Entertainment News Live Updates 23 August : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Ananya Movie Released On Prime : जगण्याची नवी दिशा देणारा 'अनन्या' (Ananya) सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे!' असं म्हणत 22 जुलैला 'अनन्या' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात प्रेक्षकांना 'अनन्या'चा जिद्दीचा प्रवास पाहायला मिळाला. या सिनेमात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) मुख्य भूमिकेत आहे.
The Kapil Sharma Show : विनोदवीर कपिल शर्मा (Kapil Sharma) सध्या 'द कपिल शर्मा शो'मुळे (The Kapil Sharma Show) चर्चेत आहे. आता या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून लवकरच नवे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुंबईतील सिटी स्टूडिओमध्ये या कार्यक्रमाचं शूटिंग होत आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार (Akshay Kumar) सहभागी होणार आहे.
Unad Movie : जिओ स्टुडिओजचा बहुचर्चित 'उनाड' (Unad) हा सिनेमा 2023 मध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. आदित्य सरपोतदारने (Aditya Sarpotdar) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात आशुतोष गायकवाड, हेमल इंगळे, अभिषेक भराटे, चिन्मय जाधव, देविका दफ्तरदार आणि संदेश जाधव हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
Haddi : नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) सध्या त्याच्या आगामी 'हड्डी' (Haddi) सिनेमामुळे चर्चेत आहे. निर्मात्यांनी सिनेमाची घोषणा करत नवाजुद्दीनचा 'हड्डी' सिनेमातील फर्स्ट लुक आऊट केला आहे. या सिनेमात नवाजुद्दीन ट्रांसजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हड्डी' सिनेमाच्या मोशन पोस्टरमधील नवाजुद्दीन लुक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
औरंगजेबासारख्या स्वराज्यावर टपून बसलेल्या दिल्लीपती बलाढ्य मोगल पातशहाला महाराष्ट्राच्या मातीत कायमचा संपवण्यात स्वराज्यातील स्त्रिया देखील पुरुष योध्यांपेक्षा कमी नाही, हे दाखवून देणाऱ्या आणि मराठ्यांचा देदीप्यमान संग्राम असणाऱ्या भारतीय इतिहासाला पराक्रमाच्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या वीरांगना म्हणजे महाराणी छत्रपती ताराबाई. त्यांच्याच जीवनावर आधारीत 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' या चित्रपटाचा मुहूर्त आज संपन्न झाला आहे.
अभिनेत्री वाणी कपूर सध्या चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आज (23 ऑगस्ट) तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
ऋषी कृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' 26 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'समायरा'च्या प्रवासाची ही कहाणी सर्वांपर्यंत पोहचावी म्हणून चित्रपटाचे जोरदार प्रोमोशन चालू आहे. याच चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी पुण्यात बाईक रॅली काढण्यात आली. केतकी नारायण तिच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अव्हेंजर बाईक चालवताना दिसते आहे. स्वतंत्र, सकारात्मक दृष्टिकोन असलेली 'समायरा' स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात निघालेल्या प्रवासाची ही कथा आहे. नुकतीच केतकीने पुण्यात सर्व महिलांबरोबर बाईक चालवली. या बाईक रॅलीत पुण्यातील बऱ्याच महिलांचा सहभाग होता.
यंदाच्या गणेशोत्सवाचे औचित्य साधत ‘नाद नाद गणपती....’ (Nad Nad Ganpati) या गाण्यानं म्युझिक चॅनलचा शुभारंभ होत असून, 'जी करदा'सारखी अनेक हिट गाणी गायलेला विख्यात गायक दिव्या कुमारने (Divya Kumar) हे गाणे गायले आहे.
टिकटॉक व्हिडीओंमुळे चर्चेत आलेल्या भाजप नेत्या सोनाली फोगट (Sonali Phogat) यांचे आज (23 ऑगस्ट) गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म टिकटॉकवरील व्हिडीओंमुळे त्या प्रचंड चर्चेत आल्या होत्या. भाजपने त्यांना हिसार जिल्ह्यातील आदमपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती.
हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना एम्सच्या आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांना लवकरात लवकर शुद्ध यावी यासाठी देशभरातील चाहते प्रार्थना करत आहेत. या सगळ्यादरम्यान, एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एक अज्ञात व्यक्ती राजू श्रीवास्तव यांना ठेवण्यात आलेल्या आयसीयूमध्ये घुसली आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यास सुरुवात केली. मात्र, सुरक्षारक्षकांच्या नजर पडताच त्या व्यक्तीला तिथून हटवण्यात आले. या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा वाढवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
केके यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत झाला होत. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमधून झाले आणि दिल्ली विद्यापीठाच्या किरोडी माल कॉलेजमधून त्यांनी पदवी शिक्षण प्राप्त केले. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वीच अनेक जिंगल्स गायल्या होत्या. 1999च्या क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी त्यांनी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणेही गायले होते.
