Entertainment News Live Updates 21 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 21 Dec 2022 05:10 PM
Rapchik Kolinbai : 'रापचिक कोळीणबाई' गाण्यात अमृताची नखरेल अदा

Amruta Patki: अभिनेत्री अमृता पत्की (Amruta Patki) हिने ग्लॅमर विश्वात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. 2006 च्या ‘मिस इंडिया’ या सौंदर्य स्पर्धेपर्यंत यशस्वी ठरल्यानंतर अमृताने आंतरराष्ट्रीय पातळीवरही ‘मिस अर्थ’ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि तिथेही ‘मिस अर्थ एअर’चा किताब मिळवला होता. अमृताने 2010 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यानंतर काही मराठी चित्रपटांमध्ये ती झळकली होती. मराठी-हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेली ही गुणी अभिनेत्री आता बऱ्याच कालावधीनंतर ‘सुर्या’ या चित्रपटातून मराठी रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.  सध्या मराठी चित्रपटात बॉलीवूड तारका आयटम साँगवर थिरकताना दिसतायेत. या यादीत अमृताचाही समावेश झाला आहे. अमृता पत्की हिच्या नृत्याचा जलवा ‘सुर्या’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. 


Samantha Ruth Prabhu Health : समंथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार?

Samantha Ruth Prabhu Health : सौंदर्यवती समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून ती आजारपणामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे ती सिनेसृष्टीपासून ब्रेक घेणार असल्याचे म्हटले जात होते. आता तिच्या प्रकृतीसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 


Samantha Ruth Prabhu Health : समंथा सिनेसृष्टीतून ब्रेक घेणार? समोर आलं मोठं कारण

Namrata Shirodkar: नम्रता शिरोडकरनं सांगितलं अभिनय क्षेत्र सोडण्याचं कारण; म्हणाली, 'महेश बाबूनं...'

Namrata Shirodkar: अभिनेत्री नम्रता शिरोडकर (Namrata Shirodkar) ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध होती. नम्रतानं अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबत स्क्रिन शेअर केली. तिनं काही हिट चित्रपटांमध्ये देखील काम केलं. नम्रतानं फेब्रुवारी 2005 मध्ये दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूसोबत(Mahesh Babu) लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती रुपेरी पडद्यावर दिसली नाही. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये नम्रता शिरोडकरनं अभिनय क्षेत्र सोडण्यामगचं कारण सांगितलं. 


संपूर्ण बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Best Films Of 2022 : सर्वोत्कृष्ट 50 सिनेमांच्या यादीत राजामौलींच्या 'RRR'ने मारली बाजी

RRR Beats Top Gun Maverick : 'आरआरआर' (RRR) हा सिनेमा रिलीजझाल्यापासून चर्चेत आहे. अद्याप या सिनेमाची क्रेझ कमी झालेली नाही. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्ड करत आहे. आता हा सिनेमा ब्रिटिश फिल्म इंस्टीट्यूटमधील साइट अॅन्ड साऊंड मॅगजीनच्या या वर्षातील टॉप 50 सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.





Deepika Padukone Troll: 'रेनकोट घातलाय...'; फिफा वर्ल्ड कप 2022 ला गेलेल्या दीपिकाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Deepika Padukone Troll: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही सध्या चर्चेत आहे.  यंदा दीपिकाला  फिफा वर्ल्ड कप 2022  (fifa world cup final 2022) ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं होतं. ट्रॉफीचं अनावरण करणारी दीपिका फक्त बॉलीवूडमधीलच नव्हे तर जगातील पहिली अभिनेत्री बनली आहे. ट्रॉफीचं अनावरण करणाऱ्या दीपिकानं एक खास लूक केला होता. दीपिकाच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं. सध्या काही नेटकरी दीपिकाच्या ड्रेसला ट्रोल करत आहेत. 



Shah Rukh Khan: 'जर मी हिंदू असतो तर...'; पठाण वादादरम्यान शाहरुखचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Shah Rukh Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान(Shah Rukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चत आहे. देशभरातील अनेक लोक शाहरुखला पठाण चित्रपटामुळे ट्रोल करत आहेत. पठाण या चित्रपटातील बेशरम रंग गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं. त्यानंतर शाहरुखचा हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पठाण चित्रपटाच्या वादादरम्यान आता शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते एक व्यक्ती शाहरुखला विचारतो की, 'जर तू हिंदू असता तर ?' या प्रश्नाला शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.  



Boyz 3 : 'बॉईज 3'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर!

