Entertainment News Live Updates 23 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 23 Dec 2022 03:00 PM
Abhishek Bachchan: 'अभिषेक बच्चन हा त्याच्या वडिलांइतका टॅलेंटेड नाही' तस्लिमा नसरीन यांचे ट्वीट; अभिषेकच्या उत्तरानं जिंकली अनेकांची मनं!

Abhishek Bachchan On Taslima Nasrin: बॉलिवूडचे महानायक अशी ओळख असणारे अमिताभ  बच्चन (Amitabh Bachchan) हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. तसेच मनेरंजन सृष्टीमध्ये त्यांनी विशेष स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ  यांचा मुलगा अभिषेक (Abhishek Bachchan) हा देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसिद्ध लेखिका तस्लीम नसरीन (Taslima Nasrin) यांनी नुकतेच बिग बी आणि अभिषेक यांच्याबद्दल एक ट्वीट शेअर केले. या ट्वीटनं अनेकांचे लक्ष वेधलं. पण त्यांच्या ट्वीटला अभिषेकनं दिलेल्या उत्तरानं अनेकांची मनं जिंकली आहेत.  




 





Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे निधन; वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kaikala Satyanarayana Death: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते कैकला सत्यनारायण (Kaikala Satyanarayana) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कैकला यांनी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्यासंबंधित समस्यांचा सामना करत होते. 



Amruta Khanvilkar:

Amruta Khanvilkar: अभिनेत्री अमृता खानविलकर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. नुकतेच अमृतानं तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. व्हाईट टी-टॉप, ब्यु डेनिम आणि प्रिंटेड जॅकेट अशा लूकमधील फोटो अमृतानं शेअर केले. अमृतानं गळ्यात  सिल्वर ज्वेलरी देखील घातलेल्या दिसत आहे. अमृताच्या या हटके लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.  


पाहा फोटो :



Badshah: बादशाहच्या कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्; नेटकरी म्हणतायत, 'शेअर्स विकावे लागतील '

Badshah: प्रसिद्ध रॅपर बादशाह (Badshah) हा त्याच्या गाण्यांमुळे नेहमी चर्चेत असतो. बादशाहच्या कॉन्सर्टचं आयोजन 24 डिसेंबर रोजी मुंबईमध्ये करण्यात आलं आहे. वरळीच्या नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियामध्ये हे कॉन्सर्ट होणार आहे. कॉन्सर्टच्या तिकीटाची किंमत 999 पासून सुरु होते. पण 999 रुपयांचे सर्व तिकीट विकले गेले आहेत.  या कॉन्सर्टचं सर्वात महाग तिकीट हे 6 लाख रुपयांचे आहे.  'पागल' नावाच्या या कॉन्सर्टमधील बदाशाहच्या  लाईव्ह परफॉर्मन्स पाहण्यासाठी आता लोकांना लाखो रुपये मोजावे लागणार आहेत. काही नेटकऱ्यांनी बादशाहच्या या कॉन्सर्टच्या तिकीटाच्या किंमतींवर प्रतिक्रिया दिली आहे. 



Jhoome Jo Pathaan: शाहरुख-दीपिकाच्या 'झूमे जो पठाण' गाण्यावर अभिनेत्याची प्रतिक्रिया; म्हणाला, 'हा भारत आहे पाकिस्तान नाही...'

KRK On Jhoome Jo Pathaan Song: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) पठाण(Pathaan) हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. पठाणमधील झूमे जो पठाण हे गाणं देखील रिलीज झाला. या गाण्यातील शाहरुखच्या फिटनेसनं आणि दीपिकाच्या ग्लॅमरस लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. आता शाहरुख आणि दीपिकाच्या या गाण्यावर कमाल आर खान (Kamaal Rashid Khan) उर्फ ​​केआरकेनं प्रतिक्रिया दिली आहे. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


तुझेच मी गीत गात आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सेटवर रितेश-जेनिलियानं लावली हजेरी



Genelia Deshmukh, Riteish Deshmukhस्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेतील मल्हार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेतील जयदीप-गौरीच्या नात्यात बरीच उलथापालथ सुरु आहे. मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात स्वराजमुळे कटुता निर्माण झालीय. तर तिकडे जयदीप-गौरीही एकमेकांपासून दुरावले आहेत. दोन्ही मालिकांमध्ये जरी नात्यात दुरावा निर्माण झाला असला तरी प्रेम मात्र निरंतर आहे. याच प्रेमाची जाणीव करुन देण्यासाठी मालिकेत दोन खास पाहुणे येणार आहेत. तुझेच मी गीत गात आहे मालिकेच्या सेटवर रितेश आणि जिनिलिया दोघांनीही खास भेट दिलीय. नातं प्रेमामुळे टिकतं. कितीही अडचणी आल्या तरीही प्रेमासाठी खंबीर रहायचं. आपण हरलो तर प्रेमही हरतं म्हणून हिंमतीने लढायचं हा अनोखा संदेश रितेश-जिनिलियाने स्वराज आणि मल्हारला दिलाय.


Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरनं सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्याचं कारण; म्हणाली, 'महेश बाबूनं...'



Namrata Shirodkar: अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध होती. नम्रतानं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. तिनं काही हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं. नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूसोबत(Mahesh Babu) लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नम्रता शिरोडकरनं अभिनय क्षेत्र सोडण्यामगचं कारण सांगितलं. 


Dhishkyaoon Marathi Movie : प्रथमेश परब चढणार बोहल्यावर? 'ढिशक्यांव' चित्रपटात दिसणार लग्नसोहळ्याची धमाल


Prathamesh Parab : अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. मात्र, आता याच चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मात्र, प्रथमेश खऱ्या आयुष्यात नव्हे तर मोठ्या पडद्यावरील आयुष्यात बोहल्यावर चढण्यास सज्ज झाला आहे. विनोद आणि प्रेम याचं उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' (Dhishkyaoon) या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये प्रथमेश मुंडावळ्या बांधून, नवरा बनून त्याच्या बायकोसोबत पाहायला मिळतोय. मात्र या पोस्टरमध्ये गोंधळात पाडणारी बाजू म्हणजे प्रथमेशच्या बायकोच्या हातात बंदूक पाहायला मिळत असून ती बंदूक तिने प्रथमेशवर रोखून धरलेली आहे, तर प्रथमेश आणि अहेमदच्या गळयात हार पाहायला मिळतोय त्यामुळे हा नेमका गोंधळ काय आहे हे गुपित 10 फेब्रुवारी 2023 ला समोर येणार आहे.   



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.