Entertainment News Live Updates 27 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 27 May 2023 04:04 PM
GHKKPM : नील-ऐश्वर्यानंतर 'गुम है किसी के प्यार में' मालिकेतील 'ही' जोडी अडकली प्रेमबंधनात!

Ghum Hai Kisi Key Pyaar Meiin : 'गुम है किसी के प्यार में' (Ghum Hai Kisi key Pyaar Meiin) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्टची जवळीक वाढली. त्यांच्यात छान मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्नदेखील केलं. आता या मालिकेतील विहान वर्मा आणि स्नेहा भावसर रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे.


वाचा सविस्तर

Mrs Asia GB Sonal Kale : मराठी पाऊल पडते पुढे! 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा किताब मराठमोळ्या सोनल काळेच्या नावावर

Mrs Asia GB Sonal Kale : मराठमोळी, मुंबईकर सोनल काळेने (Sonal Kale) 'मिस आशिया ग्रेट ब्रिटन'चा (MRS. Asia Great Britain) किताब आपल्या नावावर केला आहे.  ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. सोनलने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.



Ashish Vidyarthi : "आता सगळं संपलं"; आशिष विद्यार्थींच्या लग्नानंतर पहिल्या पत्नीची पोस्ट चर्चेत

Ashish Vidyarthi First Wife Piloo Vidyarthi Post : लोकप्रिय अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) यांनी वयाच्या 60 व्या वर्षी दुसरं लग्न केलं आहे. त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एकीकडे नवा संसार थाटण्यासाठी आशिष सज्ज आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी बरुआ म्हणजेच पीलू विद्यार्थीने (Piloo Vidyarthi) सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. सर्व काही संपलं असं म्हणत ती स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत असल्याचं या पोस्टमधून कळतं आहे. 


वाचा सविस्तर

Gautami Patil : ज्या कामामुळे तिचं संपूर्ण देशात नाव झालं ते नाव तिने का म्हणून बदलावं? गौतमी पाटीलच्या गावकऱ्यांचा सवाल

Gautami Patil : वादाच्या भोवऱ्यात अडकणाऱ्या गौतमी पाटीलवरून (Gautami Patil) आता एक नवा वाद निर्माण झाला आहे. आतापर्यंत तिने सादर केलेल्या नृत्यांवर आक्षेप घेतला जायचा. मात्र आता तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला आहे.  गौतमी पाटीलने पाटील आडनाव लावू नये, यासाठी अनेकांनी तीला विरोध केला आहे. गौतमी पाटील ही मराठा समाजाचे नाव खराब करत असल्याचं एका संघटनेचं म्हणणं असून तिने पाटील आडनाव काढावं, अशी धमकी तिला संघटनेकडून देण्यात आली आहे. या संपूर्ण विषयावर गौतमी पाटील ज्या गावात लहानाची मोठी झाली. त्या गावकऱ्यांना नेमकं काय वाटतं जाणून घ्या...


वाचा सविस्तर

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती परदेशी जाताच यशने उचललं टोकाचं पाऊल

Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest Update : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या रंजक वळणे येत आहेत. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे. अरुंधती परदेशी जाताच आता या मालिकेत यशने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. 


वाचा सविस्तर

The Kapil Sharma Show : कार्यक्रमातील उरलेलं जेवण घरी घेऊन जाते अर्चना पूरण सिंह! कृष्णा अभिषेकने घेतली अभिनेत्रीची मजा

The Kapil Sharma Show : विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या 'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. या कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी आपल्या कार्यक्रमांचं प्रमोशन करण्यासाठी येत असतात. 'द कपिल शर्मा'च्या आगामी भागात आकृती कक्कड, शंकर महादेवन आणि शानसह अनेक कलाकार हजेरी लावत असतात. आता नुकत्याच समोर आलेल्या 'द कपिल शर्मा'च्या आगामी प्रोमोमध्ये कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek) अर्चना पूरन सिंहची (Archana Puran Singh) मजा घेताना दिसत आहे. 



Sambhaji Bhagat : नाचणाऱ्या बायका बघणाऱ्या विविध जातीतील पुरुषांना काय वाटते? लोकप्रिय शाहीर संभाजी भगत म्हणतात...

Sambhaji Bhagat On Gautami Patil : आपल्या नृत्याने सर्वांना घायाळ करणारी गौतमी पाटील (Gautami Patil) वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला असून गौतमीमुळे पाटील आडनावाची बदनामी होते. त्यामुळे तिने पाटील अडनाव वापरु नये, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रातील लोकप्रिय शाहीर संभाजी भगत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याप्रकरणी आपला मत व्यक्त केलं आहे. 


वाचा सविस्तर

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'पश्चिम बंगाल सरकार हे सत्य...'; पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर 'द डायरी ऑफ वेस्ट बंगाल' च्या दिग्दर्शकाची प्रतिक्रिया


The Diary of West Bengal:  ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ (The Diary of West Bengal) हा चित्रपट रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.  चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पश्चिम बंगाल पोलिसांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  यासंपूर्ण प्रकरणावर आता लेखक-दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


Gadar: 22 वर्षानंतर 'गदर' (Gadar) पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीस


Gadar :  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) 2001 मध्ये प्रदर्शित झालेला 'गदर' (Gadar) हा चित्रपट लोक आजही आवडीने पाहतात. या चित्रपटातील आयकॉनिक 'हँड पंम्प' सिन, चित्रपटातील डायलॉग्स अजही प्रेक्षकांची मनं जिंकतात. आता हा चित्रपट पुन्हा रिलीज केला जाणार आहे. याबाबत सनी देओलनं सोशल मीडियावर माहिती दिली आहे.


Aryan Khan : आर्यन खानच्या 'Stardom'चा हिरो निश्चित! 800 ऑडिशन्सनंतर 'या' अभिनेत्याची निवड


Aryan Khan Debut Web Series Stardom Update : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) सध्या त्याच्या 'स्टारडम' (Stardom) या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये शाहरुख खान आणि रणवीर सिंहची झलक पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली होती. आता मिळालेल्या माहितीनुसार या सीरिजमधील हिरोच्या नावावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आर्यन खान सध्या 'स्टारडम' (Aryan Khan Debut Web Series Stardom) या सीरिजमुळे चर्चेत आहे. पहिलीच सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. आर्यनने तब्बल 800 ऑडिशन्सनंतर 'स्टारडम'चा हिरो निश्चित केला आहे. आर्यनच्या 'स्टारडम' या सीरिजमध्ये अभिनेता लक्ष्य लालवानी (Lakshya Lalwani) मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.