मुंबईराज्यातील मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यापासून सर्वांना उत्सुकता लागलेल्या खातेवाटपाचा मुहूर्त अखेर अधिवेशनाची सांगता झाल्यानंतरच लागला आहे. त्यामुळे, राज्याच्या मुख्य सचिव यांनी राज्यपाल महोदयांना मंत्र्यांच्या खातेवाटपाची यादी जाहीर केली असून गृह खातं हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FAdnavis) यांच्याकडेच राहिले आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरविकास मंत्रालय, गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अपेक्षप्रमाणे वित्त व नियोजन मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसह राज्यातील 42 मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले असून बीड (Beed) जिल्ह्याला दोन मंत्री मिळाल्याने मुंडे बंधु-भगिनींच्या गळ्यातही अनेक खात्यांची माळ पडली आहे. 


मुंडे बंधु-भगिनींना कोणतं खातं


बीड जिल्हा सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यात चर्चेत आहे. त्यातच, आज मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले असून भाजप नेत्या पंकजा मुंडे व राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनाही खातेवाटप जाहीर झाले आहे. त्यानुसार, पंकजा मुंडेंना पर्यावरण व हवामान बदल आणि पशुसंवर्धन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, धनंजय मुंडेंना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गत महायुती सरकारमध्ये हे खाते राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ यांच्याकडे होते. आता, धनंजय मुंडेना ते खातं देण्यात आलं आहे. 


राज्यातील संपूर्ण खातेवाटपाची यादी



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व जनसंपर्क आणि खातेवाटप न झालेले सर्वच खाते 


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)


उपमुख्यमंत्री अजित पवार - अर्थ व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क


मंत्रिमंडळ


कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
2.राधाकृष्ण विखे पाटील - जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3.हसन मुश्रीफ -  वैद्यकीय शिक्षण
4.चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5.गिरीश महाजन - आपत्ती व्यवस्थापन, जलसंपदा  (विदर्भ, तापी, कोकण विकास)
6.गुलाबराव पाटील - पाणीपुरवठा व स्वच्छता 
7.गणेश नाईक -  वन
8.दादाजी भुसे - शालेय शिक्षण
9.संजय राठोड - मृदा व जलसंधारण 
10.धनंजय मुंडे  - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11.मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12.उदय सामंत - उद्योग व मराठी भाषा
13.जयकुमार रावल - विपणन, राजशिष्टाचार 
14.पंकजा मुंडे - पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन 
15.अतुल सावे - ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, अक्षय ऊर्जा 
16.अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
17.शंभूराज देसाई - पर्यटन, खाण व माजी सैनिक कल्याण मंत्रालय
18.आशिष शेलार - माहिती व तंत्रज्ञान 
19.दत्तात्रय भरणे - क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20.अदिती तटकरे - महिला व बालविकास 
21.शिवेंद्रराजे भोसले -  सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
22.माणिकराव कोकाटे - कृषी 
23.जयकुमार गोरे - ग्रामविकास, पंचायत राज
24.नरहरी झिरवाळ - अन्न व औषध प्रशासन
25.संजय सावकारे - टेक्स्टाईल 
26.संजय शिरसाट - सामाजिक न्याय 
27.प्रताप सरनाईक - वाहतूक 
28.भरत गोगावले - रोजगार हमी,फलोत्पादन, मिठागरे विकास 
29.मकरंद पाटील - मदत व पुनर्वसन
30.नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे 
31.आकाश फुंडकर - कामगार 
32.बाबासाहेब पाटील - सहकार 
33.प्रकाश आबिटकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण 


राज्यमंत्री  (State Ministers )



34. माधुरी मिसाळ - सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण 
35. आशिष जयस्वाल - अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय 
36. मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा 
37. इंद्रनील नाईक - उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन 
38. योगेश कदम  - गृहराज्य शहर
39. पंकज भोयर - गृहनिर्माण,गृहराज्य ग्रामीण


हेही वाचा


खातेवाटप जाहीर... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे कुठली खाती? मंत्र्यांच्या खात्यांची संपूर्ण यादी