टीनं शेअर केला के.एल. राहुलसोबतचा खास फोटो शेअर; नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

Dhanush : धनुषच्या 'नाने वारुवेन' चित्रपटाच पोस्टर रिलीज

Vidya Balan,Ranveer Singh : रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर विद्या बालनची प्रतिक्रिया; सपोर्ट करत म्हणाली...

Vidya Balan On Ranveer Singh : न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं अभिनेता  रणवीर सिंह (Ranveer Singh) वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. त्याच्या विरोधात मुंबईमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे. अनेक लोक रणवीरच्या या फोटोशूटला विरोध करत आहे. रणवीरच्या न्यूड फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटोंना कमेंट करुन अनेकांनी रणवीरचं कौतुक केलं तर काहींनी त्याला ट्रोल देखील केलं. आता रणवीर सिंहच्या न्यूड फोटोशूटवर अभिनेत्री विद्या बालननं (Vidya Balan)  प्रतिक्रिया दिली आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

पार्श्वभूमी

Disha-Tiger Breakup: दिशा आणि टायगरचं झालं ब्रेकअप? जॅकी श्रॉफ म्हणाला...



Disha-Tiger Breakup : बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्री अशी ओळख असणारी  दिशा पटानी (Disha patani) आणि अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असतात. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. पण चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान किंवा कार्यक्रमांमध्ये दिशा आणि टायगरनं त्यांच्या नात्याबद्दल बोलणं टाळलं. सध्या या दोघांचं ब्रेक-अप झालं आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे. दोघे जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. दिशा आणि टायगरच्या ब्रेक-अपच्या बातमीनं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.   


वाचा सविस्तर बातमी 


Alia Bhatt On Twins : रणबीर कपूरनं जुळ्या मुलांबाबत केलेल्या वक्तव्यावर आलियाची रिअॅक्शन; म्हणाली...



Ranbir Alia : सध्या सगळीकडेच अभिनेत्री  आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या जोडीची चर्चा सुरु आहे.  काही दिवसांपूर्वी या जोडीने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. रणबीर आणि आलिया लवकरच आई-बाबा होणार आहे. त्यांची ही गुडन्यूज ऐकल्यापासून सगळे चाहते या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत दिलेल्या उत्तरानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. रणबीरनं दिलेल्या एका उत्तरामुळे त्यांच्या घरात एक नव्हे, तर दोन चिमुकले पाहुणे येणार असल्याचा अंदाज चाहते बांधत होते. रणवीरच्या जुळ्या मुलांच्या वक्तव्यावर आता आलियानं प्रतिक्रिया दिली आहे.


वाचा सविस्तर बातमी 


Do Baaraa First Look : क्लासी आणि बॉसी.. ‘दो बारा’मधील तापसी पन्नूचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला!



Do Baaraa Taapsee Pannu First Look : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या ‘दो बारा’ (Do Baaraa) या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच तिच्या या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली होती. आता या चित्रपटातील तिचा फर्स्ट लूक देखील प्रेक्षकांच्या भेटीला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तापसी आणि दिग्दर्शक-निर्माता अनुराग कश्यप (Anurag kashyap) पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात तापसी पन्नू पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत दिसणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.