अभिनेत्री सायरा बानो आज (23 ऑगस्ट) आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 23 ऑगस्ट 1944 रोजी भारतात झाला. त्यांच्या आई नसीम बानो (Naseem Banu) या देखील त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांचे वडील मियां एहसान-उल-हक हे चित्रपट निर्माते होते. त्यांनी 'फूल' आणि 'वादा' चित्रपटाची निर्मिती केली होती. अर्थात अभिनयाचा वारसा सायरा यांना कुटुंबाकडूनच मिळाला होता.
जिओ स्टुडिओजने नुकतीच तीन वेगवेगळ्या सिनेमांची घोषणा केल्यानंतर आता आणखी एका थ्रिलर सिनेमाची घोषणा करीत आहे. सिनेमाचे नाव '4 ब्लाइंड मेन' (4 Blind Men) असे आहे. हा सिनेमा चार अंध व्यक्ती आणि हत्ती यांवर आधारित प्रसिद्ध बोधकथेवर चित्रित केला आहे.
साऊथ स्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. न्यूयॉर्कमधील सर्वात मोठ्या वार्षिक इंडियन डे परेडमध्ये (NYC Indian Day Parade) अभिनेत्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. भारत देश यंदा आपल्या स्वातंत्र्याचे 75वे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. त्याचवेळी एक भारतीय अभिनेता जागतिक स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करत असल्याने हा भारतासाठी अभिमानाचा क्षण आहे.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
"मी आवडत नसेल तर माझे सिनेमे पाहू नका"; स्टार किडला ट्रोल करणाऱ्यांना आलिया भट्टचं सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या तिच्या आगामी 'ब्रम्हास्त्र' (Brahmastra) सिनेमामुळे तसेच प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे. आलियाने नावापुढे कपूर आडनाव लावल्याने तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं. आलियाला तिच्या कामामुळे किंवा वैयक्तिक आयुष्यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण आता "मी आवडत नसेल तर माझे सिनेमे पाहू नका" असं म्हणत आलियाने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
अल्लू अर्जुन अन् रश्मिका मंदान्नाची जोडी पुन्हा धुमाकूळ घालणार; 'पुष्पा 2'च्या शूटिंगला सुरुवात
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) हा सिनेमा 17 डिसेंबर 2021 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रेक्षक 'पुष्पा 2' (Pushpa 2) म्हणजेच 'पुष्पा: द रूल' (Pushpa The Rule) या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत होते. अशातच अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'पुष्पा द रुल' या सिनेमाच्या शूटिंगला अखेर सुरुवात झाली आहे.
'दगडी चाळ 2'ने सिनेमागृहात रोवला यशाचा झेंडा; तीन दिवसांत केली दोन कोटीहून अधिक कमाई
'दगडी चाळ 2' (Daagdi Chawl 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. चंद्रकांत कणसे (Chandrakant Kanse) दिग्दर्शित या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या सिनेमाने सिनेमागृहात यशाचा झेंडा रोवला आहे. तीन दिवसांत या सिनेमाने दोन कोटींहून अधिक कमाई केली आहे.
आमिरच्या 'लाल सिंह चड्ढा'ला ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळेना; नेटफ्लिक्सकडून करार रद्द
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या (Aamir Khan) लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. आमिर खानच्या या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सोशल मीडियावर अनेक नेटकरी करत आहेत.आमिरचे काही चाहते हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होण्याची वाट बघत होते. पण आता त्याच्या चाहत्यांना हा चित्रपट ओटीटीवर बघता येईल की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. लाल सिंह चड्ढा या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजसाठी खरेदीदार मिळत नाहीये. प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सनं देखील हा चित्रपट रिलीज करण्यास नकार दिला आहे.
नवा लूक अन् डॅशिंग अवतार! कपिल शर्मा लवकरच टीव्हीवर परतणार
‘द कपिल शर्मा शो’ बंद झाल्याचे कळताच प्रेक्षकही नाराज झाले होते. मात्र, आता हा शो पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेले काही महिने कॅमेरापासून दूर असलेल्या कपिल शर्माने (Kapil Sharma) नुकताच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कपिल शर्माने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -