Entertainment News Live Updates 22 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Mazhi Tuzhi Reshimgath : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) या मालिकेचा आज शेवटचा भाग प्रसारित होणार आहे. मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते नाराज झाले आहेत. दरम्यान प्रार्थना बेहेरेने (Prarthana Behere) एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
Celebrity Nude Photoshoot : न्यूड फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं यासाठी खूप धाडस लागतं. अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आहे. पण उर्फीआधी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh), आमिर खान (Aamir Khan), मराठमोळी अभिनेत्री आणि महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) फेम वनिता खरात (Vanita Kharat) आणि मिलींद सोमण (Milind Soman) या कलाकारांचं न्यूड फोटोशूटदेखील चर्चेत आलं होतं.
Shiv Thakare On Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) बाजी मारू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेच्या लाडक्या बहिणीने म्हणजेच मनिषा ठाकरेने (Manisha Thakare) आपला विश्वास व्यक्त केला आहे. शिवची बहिण म्हणाली,"बिग बॉस 16' 100% माझा भाऊच जिंकणार".
Avatar The Way Of Water Box Office Collection : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. भारतात या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हॉलिवूडच्या या सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला आहे.
Jeremy Renner: 'अॅव्हेंजर्स' (Avengers) स्टार जेरेमी रेनर (Jeremy Renner) याचा वर्षाच्या सुरुवातीला घराजवळील बर्फ हटवताना अपघात झाला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली. काही दिवसांपूर्वी त्याच्या स्पोकपर्सननं सांगितलं की, जेरेमी रेनरची प्रकृती स्थिर आहे. गेल्या काही दिवसांपासून जेरेमी रेनर हा सोशल मीडियावर त्याच्या तब्येतीबाबत चाहत्यांना माहिती देत आहे. नुकतीच त्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. "जसे कुटुंब आणि मित्रांसोबतचे प्रेम आणि बंध अधिक घट्ट होतात, तसेच ही 30 पेक्षा जास्त मोडलेली हाडे मजबूत होतील."असं या पोस्टमध्ये जेरेमी रेनरनं लिहिलं आहे.
Balasahebancha Raj Drama : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'बाळासाहेबांचा राज' (Balasahebancha Raj) हे नाटक रंगभूमीवर येत आहे. हे नाटक मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.
Bigg Boss 16 Top 5 Finalists : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. 100 दिवसांचा टप्पा पार केलेला हा कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाअंतिम सोहळा जवळ आल्याने या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
Myra Vaikul : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgath) मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या परीचा (Pari) अर्थात मायरा वैकुळचा (Myra Vaikul) आज वाढदिवस आहे. मायरा आज तिचा सहावा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते मायराला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.
Shah Rukh Khan's Reply to Fan Waiting Outside Mannat: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणारा शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा सध्या त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. काही दिवसांपूर्वी पठाण चित्रपटाचा ट्रेलर बुर्ज खलिफावर (Burj Khalifa) झळकला. सध्या शाहरुख हा सोशल मीडियाच्या माध्यमातून पठाण चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. शाहरुख ट्विटरवरील आस्क मी एनिथिंग सेशनच्या माध्यामातून चाहत्यांच्या प्रश्नांची मजेशीर पद्धतीनं उत्तरं देत आहे. काही चाहत्यांनी शाहरुखला हटके प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
पार्श्वभूमी
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
अनंत अंबानीच्या साखरपुड्यात ऐश्वर्या राय बच्चन अन् आराध्याने वेधलं सर्वांचं लक्ष
Anant Radhika Engagement : अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. पण या सगळ्यात बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि तिची लेक आराध्याने (Aaradhya Bachchan) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
Kantara 2 : ऋषभ शेट्टीने केली 'कांतारा 2' च्या तयारीला सुरुवात
Rishab Shetty Kantara 2 : दाक्षिणात्य सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) 'कांतारा' (Kantara) हा सिनेमा चांगलाच गाजला. अल्पावधीतच हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाच्या यशानंतर ऋषभने या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची म्हणजेच 'कांतारा 2'च्या (Kantara 2) तयारीला सुरुवात केली आहे.
Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेनने खरेदी केली New Mercedes Benz कार
Sushmita Sen : शनिवारी सुष्मिता सेनने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम हँडलवर (Instagram Account) नवीन पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून सुष्मिता सेनने चाहत्यांना तिच्या नवीन कारच्या खरेदीची माहिती दिली आहे. सुष्मिता सेनने तिच्या इन्स्टा पोस्टवर काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सुष्मिता तिच्या नवीन मर्सिडीज बेंझबरोबर ब्लँक कलरचा ड्रेस मॅच केला आहे. सुष्मिता सेनच्या या कारचे मॉडेल Mercedes Benz GLE Coupe Mercedes-AMG आहे. या कारची किंमत (Car Price) तब्बल 1.64 कोटी आहे. सुष्मिता सेनने स्वतःला ही अनोखी भेट दिली आहे.
Siddharth Jadhav : सिद्धार्थ जाधवने केली नव्या सिनेमाची घोषणा
Siddharth Jadhav On Three Cheers : अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या (Siddharth Jadhav) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'सर्कस' (Circus) सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'आपल्या सिद्धू'ने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.
Mission Majnu : 'मिशन मजनू'ची तुलना आलिया भट्टच्या 'Raazi'शी
Sidharth Malhotra reacts On Mission Majnu comparison with Raazi : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि रश्मिका मंदान्नाचा (Rashmika Mandanna) 'मिशन मजनू' (Mission Majnu) हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता या सिनेमाची आलिया भट्टच्या (Alia Bhatt) बहुचर्चित 'राझी' (Raazi) या सिनेमासोबत तुलना होत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -