Entertainment News Live Updates 27 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jun 2022 07:20 PM
केतकी चितळेला तूर्तास दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक करणार नाही

आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यामुळे तिच्याबद्दल राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले होते. पण तूर्तास केतकीला दिलासा मिळाला आहे. 

शाहरुखनं शेअर केला मिरर सेल्फी; चाहत्यांचे मानले आभार

कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा टीझर आऊट

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर कतरिनाचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. अशातच आता कतरिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी 'फोन भूत' (Phone Bhoot) सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. 





पहिल्या आठवड्यात 'जुग जुग जियो'ची बॉक्स ऑफिसवर जादू; जाणून घ्या कलेक्शन

आठवड्यात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये अनिल कपूर (Anil Kapoor), नीतू कपूर (Neetu Kapoor), कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि वरुण धवन (Varun Dhawan) यांनी प्रमुख भूमिका साकारली. जुग जुग जियो या चित्रपटाचं प्रेक्षक आणि क्रिटिक्स हे दोघेही कौतुक करत आहेत. या चित्रपटानं आत्तापर्यंत 36 कोटींची कमाई केली आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचे तीन दिवसांचे कलेक्शन


वाचा सविस्तर बातमी 

अर्जुन आणि मलायकानं बर्गर अन् फ्राइजवर मारला ताव; एन्जॉय करतायत पॅरिस ट्रीप

पाहा फोटो:



Salman Khan : समंथाच्या 'या' गाण्यानं सलमान झाला प्रेरित; व्हिडीओ शेअर करुन समंथानं दिली हटके रिअॅक्शन

Samantha Rukh Prabhu, Salman Khan : अभिनेत्री समंथाचा (Samantha Ruth Prrabhu) चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या नृत्यशैलीला आणि अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'पुष्पा : द राइज' (Pushpa: The Rise) या चित्रपटामधील 'Oo Antava' या गाण्यामधील समंथाच्या डान्सनं  अनेकांची मनं जिंकली. आता या गाण्याचा बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा फॅन झाला आहे. समंथानं सलमान खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान हा एका मुलाखतीमध्ये  'Oo Antava' या गाण्याबद्दल सांगताना दिसत आहे. 


पाहा व्हिडीओ 



आसाममधील पूरग्रस्तांना सोनू सूदचा मदतीचा हात; म्हणाला, 'आसामला आपली गरज'

Sonu Sood : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरानं सध्या आसमामधील (Assam Flood) काही भागांमध्ये हाहाकार माजवला आहे. आसाममधील 32 जिल्हे आणि 22 लाखांपेक्षा जास्त लोक सध्या महापुराचा सामना करत आहेत. मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरग्रस्त असेला सिल्चर भागाचा हवाई दौरा केला होता. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आसाममधील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. रोहित शेट्टी आणि अर्जुन कपूर यांनी आसाममधील पूरग्रस्तांसाठी पाच लाख रुपयांची मदत केली आहे. आता अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देखील मदत करणार आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

गायक केके यांच्या टीमला हेट मेसेज, मुलगी तामरा म्हणते

KK Daughter Post : प्रसिद्ध गायक  केके (KK) यांचे  31 मे रोजी  निधन झाले. वयाच्या 53 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके बॉलिवूडमधील एक सुप्रसिद्ध गायक होते. त्यांनी हिंदीमध्ये 200 हून अधिक गाणी गायली. Voice of Love अशी त्यांची ओळख होती. पत्नी ज्योती लक्ष्मी कृष्णा आणि दोन मुलं असं केके यांचे कुटुंब आहे. केके यांच्या मुलीनं म्हणजेच तामरानं सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये केके यांच्या टीमला हेट मेसेज करणाऱ्यांना मेसेज दिला आहे. केके यांचे मॅनेजर हितेश भट आणि शुभम भट्ट यांना सोशल मीडियावर अनेक लोक हेट मेसेज करत आहेत. यावर एक पोस्ट शेअर करुन तामरानं केके यांच्या टीमला सपोर्ट केला आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Alia Bhatt Pregnancy : आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Boyz 3 : 'बॉईज' परत येतायत... सोशल मीडियावर झळकतोय 'बॉईज 3'चा ट्रेलर


Boyz 3 : काही वर्षांपूर्वी धैर्य, ढुंग्या आणि कबीर या 'बॉईज'ने अवघ्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. हा धुमाकूळ कमी म्हणून पुन्हा 'बॉईज 2' मधून ते डबल धमाका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आणि अजूनही प्रेक्षकांचे मन भरत नसल्याने परत तसाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त राडा घालायला हे तीन अतरंगी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.


अरिजित सिंहच्या आवाजाची जादू, 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील बहुप्रतीक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!


Phir Na Aisi Raat Aayegi Song Out : 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे बहुप्रतीक्षित गाणे अखेर आज (25 जून) प्रदर्शित झाले आहे. हे गाणे ऐकल्यानंतर ते आतापर्यंतचे सर्वात भावपूर्ण संगीत आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. प्रीतमने संगीतबद्ध केलेले हे गाणे गायक अरिजित सिंहने गायले आहे. नुकताच अभिनेता आमिर खानने सोशल मीडियावर अभिनेत्री करीना कपूर-खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये करीना या चित्रपटातील 'फिर ना ऐसी रात आएगी' हे गाणे दशकातील सर्वोत्कृष्ट गाणे असल्याचे, तिने म्हटले आहे.


Shahu Chhatrapati : लोकराजाची कथा 'शाहू छत्रपती'... राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर येणार भव्य मराठी सिनेमा; पोस्टर आऊट


गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीसदेखील उतरत आहेत. आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही इतिहासात मानाचं आणि अभिमानाचं स्थान असलेल्या लोककल्याणकारी राजे राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.