Shiv Thakare : शिव ठाकरेसाठी वीणा जगताप हा विषय संपलाय?; म्हणाला,"तिने लग्नाचं नाटक..."
Shiv Thakare : 'बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि अभिनेत्री वीणा जगतापच्या नात्याची सध्या चर्चा होत आहे.
Shiv Thakare On Veena Jagtap : 'बिग बॉस' फेम (Bigg Boss) शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या त्याची एक्स गर्लफ्रेंड वीणा जगतापमुळे (Veena Jagtap) चर्चेत आहे. शिव ठाकरे आणि वीणा जगतापचा ब्रेकअप झाला आहे तरी त्यांच्यात मैत्री कशी, शिव ठाकरेसाठी वीणा जगताप हा विषय संपलाय का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.
शिव 'बिग बॉस'च्या घरात असताना त्याची आई म्हणाली होती,"आमच्यासाठी वीणा जगताप हा विषय कधीच संपला आहे. शिव आणि वीणा रिलेशनमध्ये होते. बिग बॉसमध्ये तिने शिवची साथ दिली. पण नंतर तिने लग्नाचं नाटक केलं. त्यामुळे आता हा विषय पूर्णपणे संपला आहे".
शिव ठाकरे काय म्हणाला?
आईच्या भाष्यावर स्पष्टीकरण देत शिव ठाकरे (Shiv Thakare) म्हणाला,"वीणाने लग्नाचं नाटक केलेलं नाही. खरंतर तिने मला आणि मी तिला खूप पाठिंबा दिला आहे. आम्ही दोघांनीही एकमेकांचा कायम आदर केला आहे. पण काही कारणांनी आमचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. आता आपला मुलगा आनंदात राहावा, असं प्रत्येक आईला वाटत असतं. लग्न ठरवताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. मी अमरावतीचा (Amravati) मुलगा, जात अशा अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे वीणाने लग्नाचं नाटक केलेलं नाही".
शिव ठाकरे आणि वीणा जगताप (Shiv Thakare Veena Jagtap) ही जोडी 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वात प्रचंड गाजली. त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांच्या पसंतीस उतरली. दोघांनीही सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. अखेर काही महिन्यांनी त्यांचा ब्रेकअप झाला.
शिव ठाकरे वीणा जगतापसोबत बोलतो का? (Shiv Thakare Veena Jagtap Relationship)
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडल्यानंतर वीणा जगतापसोबतच्या नात्याबद्दल शिव ठाकरे म्हणाला,"बिग बॉस मराठी' आणि 'बिग बॉस 16' माझ्यासाठी खूप खास आहे. तसेच या प्रवासातील नातीदेखील माझ्यासाठी खास आहेत. एखाद्या व्यक्तीवर प्रेम विचार करुन केलं जात नाही. मी आणि वीणा रिलेशनमध्ये नसलो तरी आजही एकमेकांच्या संपर्कात आहोत. 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यापूर्वी आमचं बोलणं झालं होतं".
संबंधित बातम्या