Entertainment News Live Updates 27 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 Sep 2022 10:53 PM
Siddharth Jadhav : मांजरेकर म्हणत असतील तर मी 'बिग बॉस'च्या घरात धिंगाणा घालण्यास सज्ज, सिद्धार्थ जाधवची प्रतिक्रिया

महेश मांजरेकरांच्या विधानावर सिद्धार्थ जाधवने प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ म्हणाला,"मी बिग बॉसच्या घरात धिंगाना घालेल असं मांजरेकरांना वाटतं. तर मी सध्या एक धिंगाना घालतोय. मांजरेकरांचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी मोलाचा त्यामुळे ते म्हणत असतील तर मला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायला आवडेल". 

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची प्रकृती खालावली

Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चर्चेत आहे. दीपिका पदुकोणला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने तिला मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या दीपिकाची प्रकृती सुधारली असून तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. 

Lata Mangeshkar Biography : लता मंगेशकरांनी पाच हजाराहून अधिक गाणी गायली, पण त्यांचं पहिलंच गाणं रिलीज झालं नाही

Lata Mangeshkar Biography : लता दीदींना 'किट्टी हसल' मराठी सिनेमासाठी पहिल्यांदा गाणं गायलं होतं. ‘नाचू आ गड़े, खेलो सारी मणि हौस भारी’ असे या गाण्याचे बोल होते. तर सदाशिवराज नेवरेकरने हे गाणं संगीतबद्ध केले होते. वसंत जोगलेकरने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. पण या सिनेमातून हे गाणं काढून टाकण्यात आलं. त्यामुळे लता दीदींचं पहिलं गाणं रिलीज झालेलं नाही. 

Bigg Boss 16 : युट्यूबर अब्दु राजिक होणार भाईजानच्या बिग बॉसमध्ये सहभागी

Bigg Boss 16 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. येत्या 1 ऑक्टोबरला भाईजानचा 'बिग बॉस' सुरू होणार आहे. 'बिग बॉस' हा कार्यक्रम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने या पर्वात कोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. अशातच या पर्वातील पहिल्या स्पर्धकाचं नाव समोर आलं आहे. युट्यूबर अब्दु राजिक (Abdu Razik) या पर्वात सहभागी होणार आहे. 



Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. सध्या मालिकेत नव-नविन ट्विस्ट येत आहेत. मालिकेच्या आगामी भागात विश्वजीत काकांच्या प्लॅनमध्ये यश फसलेला दिसून येणार आहे. तसेच नेहा आणि यशमध्येदेखील बट्टी झालेली पाहायला मिळणार आहे. 





Asha Parekh : बॉलिवूडचे 95 पेक्षा अधिक सिनेमे, जाणून घ्या सुपरस्टार अभिनेत्री आशा पारेख यांचं फिल्मी करियर

Asha Parekh : आशा पारेख यांनी 'जब प्यार किसी से होता है' (1961), 'फिर वही दिल लाया हूं' (1963), 'तिसरी मंजिल' (1966), 'बहारों के सपने' (1967), 'प्यार का मौसम' (1969), 'कटी पतंग' (1970) आणि 'कारवं' (1971), 'मंजिल मंजिल' (1984) अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत त्यांनी काम केलं आहे. 

Kranti Redkar : क्रांती रेडकरचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

Kranti Redkar : निरनिराळ्या आशयावर प्रयोग करणारे 'प्लॅनेट मराठी' पुन्हा एकदा एक नवीन संकल्पना घेऊन प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. लवकरच 'प्लॅनेट मराठी' आणि क्रांती रेडकर यांची निर्मिती संस्था 'दॅट हॅप्पी गर्ल' एक नवीन कल्पना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या शोच्या निमित्ताने क्रांती रेडकर निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहेत. 

Adipurush: आदिपुरुषचा टीझर आयोध्येत होणार लाँच; शरयूकाठी पार पडणार मेगा इव्हेंट

Adipurush: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासचा (Prabhas)  'आदिपुरुष'(Adipurush) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.  या आगामी चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर हे 2 ऑक्टोबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे रिलीज करण्यात येणार आहे. शरयू नदीच्या काठावर एक भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आलं आहे. या समारंभात आदिपुरुष या चित्रपटाचे टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. आदिपुरुष चित्रपटाचं दिग्दर्शन ओम राऊतनं (Om Raut) केलं आहे. ओम राऊतनं ट्विटरवर ट्वीट शेअर करुन आदिपुरुषच्या टीझर लाँचच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. 



करीनाने पाहिला सैफचा चित्रपट ‘विक्रम वेधा’, म्हणाली ‘पिक्चर ब्लॉकबस्टर’!

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खाननेही पती सैफ अली खानच्या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. करीनाने 'विक्रम वेधा'वर कौतुकाचा वर्षाव केला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर करीना कपूरने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली. ही स्टोरी शेअर करताना करीना कपूर खानने ‘विक्रम वेधा’चे पोस्टर पोस्ट केले आणि कॅप्शनमध्ये लिहिले, 'सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, काय चित्रपट आहे, एकदम 'ब्लॉकबस्टर'.



ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख (Asha Parekh) यांना यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी माहिती दिली आहे. 30 सप्टेंबरला आशा पारेख यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. आशा पारेख यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


 





चांदनी शर्मानंतर ‘बिग बॉस 16’मध्ये दिसणार टीव्हीची ‘ही’ सुप्रसिद्ध सून! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

मीडिया रिपोर्टनुसार, साजिद खान, सुंबुल तौकीर, शिव ठाकरे यांच्यानंतर निम्रत कौर अहलुवालिया (Nimrit Kaur Ahluwalia) देखील ‘बिग बॉस 16’च्या घरात प्रवेश करणार असल्याचे कळते आहे. मात्र, अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.


 





Rashmika Mandanna : नरात्रोत्सवात देखील पुष्पा फिवर; सामी सामी गाण्यावरील गरब्याचा व्हिडीओ व्हायरल

 Rashmika Mandanna: पुष्पा गाण्यावर गरबा खेळणाऱ्या काही मुलांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही मुलं सामी सामी गाण्यावर गरबा खेळताना दिसत आहेत. या व्हिडीओला रश्मिकानं कमेंट केली, 'Craaaaazzzyyyyy'





'विक्रम वेधा' सिनेमातील 'बंदे' गाणं आऊट; हृतिक रोशन अन् सैफ अली खान अॅक्शन मोडमध्ये

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) आगामी 'विक्रम वेधा' (Vikram Vedha) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील 'बंदे' (Bande) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 


 





PHOTO : ‘मिस्टर अँड मिसेस माही’साठी जान्हवी कपूर तयार, सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाली...

‘स्टार किड’ जान्हवी कपूरने इंडस्ट्रीतील सर्वात प्रतिभावान अभिनेत्रींच्या यादीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे आणि ती तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोशल मीडियावरही तिचे खूप चाहते आहेत. नुकतेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आणि चाहत्यांना तिच्या नवीन प्रोजेक्ट 'मिस्टर अँड मिसेस माही'बद्दल माहिती दिली आहे.


 





Namrata Sambherao : 'चाळीमध्येच राहत होते, लालबाग-काळाचौकी माझं माहेर'; नम्रता संभेरावनं उलगडला आठवणींचा खजिना!

Namrata Sambherao'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतच नवरात्रोस्तवाच्या निमित्त नम्रतानं एक लाईव्ह सेशन केलं. नम्रतानं इन्स्टाग्रामवरील तिच्या लाईव्ह सेशनमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. लाईव्हमधील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं नम्रतानं दिली. 


पाहा नम्रताचं लाईव्ह:



Namrata Sambherao : 'चाळीमध्येच राहत होते, लालबाग-काळाचौकी माझं माहेर'; नम्रता संभेरावनं उलगडला आठवणींचा खजिना!

Namrata Sambherao'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रमला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या कार्यक्रमातील अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नुकतच नवरात्रोस्तवाच्या निमित्त नम्रतानं एक लाईव्ह सेशन केलं. नम्रतानं इन्स्टाग्रामवरील तिच्या लाईव्ह सेशनमध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगितलं. लाईव्हमधील चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं नम्रतानं दिली. 


पाहा नम्रताचं लाईव्ह:



'त्याला' बिग बॉसच्या घरात बंद केलं पाहिजे; महेश मांजरेकरांची एबीपी माझाला Exclusive माहिती

'बिग बॉस मराठी'चं (Bigg Boss Marathi 4) चौथं पर्व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं असून चाहते या पर्वाची आतुरतेने वाट बघत आहे. 'बिग बॉस' सुरू झाला की नेटकरी या कार्यक्रमाला, स्पर्धकांना चांगलच ट्रोल करत असतात. 'बिग बॉस'च्या नव्या पर्वाच्या निमित्ताने महेश मांजरेकरांनी (Mahesh Manjrekar) एबीपी माझाला प्रतिक्रिया देत अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. 


 


चित्रपट झाले आता नेटकरी करतायत इंडियन आयडॉलवर बंदी घालण्याची मागणी! नेमकं कारण तरी काय?

सध्या टीव्ही विश्वात रिअ‍ॅलिटी शोंचा सुळसुळाट झाला आहे. यातच नेहमीच चर्चेत असणारा रिअ‍ॅलिटी शो म्हणजे इंडियन आयडॉल (Indian Idol). इंडियन आयडॉल आणि वाद हे आता एक समीकरण बनलं आहे. नुकतीच या शोवर बंदी घालण्याची मागणी सुरु झाली आहे. ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’ आणि आता ‘इंडियन आयडॉल’बाबत वाद सुरू झाला आहे. इंडियन आयडॉलबद्दल पूर्वीही म्हटले जायचे की, हा शो आधीच स्क्रिप्टेड आहे. पण, आता चाहते या शोवर थेट बंदी घालण्याचीच मागणी करत आहेत. ‘इंडियन आयडॉल’च्या 13व्या सीझनमध्ये ऑडिशनसाठी आलेल्या रिटो रिबाची निवड न झाल्याने प्रेक्षक संतापले आहेत. 


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'शिवप्रताप गरुडझेप'चा उत्कंठावर्धक ट्रेलर रिलीज


छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा डॉ. अमोल कोल्हे यांच्या 'शिवप्रताप गरुडझेप' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. या ट्रेलरमधील अमोल कोल्हेंच्या डायलॉग्सनं अनेकांचे लक्ष वेधलंय. 'शिवप्रताप गरुडझेप' या सिनेमाच्या ट्रेलरला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. 5 ऑक्टोबरला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.


200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला कोर्टाकडून दिलासा!


200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा दिलासा मिळाला आहे. पटियाला हाऊस कोर्टातून 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जॅकलिनचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीने तब्बल 15 तास जॅकलिनची चौकशी केली. ईडीच्या चौकशीनंतर सुकेश आणि जॅकलिनमध्ये मैत्रीचे संबंध असल्याचे समोर आले. त्यानंतर पटियाला कोर्टालाही या प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर जॅकलिनला कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. या प्रकरणी सुनावणीसाठी आज जॅकलिन कोर्टात हजर झाली. या प्रकरणात ईडीने 17 ऑगस्ट रोजी आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये जॅकलिनला 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपी असल्याचे म्हणण्यात आले होते. त्यानंतर जॅकलिनच्या अडचणी वाढत गेल्या. मात्र, आता जॅकलिनला कोर्टाकडून दिलासा मिळाला असून, तिचा अंतरिम मंजूर करण्यात आला आहे.


रोजंदारीवर काम करणारी वर्षा ठरली ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ ची विजेती


छोट्या पडद्यावरील ‘डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्स’ या लोकप्रिय कार्यक्रमाच्या तिसऱ्या सिझनचा ग्रँड फिनाले पार पडलाय. हरियाणाची, रोजंदारीवर काम करणारी वर्षा बुमरा   डान्स इंडिया डान्स सुपर मॉम्सच्या तिसऱ्या सिझनची विजेती ठरली. वर्षाच्या फॉर्मन्सनं अनेकांची मनं जिंकली.


‘सूर नवा ध्यास नवा’चा उत्कर्ष वानखेडे ठरला राजगायक


‘सूर नवा ध्यास नवा’या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गायकांनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. या स्पर्धकांच्या निखळ, सुरेल स्वरांनी संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र बांधून ठेवले. या कार्यक्रमामधील गायकांनी विविध शैलींमधील गाणी उत्तम पद्धतीने सादर करत प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले. नुकतंच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राजगायक होण्याचा मान उत्कर्ष वानखेडे याने पटकावला.


बहुचर्चित "आपडी थापडी" चित्रपटाचा ट्रेलर लाँच


आगामी बहुचर्चित "आपडी थापडी" या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.सर्वच कलाकारांचा उत्तम अभिनय, दमदार कथा आणि तांत्रिकदृष्ट्याही परिपूर्ण असलेला हा चित्रपट 5 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.