Entertainment News Live Updates 25 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 25 Sep 2022 04:16 PM
Shah Rukh Khan : शाहरुखनं शेअर केला खास फोटो

Shah Rukh Khan : शाहरुखनं नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील त्याच्या सिक्स पॅक अॅब्सनं अनेकांचं लक्ष वेधलं आहे. 





Amey Wagh, Sumeet Raghvan : अमेय वाघ अन् सुमीत राघवनचा सोशल मीडिया वॉर; अमेय म्हणाला 'राघू' तर, सुमीत म्हणतोय 'सर्कशीतला वाघ'!

Amey Wagh, Sumeet Raghavan: मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते आणि अभिनेत्री या सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असतात. त्यांच्या या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. अनेक वेळा सेलिब्रिटी हे वेगवेगळे विषय सोशल मीडियावर मांडतात. काही वेळा या पोस्टमधून ते एखाद्या व्यक्तीवर टिका करतात, तर काही वेळ ते स्वत:ची मतं मांडण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. सध्या अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) आणि सुमीत राघवन (Sumeet Raghavan) यांच्यामध्ये सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. हे दोघे एकमेकांवर टिका करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. 


श्रेयस तळपदेच्या "बेबीफेस"ची सोशल मीडियावर चर्चा; व्हिडीओ होतोय व्हायरल

"आपडी थापडी" (Aapdi Thaapdi) या चित्रपटातून मराठी चित्रपटात पुनरागमन करणाऱ्या अभिनेता श्रेयस तळपदेच्या (Shreyas Talpade) बेबीफेसची सोशल मीडियात चर्चा आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने श्रेयसने आपला चेहरा लहान मुलासारखा करत "आपडी थापडी" हे बडबडगीत म्हटलं आहे. याआधी अभिनेत्री मुक्ता बर्वे, संदीप पाठक, नवीन प्रभाकर आणि नंदू माधव यांच्याही बेबीफेसला उत्तम प्रतिसाद मिळाला. 


 





तीच अदा, तीच जादू... 20 वर्षांनी माधुरी थिरकली 'डोला रे डोला'वर, अमृतानेही दाखवला जलवा

'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa 10) हा कार्यक्रम पाच वर्षांनी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच क्रेझ दिसून येत आहे. सध्या 'डोला रे डोला' धक-धक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि अमृता खानविलकरचा (Amruta Khanvilkar) व्हिडीओ व्हायरल होत आहे. 


 



सिद्धार्थ जाधवने केलं अरविंद जगताप यांचं कौतुक!

'अरविंद जगताप .. लेखक म्हणून उत्तमच आहे.. हे सगळ्यांनाच माहीत आहे..पण माणूस म्हणून पण कमाल आहे... आज अचानक भेट झाली.. पण भेटीतला आपलेपणा मला खुप भावला... भावा ही तुझ्यासाठी "गोष्ट छोटी" असेल.. पण माझ्यासारख्या तुझ्या FAN साठी "डोंगराएवढी" आहे... lv u bhava', अशी पोस्ट अभिनेता सिद्धार्थ जाधव याने लिहिली आहे.


 





मोबाईलमुळे जग जवळ आलंय पण जवळची नाती होत आहेत का दूर?, चिमुकल्या परीचा सवाल!

'माझी तुझी रेशीमगाठ' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील सगळ्याच कलाकारांना भरभरुन प्रेम मिळत असतं. या मालिकेतील छोटीशी परी म्हणजेच बालकलाकार मायरा वैकुळ तर सगळ्यांची आवडती बनली आहे. 


 





बॉलिवूड ‘किंग’ शाहरुख खानचा जलवा, ‘जवान’चे शूटिंग पूर्ण होण्याआधीच चित्रपटाची बंपर कमाई!

चित्रपटाचे सॅटेलाईट हक्क झीटीव्हीने विकत घेतले आहेत. तर, OTT अधिकार Netflix कडे आहेत. LetsCinema या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, 'जवान' चित्रपटाचे ओटीटी आणि सॅटेलाईट अधिकार 250 कोटींना विकले गेले आहेत. 


 





Rashmika Mandanna: 'सामी सामी' गाण्यावर गोविंदा आणि रश्मिकाचा जबरदस्त डान्स; व्हिडीओ होतोय व्हायरल

Rashmika Mandanna: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पुष्पा या चित्रपटामुळे रश्मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिचा गुडबाय (Goodbye) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात रश्मिकासोबतच अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री नीना गुप्ता हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. सध्या या चित्रपटाची टीम चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. नुकतीच रश्मिकानं प्रमोशनसाठी  'DID सुपर मॉम्स' (DID Super Moms) या स्पर्धेमध्ये हजेरी लावली. या शोमध्ये रश्मिकानं अभिनेता गोविंदासोबत (Govinda) सामी सामी या गाण्यावर डान्स केला. 



