Entertainment News Live Updates 19 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 19 Apr 2023 04:11 PM
Madhurani Prabhulkar: 'आपल्या माणसांची काळजी...'; आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.



Allu Ramesh Passed Away: अभिनेते अल्लू रमेश यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Allu Ramesh Passed Away: तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अल्लू रमेश (Allu Ramesh) यांचे  हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या 52 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.अल्लू रमेश यांच्या निधनानं तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या निधनानंतर सर्व सेलिब्रिटी आणि त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. तेलुगू चित्रपट निर्माते आनंद रवी (Anand Ravi) यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला.


Dancing On The Grave Trailer: 'तो माणूस नसून प्राणी आहे!'; 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Dancing On The Grave Trailer:   ओटीटी   प्लेटफॉर्मवरील (OTT Platform)  विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज (Web Series) आणि चित्रपटांना (Movie) प्रेक्षकांची पसंती मिळते. वेब सीरिज आणि चित्रपट प्रेक्षक वीकेंडला घरबसल्या ओटीटीवर पाहू शकतात.  नवीन चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीझ होण्याची प्रेक्षक वाट बघत असतात. आता लवकरच   डान्सिंग ऑन द ग्रेव्ह (Dancing On The Grave) ही डॉक्युमेंट्री सीरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सीरिजचं पोस्टर  रिलीज करण्यात आले होते, त्यानंतर सोशल मीडियावर या डॉक्युमेंट्री सीरीजबाबत चर्चा सुरु झाली. आता या सीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सीरिजची कथा म्हैसूर राजघराण्यातील माजी दिवाण यांची नात शकीरा खलीलीच्या हत्येवर आधारित आहे.



Lets dance Chotu Motu Song: 'यो यो हनी सिंह' चा स्वॅग, सलमान खानचा जबरदस्त डान्स; 'किसी का भाई किसी की जान' मधील 'छोटू मोटू' गाणं पाहिलंत?

Lets dance Chotu Motu Song: अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. सलमानचा 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील 'नय्यो लगदा' आणि  'बिल्ली बिल्ली' ही दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता या चित्रपटातील  'लेट्स डांस छोटू मोटू' (Lets dance Chotu Motu) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.या  गाण्यात गायक आणि रॅपर यो यो हनी सिंहचा (Yo Yo Honey Singh) हटके अंदाज बघायला मिळत आहे. तर या गाण्याचा काही भाग सलमान खाननं देखील गायला आहे.


पाहा गाणं :

Priyanka Chopra: प्रियांका चोप्रा अॅक्शन मोडमध्ये; म्हणाली, 'सिटाडेलमधील स्टंट मी स्वत: केले...'

Priyanka Chopra:  बॉलिवूडची देसी गर्ल अशी ओळख असणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)  ही सध्या तिच्या  'सिटाडेल' (Citadel)  या आगामी सीरिजचे प्रमोशन करत आहे. प्रियांका तिच्या हॉलिवूड प्रोजक्ट्समुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सिटाडेल सीरिजमध्ये प्रियांका चोप्रा खतरनाक स्टंट सीन्स करताना दिसणार आहे, ज्याची झलक या सीरिजच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली आहे. आता प्रियांका चोप्राने सांगितले की, सीरिजमधील अनेक स्टंट तिने स्वतः केले आहेत.



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Hemangi Kavi : हेमांगी कवीच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष; म्हणाली, 'आई-बाबांची प्रायव्हसी पाहिली आहे.'



Hemangi Kavi : मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट शेअर करत असते.  हेमांगीच्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेकांचे लक्ष वेधतात. हेमांगी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं सोशल मीडियावर बिनधास्तपणे मांडत असते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हेमांगीनं तिचे बालपण आणि तिचे आई-बाबा या विषयांवर चर्चा केली.


Sundara Manamadhe Bharli: 'अनेकवेळा सीरिअलमधील हिरोईनकडे...'; सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील भूमिकेबद्दल भरभरुन बोलली अक्षया



Sundara Manamadhe Bharliसुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)  या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक  (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. अक्षया आणि समीर यांच्या मालिकेमधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. अक्षया नाईक ही या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका साकारते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यातील  'स्फूर्तीदायक व्यक्तीरेखा स्त्री' या कॅटेगिरीमधील  अक्षयाला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अक्षयानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.


Ileana D’Cruz Pregnant: लग्नाआधीच इलियाना होणार आई, खास पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज; नेटकरी म्हणाले, 'बाळाचे वडील कोण?'



Ileana D’Cruz Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इलियाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इलियानानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.


Ileana D’Cruz Pregnant: लग्नाआधीच इलियाना होणार आई, खास पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज; नेटकरी म्हणाले, 'बाळाचे वडील कोण?'



Ileana D’Cruz Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझने (Ileana D’Cruz) अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. इलियाना ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. इलियाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इलियानानं नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या पोस्टच्या माध्यमातून तिनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.





- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.