Entertainment News Live Updates 23 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jul 2022 05:03 PM
Shamshera Box Office Collection : रणबीरचा 'शमशेरा' बॉक्स ऑफिसवर आपटला; पहिल्या दिवशी केली फक्त 10.25 कोटींची कमाई

'शमशेरा' या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसतो आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने फक्त 10.25 कोटींची कमाई केली आहे. विकेंडला हा सिनेमा चांगली कमाई करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडला आहे. 





Manoj Muntashir : सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार जाहीर झाल्याने भारावून गेलो : मनोज मुन्तशिर

राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपला आनंद व्यक्त करत मनोज म्हणाला, "सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार मला जाहीर झाला आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. राष्ट्रीय पुरस्कार मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. यंदाचा पुरस्कार मला जाहीर झाल्याचा नक्कीच आनंद आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चाहते कौतुक करत आहे. या सर्व गोष्टी पाहून मी भारावलो आहे". 

‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Dunki : बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने एप्रिलमध्येच त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'डंकी'ची (Dunki) घोषणा केली होती. अभिनेत्याच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते आणि प्रेक्षक खुश झाले होते. त्याच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले असून, शाहरुख खान या चित्रपटाच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी लंडनला पोहोचला आहे. नुकतेच त्याच्या या शूटच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान याचा हा लूक पाहून चाहते खुश झाले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Deepesh Bhan Passes Away : 'भाभीजी घर पर है' फेम अभिनेता दीपेश भान यांचे निधन

‘भाभी जी घर पर हैं’ या मालिकेत ‘मलखान’ची भूमिका साकारणारा अभिनेता दीपेश भान यांचे निधन झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपेश क्रिकेट खेळत होते आणि अचानक बेशुद्ध होऊन पडले. यानंतर तिथे उपस्थित लोकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. सोशल मीडियावर ‘मलखान’च्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता दीपेश भान यांच्या निधनाने अवघ्या टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे.


 





'रंजना - अनफोल्ड’ चित्रपटामधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!

Ranjana Unfold : मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख (Ranjana Deshmukh) यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.


वाचा संपूर्ण बातमी

न्यूड फोटो शेअर करण्याचं स्वतंत्र, मग स्वतःच्या मर्जीने हिजाब परिधान करण्याचं का नाही? अबू आझमींच ट्वीट चर्चेत

Bollywood Celeb Nude Photoshoot : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने नुकतेच एक न्यूड फोटोशूट करत इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. त्याचं नवं फोटोशूट प्रचंड चर्चेत आलं आहे. रणवीर सिंहच्या या फोटोशूटने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. या फोटोंमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. पेपर मॅगझीनच्या फोटोशूटमध्ये रणवीर सिंहने न्यूड पोज दिल्या आहेत. मात्र, यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी (Abu Azmi) यांनी देखील एक ट्विट करत बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.


वाचा संपूर्ण बातमी

कधी काळी लोकांनी केली गाण्याची थट्टा, आता आपल्या आवाजामुळे जगभरात प्रसिद्ध झाला हिमेश रेशमिया!

Himesh Reshammiya Birthday : आपल्या दमदार आवाजासाठी प्रसिद्ध गायक हिमेश रेशमिया (Himesh Reshammiya) याचा आज (23 जुलै) वाढदिवस आहे. हिमेश रेशमिया देशातील लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. हिमेश रेशमियाचा जन्म 23 जुलै 1973 रोजी गुजरातमध्ये झाला. बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हिमेशचा आज त्याचा 46वा वाढदिवस साजरा करत आहे. हिमेश त्याच्या हटके गाण्यांसाठी ओळखला जातो. हिमेशने ‘तेरा सुरुर’, ‘झलक दिखला जा’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. आज तो आपल्या आवाजामुळे जगभरात गाजत असला, तरी कधीकाळी त्याच्या याच आवाजाची खिल्ली उडवली गेली होती.


वाचा संपूर्ण बातमी

वडील प्रसिद्ध अभिनेते असतानाही मुलाने केली होती फॅक्टरीत नोकरी! वाचा अभिनेता सूर्याबद्दल...

Suriya Birthday : प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता सूर्या (Suriya) सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतेच त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अभिनेता सूर्या आज (23 जुलै) आपला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या अवघ्या एक दिवस आधीच त्याला मोठे गिफ्ट मिळाले आहे. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणाऱ्या सूर्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वी नोकरी केली होती. मात्र, अभिनयाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं होतं.


वाचा संपूर्ण बातमी

'रूप नगर के चीते' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

Roop Nagar Ke Cheetey : प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक खास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढउतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच, आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' (Roop Nagar Ke Cheetey) या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


CM Eknath Shinde : 'मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान आहे,' अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 68 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कांरामध्ये बाजी मारणाऱ्या विविध श्रेणीतील चित्रपटांचे तसेच निर्माता, दिग्दर्शक, कलावंत आणि तंत्रज्ञ आदींचे अभिनंदन केले आहे.


सिने प्रेमींसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज (22 जुलै) करण्यात आली. या पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटांना विविध विभागात पुरस्कार जाहीर झाले आहेत.


सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मराठी चित्रपट 'सुमी'ने पटकावला आहे. तसेच सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून ख्यातनाम गायक राहूल देशपांडे यांना 'मी वसंतराव' चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


'गोष्ट एका पैठणीची' (सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट), 'फनरल'(सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट),  'जून, गोदाकाठ, अवांछित' (तीनही विशेष उल्लेखनीय चित्रपट) पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. नरवीर तानाजी मालुसरेंच्या पराक्रमांवर आधारित 'तानाजी - द अनसंग वॉरियर' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार आणि त्यातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल अजय देवगण यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार पटकावणाऱ्या अनिश गोसावी, आकांक्षा पिंगळे, दिव्येश इंदुलकर यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले असून, त्यांचे अभिनंदन केले आहे. सध्या मनोरंजनसृष्टीत आनंददायी वातावरण आहे. विजेत्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.