Louise Fletcher Death: ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर यांचे निधन, 88व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ऑस्कर विजेत्या अभिनेत्री लुईस फ्लेचर (Louise Fletcher) यांचे वयाच्या 88व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे.


 





Nayanthara Beyond The Fairy Tale teaser: नयनतारा अन् विग्नेशच्या प्रेमाची कथा; नेटफ्लिक्सनं शेअर केला 'नयनतारा बियोंड द फेरी टेल' चा टीझर

Nayanthara,Vignesh Shivan : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा  (Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022  रोजी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. आता त्यांच्या लव्हस्टोरीवर आधारित असणारी 'नयनतारा बियोंड द फेरी टेल' ही डोक्युमेंट्री लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या डॉक्युमेंट्रीचा टीझर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सनं सोशल मीडिया अकाऊंटवरुन या डॉक्युमेंट्रीचा टीझर शेअर केला आहे. 



Neha Kakkar : 'मी इतक्या लहान वयात...'; फाल्गुनी पाठकच्या गाण्याचा रिमेक केल्यानंतर ट्रोल झालेल्या नेहानं शेअर केली पोस्ट

Neha Kakkar : गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ही तिच्या गाण्यांमुळे चर्चेत असते. नुकत्याच रिलीज झालेल्या 'ओ सजना' या गाण्यासाठी गायिका नेहा कक्करला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जात आहे. हे गाणं फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) यांच्या 'मैने पायल है छनकाई...' (Maine Payal Hai Chhankai) या गाण्याचा रिमेक आहे. फाल्गुनी पाठक यांचे 'मैने पायल है छनकाई...'  हे गाणे 1999 मध्ये रिलीज झाले. या गाण्याचा रिमेक केल्यानं नेहाला नेटकरी ट्रोल करत आहेत. आता नुकतीच नेहानं एक पोस्ट शेअर करुन ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 



‘हम बने तुम बने’ ते ‘वाह वाह रामजी’, एस. पी. बालासुब्रमण्यम यांची सुप्रसिद्ध गाणी!

एस. पी. बालासुब्रमण्यम यांना इंजिनीअर बनायचे होते. मात्र, गायन-संगीत क्षेत्राकडे वळणे हेच कदाचित त्यांचे प्राक्तन असावे. इंजिनीअर बनण्यासाठी सुरु झालेला हा प्रवास बदलत्या परिस्थितीमुळे हळूहळू संगीताकडे वळू लागला. सुरुवातीला त्यांनी मोठ्या संगीतकारांकडे सहायक म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. नंतर त्यांनी एकट्यांनी गाणी गाण्यास सुरुवात केली. त्यांच्या आवाजाने साऊथच नव्हे तर बॉलिवूड विश्वाला देखील मोहिनी घातली. त्यांची गाणी आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात.


वाचा संपूर्ण बातमी

अभिनेत्री व्हायचं बालपणीच ठरवलं, मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान मिळवलं! वाचा अभिनेत्री दिव्या दत्ताबद्दल...

केवळ छोटा पडदाच नव्हे तर, मोठ्या पडद्यावर देखील आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या अभिनेत्री दिव्या दत्ता (Divya Dutta) हिचा आज (25 सप्टेंबर) वाढदिवस आहे. 25 सप्टेंबर 1977 रोजी लुधियानामध्ये जन्मलेली दिव्या यावर्षी तिचा 45 वा वाढदिवस साजरा करत आहे.


वाचा संपूर्ण बातमी


 





‘छेल्लो शो’ची ऑस्करवारी वादात; चित्रपटाची निवड अयोग्य म्हणत FWICEचं केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र!

पान नलिन (Pan Nalin) यांचा ‘छेल्लो शो’ (Chhello Show) हा चित्रपट आता वादात सापडला आहे. 2023च्या ऑस्कर नामांकनासाठी भारताकडून या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. मात्र, आता फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजने (FWICE) या निवडीला अयोग्य म्हणत, चित्रपटाला विरोध केला आहे. यासंदर्भात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजकडून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना एक पत्र देखील लिहिण्यात आलं आहे. FWICEने म्हटले की, हा चित्रपट भारतीय चित्रपट नाही. चित्रपटाच्या निवडीची पद्धत योग्य नसून, परीक्षकांनी त्यावर विचार केला पाहिजे.


वाचा संपूर्ण बातमी

राष्ट्रीय सिनेमा दिनानंतरही स्वस्तात पाहता येणार चित्रपट; ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार ऑफर! जाणून घ्या...

नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ (National Cinema Day) साजरा करण्यात आला. या दिवशी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये कमालीची गर्दी पाहायला मिळाली. अवघ्या 75 रुपयांत चित्रपट पाहायला मिळाल्याने चित्रपटगृह हाऊसफुल झाली होती. 75 रुपयांच्या तिकिटाचा प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पाहायला मिळाला होता. याच गोष्टीचा विचार करत आता काही मल्टीप्लेक्समध्ये येत्या 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत तिकिटांचे दर कमी ठेवण्याची ही स्कीम सुरु राहणार आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


राजकुमार राव येणार प्रेक्षकांच्या भेटीला; राधिका आपटेसह झळकणार 'मोनिका ओ माय डार्लिंग' सिनेमात


राजकुमार राव (Rajkummar Rao) त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. राजकुमार सध्या त्याच्या आगामी 'मोनिका ओ माय डार्लिंग' (Monica O My Darling) या सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'मोनिका ओ माय डार्लिंग' हा सिनेमा नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi) आणि राधिका आपटेदेखील (Radhika Apte) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'मोनिका ओ माय डार्लिंग' हा डार्क-कॉमेडी सिनेमा आहे.


कोरोना झाला अन् संधी गेली; मुक्ता बर्वेच्या हातातून निसटली 'ती' भूमिका


'हवाहवाई' (Hawahawai) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सध्या हा सिनेमा चर्चेत आहे. 'द ग्रेट इंडियन किचन' या बहुचर्चित मल्याळम सिनेमातील अभिनेत्री निमिषा संजयनं (Nimisha Sajayan) 'हवाहवाई' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. पण निमिषाच्या जागी मराठमोळी, अभ्यासू अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) दिसणार होती. 'हवाहवाई' या सिनेमासाठी अभिनेत्री मुक्ता बर्वेला विचारणा झाली होती. पण तेव्हा मुक्ताला कोरोनाची लागण झाल्याने तसेच तिला 'अजूनही बरसात आहे' (Ajunahi Barsaat Aahe) ही मालिका मिळाल्याने तिने 'हवाहवाई' या सिनेमाला रामराम ठोकला.


राणा अन् व्यंकटेश दग्गुबातीची जोडी करणार पडद्यावर धमाल, ‘राणा नायडू’चा धमाकेदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!


साऊथ मनोरंजन विश्वातील दोन मोठे सुपरस्टार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे. अभिनेता राणा दग्गुबाती (Rana Daggubati) आणि त्याचा काका व्यंकटेश दग्गुबाती (Daggubati Venkatesh) ही जोडी मोठ्या पडद्यावर लवकरच एकत्र दिसणार आहे. दोघेही पहिल्यांदाच एका मोठ्या प्रोजेक्टमध्ये एकत्र झळकणार आहेत. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या ‘राणा नायडू’ (Rana Naidu) या वेब सीरिजमध्ये राणा दग्गुबाती त्याच्या काकासोबत अर्थात व्यंकटेश दग्गुबाती दिसणार आहेत. जेव्हापासून या वेब सीरिजची घोषणा झाली आहे, तेव्हापासून ही सीरिज बघण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. आज या वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.


सैराट फेम अभिनेता सुरज पवार चौकशीसाठी राहुरीत हजर; आर्थिक फसवणूक प्रकरणी सहा तास कसून चौकशी


अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील फसवणुक प्रकरणामुळे सध्या सैराट फेम अभिनेता सुरज पवार (Suraj Pawar) चर्चेत आहे. या प्रकरणामुळे पोलीस सध्या सुरज पवारची चौकशी करत आहेत. मंत्रालयात नोकरी मिळवून देतो असे आमीष दाखवून पैशांची लूट केल्या प्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस ठाण्यात 15 सप्टेंबर रोजी सुरज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याच प्रकरणी चौकशीसाठी सुरज राहुरी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर झाला.


प्रियांकानं न्यूयॉर्कमध्ये घेतला पाणीपुरीचा आस्वाद; 'देसी गर्ल'चा व्हिडीओ व्हायरल


प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रानं (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही विशेष ओळख निर्माण केली आहे. प्रियांकाला अनेक जण ग्लोबल स्टार देखील म्हणतात. प्रियांका ही सध्या न्यूयॉर्कच्या विविध इव्हेंट्समध्ये सहभाग घेत आहे. प्रियांकानं नुकत्याच एका इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या इव्हेंटमधील व्हिडीओ प्रियांतानं शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रियांकासोबत नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई देखील दिसत आहे. प्रियांकानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पाणीपुरी खाताना दिसत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.