Entertainment News Live Updates 26 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 26 Apr 2023 06:34 PM
Unlock Zindagi: 'अनलॉक जिंदगी' येणार प्रेक्षकांच्या भेटीस; शिवानी सुर्वे, इंदिरा कृष्णा प्रमुख भूमिकेत

Unlock Zindagi: एक ड्राइव्हर, एक व्यावसायिक, दोन हतबल स्त्रिया आणि एक शव. हे चित्र आहे दोन वर्षांपूर्वीचे म्हणजेच लॉकडाऊनमधील. हीच परिस्थिती पडद्यावर पाहायला मिळणार आहे 'अनलॉक जिंदगी' (Unlock Zindagi) या हिंदी चित्रपटातून. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक राजेश गुप्ता असून रियल रील्स प्रस्तुत या चित्रपटात पितोबाश त्रिपाठी, राजेश गुप्ता (Rajesh Gupta), देविका दफ्तरदार (Devika Daftardar), शिवानी सुर्वे (Shivani Surve), इंदिरा कृष्णा (Indira Krihnan), हेमल देव या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. लेखन आणि संवादही राजेश गुप्ता यांचेच असून गीतकार नुसरत फतेही अली खान, राजेश गुप्ता आहेत. 




Dahaad Teaser Release: सोनाक्षी सिन्हाची ‘दहाड’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस; पाहा अंगावर शहारे आणणारा टीझर

Dahaad Teaser Release: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. सोनाक्षीनं सलमान खानच्या दबंग या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामधील सोनाक्षीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता सोनाक्षी ही ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करत आहे तिची दहाड ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सीरिजचा टीझर रिलीज झाला आहे. 



Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा रंगणार 'महाराष्ट्र दिन' विशेष भाग

Mi Honar Superstar : 'मी होणार सुपरस्टार-जल्लोष ज्युनियर्स'चा (Mi Honar Superstar Jallosh Juniorscha) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कथाबाह्य कार्यक्रम आहे. अल्पावधीतच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आता या कार्यक्रमाचा 'महाराष्ट्र दिन' (Maharashtra Day 2023) विशेष भाग रंगणार आहे. 





Viral Video : किली पॉलचा मराठमोळा अंदाज, बहिणीसोबत थिरकला 'बहरला हा मधुमास नवा' गाण्यावर; नेटकरी म्हणाले, 'भाऊ मराठी प्रेक्षकांना...'

Viral Video :  सध्या महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir)  या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. टांझानियाच्या किली पॉलच्या (Kili Paul) रील्सला नेटकऱ्यांची पसंती मिळते. बॉलिवूडमधील वेगवेगळ्या कलाकारांच्या गाण्यावरचे रील्स किली पॉल सोशल मीडियावर शेअर करतो. आता किली आणि त्याची बहीण नीमा पॉल हे 'बहरला हा मधुमास नवा' या मराठी गाण्यावर थिरकले आहेत. त्यांचा 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 



Nita Ambani : नीता अंबानींच्या सौंदर्यामागे 'या' व्यक्तीचा हात

Nita Ambani Personal Makeup Artist : अंबानी कुटुंब (Ambani) हे देशातीलच नाही तर जगभरातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी यांनी देशातील सर्वात मोठ्या कलाकेंद्राची निर्मिती केली. 'नीता अंबानी कल्चरल सेंटर' असे या कलाकेंद्राचे नाव आहे. पण वयाच्या 59 व्या वर्षीदेखील नीता अंबानी (Nita Ambani) खूपच सुंदर दिसतात. मिक्की कॉन्ट्रॅक्टर आज भारतातील लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार,एका व्यक्तीचा मेकअप करण्यासाठी मिक्की कॉन्ट्रॅक्टर 75,000 ते 1 लाख रुपये आकारतो. मिक्की हा इंडस्ट्रीतला सर्वात महागडा मेकअप आर्टिस्ट आहे. एका महिन्यात तो कोट्यवधी रुपये कमावतो. 

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा आणि मल्हार येतील का समोरासमोर? 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत एक भावनिक वळण आलं आहे. मल्हार आणि मंजुळा लवकरच समोरासमोर येतील, असा अंदाज लावला जात आहे. सध्या  तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये स्वराज, मल्हार आणि मंजुळा हे दिसत आहेत. 



Samantha Ruth Prabhu Report Card: ब्युटी विथ ब्रेन; समंथाचं दहावीचं रिपोर्ट कार्ड व्हायरल, गणितात 100 पैकी 100 तर इतिहासात...

Samantha Ruth Prabhu Report Card: साउथ फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असणारी समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ही तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते. समंथाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. सध्या तिचे दहावीचे रिपोर्ट कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समंथा ही एक हुशार विद्यार्थिनी होती, हे तिचे दहावीचे रिपोर्ड कार्ड पाहिल्यानंतर कळते. 



Amar Photo Studio : 'अमर फोटो स्टुडिओ' नाटक घेणार प्रेक्षकांचा निरोप; सुनील बर्वेची भावूक पोस्ट

Amar Photo Studio : 'अमर फोटो स्टुडिओ' (Amar Photo Studi) हे मराठी नाट्यसृष्टीतील लोकप्रिय नाटक आहे. आता हे रंगभूमीवर गाजत असलेलं नाटक प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 'अमर फोटो स्टुडीओ' हे आजच्या तरुणाईने तरुणांसाठी केलेलं एक चिरतरुण नाटक आहे. आता हे नाटक प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने सुनील बर्वेने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. 





Aai Kuthe Kay Karte : अखेर ईशाच्या साखरपुड्याचा मुहूर्त ठरला

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. ईशा आणि अनिशच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी केळकर कुटुंब देशमुखांच्या भेटीला आलेले पाहायला मिळाले. ईशा आणि अनिशच्या लग्नाला अनिरुद्ध विरोध करत आहे. पण मालिकेच्या आगामी भागात अनिरुद्ध  ईशा आणि अनिशच्या लग्नाला होकार देताना दिसणार आहे.



Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan : सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' लवकरच 100 कोटींचा टप्पा पार करणार

Salman Khan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Box Office Collection : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा (Salman Khan) 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा सिनेमा ईदच्या मुहूर्वावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आलं आहे. 

Parinirvana : प्रसाद ओकने शेअर केलं आगामी 'परिनिर्वाण' सिनेमाचं मोशन पोस्टर

Prasad Oak Marathi Movie Parinirvana : मराठमोळा अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) अनेक दर्जेदार मराठी सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता नुकतचं त्याच्या आगामी 'परिनिर्वाण' (Parinirvana) सिनेमाचं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'परिनिर्वाण' सिनेमाच्या पोस्टर लॉन्च सोहळ्याला प्रसाद ओकने पत्नी मंजिरी ओकसह हजेरी लावली होती. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


'बलोच' चा भव्य ट्रेलर लाँच सोहळा संपन्न; चित्रपटात प्रवीण तरडे


बलुचिस्तानात झालेल्या लढाईत मराठ्यांना पराभव स्वीकारावा लागला. सळसळतं रक्त मराठ्यांना शांत बसू देत नव्हतं, आपली हार सहजासहजी स्वीकारतील ते मराठे कसले? बलुचिस्तानातील गुलामगिरीवर मात करून जिद्दीने विजयाचा झेंडा अटकेपार रोवणाऱ्या मराठ्यांच्या रोमांचकारी लढाईवर आधारित 'बलोच' या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचा दिमाखदार सोहळा नुकताच संपन्न झाला. या वेळी भव्य रांगोळी, तुतारी, ढोल ताशाच्या गजरात, मराठमोळ्या, राजेशाही थाटात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.  


Chrisann Pereira: सडक 2 मधील अभिनेत्रीला ड्रग्स प्रकरणात अडकवण्याचा आरोप; अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे कोर्टात हजर, 2 मे पर्यंत पोलीस कोठडी


Chrisann Pereira: सडक 2 (Sadak-2) चित्रपटातील अभिनेत्री क्रिसॅन परेराला (Chrisann Pereira) ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. या प्रकरणी अँथोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यांना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. क्रिसॅनसह आणखी एका डीजेला अशाच प्रकारे अडकावल्याचा आरोप थोनी पॉल आणि राजेश बोभाटे उर्फ रवी यांच्यावर करण्यात आला आहे. 


Shah Rukh Khan : शाहरुख खान कश्मीरमध्ये स्पॉट


Shah Rukh Khan Gets Grand Welcome In Kashmir : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) सध्या त्याच्या आगामी 'डंकी' (Dunki) या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाच्या शूटिंगसाठी तो आता कश्मीरला रवाना झाला आहे. कश्मीरमधील शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर आता व्हायरल होत आहे.


अनेक वर्षांनंतर शाहरुख खान कश्मीरमध्ये त्याच्या सिनेमाचं शूटिंग करत आहे. याआधी तो 'जब तक है जान' या सिनेमाचं शूटिंग करताना दिसला होता. व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख काळ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसून आला आहे. त्याचा हा व्हिडीओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.