Entertainment News Live Updates 26 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Sachin Shroff Wedding : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सचिन श्रॉफ (Sachin Shroff) लग्नबंधनात अडकला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो तारक मेहता या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता सचिन श्रॉफचं धुमधडाक्यात लग्न होणार आहे.
Ribbhu-Kirtida Wedding : 'ये है मोहब्बते' (Ye Hai Mohabbatein) फेम अभिनेता रिभू मेहरा (Ribbu Mehra) लवकरच त्याची गर्लफ्रेंड आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री कीर्तिडा मिस्त्रीसोबत (Kirtida Mistry) लग्नबंधनात अडकला आहे. दिल्लीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला आहे. आता त्यांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Akshay Kumar Selfiee Box Office Collection : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची कथा आणि कलाकारांपेक्षा सिनेमा सुपरफ्लॉप झाल्यामुळे चर्चेत आहे. 'सेल्फी' या सिनेमाकडून खिलाडी कुमारच्या चाहत्यांची खूप अपेक्षा होती. पण बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला आहे.
Satarcha Salman : हिरो बघण्याचं स्वप्न अनेक जण बघतात. त्यातील काहींचेच स्वप्न सत्यात उतरते. याच विषयावर भाष्य करणारा 'सातारचा सलमान' (Satarcha Salman) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. 'स्वप्नं बघितली तरंच पूर्ण होतात', अशी भावना असणाऱ्या तरुणाची हिरो बनण्याची जिद्द, त्यासाठीची त्याची धडपड या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 3 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
RRR Oscar 2023 : दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरण (Ram Charan) सध्या अमेरिकेत असून तो आता ऑस्कर पुरस्कार (Oscar 2023) सोहळ्याच्या तयारीला सुरुवात करणार आहे. येत्या 12 मार्चला 95 वा अकादमी पुरस्कार सोहळा (95th Academy Awards) पार पडणार आहे. सध्या राम चरण अमेरिकेत 'आरआरआर' (RRR) या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत आहे. यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा भारतासाठी खूपच खास असणार आहे. या सोहळ्यात राम चरण 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' (Naatu Naatu) गाण्यावर थिरकणार आहे.
Nawazuddin Siddiqui : 'अभ्यासू अभिनेता' अशी ओळख असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विविधांगी भूमिका साकारत त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता 'ठाकरे' (Thackeray) सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाज सज्ज आहे.
Shiv Thakare On Veena Jagtap : 'बिग बॉस' फेम (Bigg Boss) शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे (Veena Jagtap) चर्चेत आहे. शिव ठाकरे आणि वीणा जगतापचा ब्रेकअप झाला आहे तरी त्यांच्यात मैत्री कशी, शिव ठाकरेसाठी वीणा जगताप हा विषय संपलाय का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
Shiv Thakare : शिव ठाकरेसाठी वीणा जगताप हा विषय संपलाय?; म्हणाला,"तिने लग्नाचं नाटक..."
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Ideas of India Summit 2023 : ''मिमी'मध्ये वाढलेल्या वजनामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला'; एबीपीच्या कार्यक्रमात क्रिती सेननने सांगितला 'फॅट टू फिट'चा प्रवास
Ideas of India Summit 2023 : "मिमी' चित्रपटात 15 किलो वजन वाढल्यामुळे मला अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं." असं हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) म्हणाली. एबीपी नेटवर्कच्या आयडियाज ऑफ इंडिया समिट 2023 (Ideas of India Summit 2023) या कार्यक्रमाच्या दरम्यान ती बोलत होती. यावेळी, क्रिती सेननने तिच्या 'मिमी' या सुपरहिट चित्रपटाबद्दल चर्चा केली आहे. तसेच चित्रपटासंदर्भात अनेक किस्सेही सांगितले
Bhagya Dile Tu Mala : पारंपरिक पद्धतीने पार पडणार राज-कावेरीचा लग्नसोहळा!
Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) या मालिकेत राज-कावेरीचा लग्नसोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडणार आहे. मोठ्या धुमधडाक्यात या दोघांचे लग्न होणार आहे. ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. राज कावेरीच्या हळूवार प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि हे दोघे कधी एकत्र येणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली होती. अखेर आता ते लग्नबंधनात अडकणार आहेत.
RRR : हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या 'आरआरआर'चा बोलबाला
HCA Film Awards 2023 RRR Movie : एसएस राजामौलींच्या (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. 'ऑस्कर 2023'च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे. हॉलिवूडच्या मानाच्या 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त (Hollywood Critics Association) 'आरआरआर'ने बाजी मारली आहे. 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त राजामौलींच्या 'आरआरआर' या सिनेमाने तीन पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट अॅक्शन पट, सर्वोत्कृष्ट स्टंट्स, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय सिनेमा आणि नाटू नाटू गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -