Entertainment News Live Updates 23 May: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
आदित्य नारायणने (Aditya Narayan) लाडक्या लेकीचा पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. 'त्विषा' असे आदित्य नारायणच्या मुलीचे नाव आहे. 'त्विषा' तीन महिन्यांची झाल्यानंतर आदित्यने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे.
अभिनेता सुमीत राघवन (Sumeet Raghvan) नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर आपली मतं मांडत असतो. एकीकडे त्याने मांडलेल्या मुद्द्यांचं कौतुकही होतं. तर दुसरीकडे त्याला ट्रोलही केलं जातं. पण असं असूनही तो नेहमी सोशल मीडियावर व्यक्त होत असतो. नुकतेच सुमीत राघवनने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे.
मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अनेक मराठी-हिंदी सिनेमे, मालिका आणि वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या अमृता 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमामुळे चर्चेत आली आहे. या सिनेमाने चांगली कमाई केल्याने अमृताने अक्कलकोटमधील ‘श्री स्वामी समर्थ’ आणि तुळजापूरमधील ‘तुळजाभवानी देवी’चे दर्शन घेतले आहे.
चिरंतन राहणाऱ्या प्रेमावर भाष्य करणारा 'आठवा रंग प्रेमाचा' (Aathva Rang Premacha) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि विशाल आनंद ही फ्रेश जोडी या सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
रवी जाधव यांचा 'टाईमपास 3' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात हृता दुगुर्ळे मुख्य भूमिकेत असणार आहे. तर प्रथमेश परब तिचा सहकलाकार असणार आहे. या सिनेमात हृताचा दबंग अंदाज पाहायला मिळणार आहे.
Safed First Look : जगभरातील अनेक दिग्गज 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला (Cannes Film Festival 2022) हजेरी लावत आहेत. संदीप सिंह दिग्दर्शित 'सफेद' (Safed) सिनेमाच्या पोस्टरचे अनावरण 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये करण्यात आले आहे. 'सफेद' सिनेमाचा फर्स्ट लूक ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांनी लॉंच केला आहे.
CHYD : 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. केवळ महाराष्ट्रातच नाही, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांकडून या कार्यक्रमाला पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर या आठवड्यात प्रेक्षकांच्या लाडक्या जोड्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये अनेक कलाकारांची देखील लग्न झाली. तर काही कलाकारांचा साखरपुडादेखील झाला. या सगळ्यात चर्चेत होते ते म्हणजे विराजास कुलकर्णी आणि शिवानी रंगोळे आणि प्रेक्षकांचा लाडका राणादा आणि पाठक बाई म्हणजेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. हे दोन्ही सेलेब्रिटी कपल या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या' च्या मंचावर हजेरी लावणार आहेत.
भारतामधील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा(Anand Mahindra)हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. अनेक वेळा नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्सला ते रिप्लाय देतात. नुकतेच आनंद महिंद्रा यांनी एक ट्वीट केले आहे. हे ट्वीट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
Pravah Picture : दर्जेदार मराठी चित्रपटांचा नजराणा प्रेक्षकांच्या भेटीसाठी घेऊन आलेल्या ‘प्रवाह पिक्चर’ या वाहिनीने नुकताच एक स्तुत्य उपक्रम राबवला. या अनोख्या उपक्रमा अंतर्गत मुंबईतील तुलसी पाईप मार्गाजवळ मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सिनेमांचं भव्यदिव्य भिंतीचित्र साकारण्यात आलं. गेला महिनाभर अनेक चित्रकारांचा ताफा या निस्तेज भिंतीमध्ये जीव ओतण्यासाठी मेहनत घेत आहे. मराठी कलाकारांची हुबेहुब चित्र साकारत या चित्रकारांनी तुलसी पाईप मार्गाचं रुप पालटलं आहे. ही बोलकी भिंतीचित्र सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते भरत जाधव, अंकुश चौधरी आणि प्रतिभावंत दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या खास उपस्थितीत ह्या भव्यदिव्य भिंतीचित्रांचं अनावरण करण्यात आलं. याप्रसंगी ही अनोखी भिंतीचित्र रेखाटणाऱ्या चित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे कॉस्ट्यूम डिझायनर अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे. अभिषेकनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करुन अकबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिषेकनं पोस्टमध्ये लिहिलं, 'घरी परत आल्यावर मला एक बातमी कळाली.अकबर शाहपुरवाला यांचे निधन झाले आहे. मी त्यांना अक्की अंकल, असं म्हणत होतो. माझ्या वडिलांचे सूट आणि कॉस्ट्यूम्स हे त्यांनीच डिझाइन केले होते. त्यांनी तयार केलेला सूट माझ्याकडे अजूनही आहे. तो सूट मी रिफ्यूजी चित्रपटाच्या प्रिमियरमध्ये परिधान केला होता. ते मला नेहमी सांगत होते की, सूट तयार करणे हे केवळ शिलाई करण्याचे काम नाहीये. ती एक भावना आहे. त्यांनी माझे कॉस्ट्यूम्स हे खूप प्रेमाने डिझाइन केले होते. '
शैलेश लोढा यांच्यानंतर आता मुनमुन दत्ता देखील सोडणार 'तारक मेहता' मालिका? चर्चेला उधाण
दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. याबाबत करण म्हणाला, 'दाक्षिणात्य चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी आम्हाला शिकवलं की सिनेमाचा स्टँडर्ड हा किती उच्च असला पाहिजे.' तसेच करणनं गंगूबाई काठियावाडी आणि भूल भूलैय्या2 या चित्रपटांचे देखील कौतुक केलं.
कार्तिकच्या भूल भूलैय्या-2 ची बॉक्स ऑफिसवर जादू; तीन दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई
भूल भूलैय्या-2 या चित्रपटानं आत्तापर्यंत 50 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. भूल भूलैय्या-2 नं शनिवारी (22 मे) या चित्रपटानं 18.34 कोटींची कमाई केली असून रविवारी म्हणजेच रिलीज झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली.
पार्श्वभूमी
केदार शिंदेंनी शेअर केला अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ
Ankush Choudhary : केदार शिंदेचा 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashtra Shahir) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शाहीर साबळे यांचा नातू आणि लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केलं आहे. आता केदार शिंदेंनी अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमात अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. सिनेमात अंकुश शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे. केदार शिंदेंनी आता अकुंश चौधरीचा शाहीर साबळेंची वेशभूषा साकारतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या भूमिकेसाठी अंकुश खूप मेहनत घेत आहे. अंकुश चौधरी शाहीर साबळेंची वेशभूषा कशा प्रकारे साकारत आहे, त्यासाठी तो कोणता मेकअप करतो या गोष्टी केदार शिंदेंनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आल्या आहेत.
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने केला नवा विक्रम; रविवारी सलग 22 तास प्रेक्षकांचं मनोरंजन
Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाने आता नवा विक्रम केला आहे. या कार्यक्रमाचे 500 पेक्षा जास्त भाग पूर्ण झाले आहेत. सध्या हा कार्यक्रम हास्यपंचमी करतो आहे. कारण महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोम. ते शुक्र. रात्री 9 वाजता पाच दिवस पाहण्यास मिळतो आहे. आता रविवारी सलग 22 तास हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -