Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारमध्ये महायुती सरकारमध्ये खातेवाटप झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडेच गृह खातं ठेवलं आहे. महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आली आहे. मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सहाव्या दिवशी महाराष्ट्रात मंत्रिमंडळामधील खातेवाटप अखेर झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचे गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि उत्पादन शुल्क खाते देण्यात आले आहे.
- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
- अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
भाजपकडे असणारी खाती
- देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, लाॅ ॲंड ज्युडीशिअरी
- चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
- राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
- चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
- गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
- गणेश नाईक - वनमंत्री
- मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
- जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
- पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, ॲनिमल हसबंडरी
- अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि रिन्युएबल एनर्जी
- मेघना बोर्डीकर - सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
- माधुरी मिसाळ - शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय
- आकाश फुंडकर - कामगार
- जयकुमार गोरे - ग्रामविकास आणि पंचायती राज
- शिवेंद्रराजे भोसले - सार्वजनिक उपक्रम
- आशिष शेलार - माहिती तंत्रज्ञान
- नितेश राणे -
- नितेश राणे - मत्स्य आणि बंदरे
- अशोक उईके - आदिवासी विकास मंत्रालय
15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 23 व्या दिवशी 15 डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. फडणवीस सरकारमध्ये 33 कॅबिनेट आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांसह ही संख्या 42 झाली आहे. मंत्रिमंडळात एकूण 43 मंत्री शपथ घेऊ शकतात. एक जागा रिक्त ठेवण्यात आली आहे. फडणवीस सरकारमध्ये भाजपच्या 19, शिवसेनेच्या 11 आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील 9 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. शिंदे सरकारमधील 12 मंत्र्यांना त्यात स्थान मिळाले नाही. यामध्ये भाजपचे 4, शिवसेनेचे 3, राष्ट्रवादीचे 5 आहेत. 19 नवीन मंत्री झाले. यामध्ये भाजपचे 9, शिवसेनेचे 8 आणि राष्ट्रवादीचे 4 उमेदवार आहेत. याशिवाय 4 महिला (3 भाजप, 1 राष्ट्रवादी) आणि 1 मुस्लिम (राष्ट्रवादी) यांना सरकारमध्ये स्थान मिळाले आहे. सर्वात तरुण मंत्री राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे (36) आहेत, तर सर्वात वयस्कर मंत्री भाजपचे गणेश नाईक (74) आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या