Boyz 3 World Television Premiere : 'बॉईज' (Boyz) या सिनेमाचा पहिला भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमाचंदेखील प्रेक्षकांनी कौतुक केलं. त्यामुळे निर्मात्यांनी या सिनेमाचा तिसरा भागदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. गेल्या काही दिवसांपूर्वी 'बॉईज 3' (Boyz 3) हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर या सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' (World Television Premiere) होणार आहे. 





Virat-Anushka : विरुष्काचा नामांकित स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडसोबत वाद

Virat Kohli - Anushka Sharma Sportswear Brand Controversy : क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता हे दोघे 'पुमा' या स्पोर्ट्स वेअर ब्रॅंडमुळे चर्चेत आहेत. 

Avatar 2 Box Office Collection : 'अवतार द वे ऑफ वॉटर'ची वाटचाल 200 कोटींच्या दिशेने

Avatar The Way Of Water Box Office Collection : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. जगभरातील सिनेप्रेमींसह भारतीय सिनेरसिकांनादेखील हा सिनेमा आवडत आहे. त्यामुळे कमाईच्या बाबतीतदेखील हा सिनेमा आघाडीवर आहे. आज किंवा उद्या हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करू शकतो. 

Gauhar Khan Pregnancy : गौहर खानच्या घरी हलणार पाळणा

Gauhar Khan Pregnancy : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री गौहर खानने (Gauhar Khan) चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ शेअर करत तिने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गौहर वयाच्या 39 व्या वर्षी आई होणार आहे. 



Shahrukh Khan : किंग खानच्या नावे आणखी एक खिताब

Shah Rukh Khan Features In Empire Magazine : 'पठाण'च्या वादात (Pathaan Controversy) बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने (Shahrukh Khan) आणखी एक किताब आपल्या नावे केला आहे. 'एंपायर मॅगजीन'ने (Empire Magazine) 50 महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकमेव भारतीय अभिनेता शाहरुख खानचं नाव आहे. 



Happy Birthday Govinda : एकावेळी 40 सिनेमे साईन करणारा 'हिरो नं. 1'

Govinda : नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेता गोविंदाचा (Govinda) आज वाढदिवस आहे. त्याचं पूर्ण नाव गोविंदा अरुण आहुजा असं आहे. पण 'गोविंदा' या नावानेच तो ओळखला जातो. अनेक गाजलेल्या सिनेमांत गोविंदाने काम केलं आहे. नृत्याची अदा, विनोदाचं अंग आणि अॅक्शनच्या जोरावर गोविंदाने हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 


Happy Birthday Govinda : एकावेळी 40 सिनेमे साईन करणारा 'हिरो नं. 1'; अभिनय आणि नृत्याने चाहत्यांना वेड लावणाऱ्या 'गोविंदा'ची वर्षाची कमाई किती?

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gadad Andhar Teaser: पाण्याखालचं विश्व दाखवणारा 'गडद अंधार'


Gadad Andhar Teaser: पाणी आणि मानवी जीवन यांचं नातं अतूट आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अवतार : द वे आॅफ वॅाटर' या हॅालिवूड चित्रपटात प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याखालचं विश्व दाखवण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाच्या या शर्यतीत मराठी चित्रपटही कुठेच मागे नसल्याचं दर्शवणारा सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' हा चित्रपट 3 फेब्रुवारी 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टिझर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला आहे. पाण्याखालचं अद्भुत आणि रहस्यमय विश्व दाखवणारा 'गडद अंधार' चा टीझर उत्सुकता वाढवणारा आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याबाबतचं कुतूहल जागं करणाऱ्या या टिझरला नेटकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असून, सिनेप्रेमींद्वारे 'गडद अंधार'चा टिझर शेअर करण्यात येत आहे.


अर्जुन कपूरच्या 'कुत्ते'चा टीझर आऊट


Kuttey Trailer Out Now : बॉलिवूडचा सुपरस्टार अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी 'कुत्ते' (Kuttey) सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. लोकप्रिय दिग्दर्शिक विशाल भारद्वाज (Vishal Bhardwaj) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. 


Bigg Boss Marathi 4 : एक घर, 100 दिवस आणि 16 स्पर्धकांचा प्रवास संपणार


Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस' (Bigg Boss) हा छोट्या पडद्यावरील वादग्रस्त कार्यक्रम चाहत्यांच्या पसंतीस उतरत असतो. पण यंदाचं बिग बॉस मराठीचं चौथं पर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यात कमी पडलं. अखेर आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लवकरच 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi 4) चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. 


Avatar 2 Box Office Collection : निळ्या विश्वाची जादू कायम


Avatar The Way Of Water Box Office Collection Day 4 : 'अवतार द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा जगभरात चांगली कमाई करत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होऊन फक्त चार दिवस झाले आहेत. रिलीजच्या चौथ्या दिवशी या सिनेमाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. 
 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.