Entertainment News Live Updates 18 September : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Sep 2022 11:35 PM
Nishi Singh Passed Away : अभिनेत्री निशी सिंह यांचे निधन

Nishi Singh Passed Away : मनोरंजनसृष्टीतून एक वाईट बातमी समोर आली आहे. 'कुबूल है', 'तेनाली राज', 'इश्कबाज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री निशी सिंह (Nishi Singh) यांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निशी सिंह आजारी होत्या. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडीसला दिल्ली पोलिसांकडून पुन्हा समन्स

Jacqueline Fernandez Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) गेल्या अनेक दिवसांपासून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत आहे. आता ईडीकडून जॅकलीनला पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं आहे. 19 सप्टेंबरला (उद्या) जॅकलीनला हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. 

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर

Marathi Serial : 'रंग माझा वेगळा' टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे.

Prajakt Deshmukh : 'वाट दिसु दे गा'; असं म्हणत लेखक प्राजक्त देशमुख यांनी व्यक्त केला संताप

Prajakt Deshmukh : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुखला (Prajakt Deshmukh) अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'संगीत देवबाभळी' या नाटकाच्या 350 प्रयोगानिमित्त प्राजक्त नाशिकहून मुंबईत येत असताना खड्ड्यांमुळे त्याला प्रचंड मनस्ताप झाला आहे. ट्वीट करत त्याने यासंदर्भात माहिती दिली आहे. 



यो यो हनी सिंह करणार जोरदार कमबॅक

रॅपर यो यो हनी सिंह गेल्या बऱ्याच दिवसांपासून आपल्या खाजगी कारणांमुळे मीडियापासून दूर आहे.अनेकांनी हनी सिंहची कारकीर्द संपुष्टात आल्याचं म्हटलं आहे. अशा परिस्थितीत आपल्या टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी हनी सिंह पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करणार आहे.पंजाबी गायक हनी सिंहने हनी 3.0 अल्बमची घोषणा करत आपल्या चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं आहे. लवकरच या अल्बमची गाणीही रिलीज होणार आहेत.

Asha Bhosle : आशा भोसलेंचे जगभरात रेस्टॉरंट

आशा भोसलेंचे जगभरात रेस्टॉरंट आहेत. दुबई आणि कुवेतमध्ये असलेल्या रेस्टॉरंटचे नाव 'आशाज' असं आहे. दुबई आणि कुवेतसह त्यांचे आबुधाबी, दोहा, बहरीनमध्येदेखील रेस्टॉरंट आहेत. आशा भोसलेंच्या रेस्टॉरंटमध्ये भारतीय पदार्थ मिळतात. अनेकदा आशा भोसले स्वतः शेफना ट्रेनिंग देतात.


 


 


 

आशा भोसले लाडक्या नाती सोबत घेतायत जपानी भोजनाचा आनंद

आशा भोसले लाडक्या नाती सोबत जपानी भोजनाचा आनंद घेताना दिसून येत आहेत.



Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत नवा ट्विस्ट; नेहाचा पॅलेसवर पुन्हा धुमधडाक्यात होणार गृहप्रवेश

Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नेहा आणि यशमध्ये दुरावा आला होता. पण आता मालिकेच्या आगामी भागात नेहाचा पॅलेसवर पुन्हा एकदा धुमधडाक्यात प्रवेश होताना पाहायला मिळणार आहे. 





जेठालालच्या अनुपस्थितीमुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे चाहते नाराज

नव्या तारक मेहताच्या एन्ट्रीने प्रेक्षक नाराज झाले आहेत. गेली 14 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. मात्र, आता एक एक कलाकार मालिका सोडत असल्याने प्रेक्षक नाराज झाले आहेत. ‘दया’, ‘टप्पू’, ‘तारक मेहता’, ‘बावरी’नंतर आता ‘जेठालाल’ देखील मालिकेतून सतत गायब होताना दिसत आहे. त्यामुळे आता ‘जेठालाल’ साकारणारे अभिनेते दिलीप जोशी देखील मालिकेला अलविदा म्हणणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.


 





‘ब्रह्मास्त्र’मधील शाहरुख खानचा बॉडी डबल सोशल मीडियावर चर्चेत, हॉलिवूडमध्येही झळकलाय चेहरा!

सध्या शाहरुख खानचा बॉडी डबल हसित सवानीचा (Hasit Savani) फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बॉडी डबल हसित सवानीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान आणि हसित सवानी एकाच कपड्यात आणि एकाच लूकमध्ये दिसत आहेत. हा फोटो शेअर करत हसित सवानीने इन्स्टा कॅप्शनमध्ये लिहिले की, 'ब्रह्मास्त्र'मधील दिग्गज शाहरुख खानच्या कॅमिओसाठी त्याचा स्टंट डबल म्हणून करताना खूप मजा आली.'





‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंडला विवेक अग्निहोत्रींचा पाठिंबा, म्हणाले ‘आता याचा परिणाम...’

बॉयकॉट ट्रेंडवर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, हा एक चांगला ट्रेंड आहे. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या एका मुलाखतीत म्हटले की, हा मुद्दा अवघड आहे पण बॉयकॉट बॉलिवूड हा चांगला ट्रेंड आहे. यातून प्रेक्षक आपली नाराजी व्यक्त असून, प्रेक्षकांना नेमकं काय हवंय हे कळत आहे.


वाचा संपूर्ण बातमी

वीकेंडला पुन्हा एकदा दिसली ‘ब्रह्मास्त्र’ची धूम! बॉक्स ऑफिसवर जमवला मोठा गल्ला!

शनिवारी अर्थात रिलीजच्या नवव्या दिवशी चित्रपटाने एकूण 15 कोटींची कमाई केली आहे. या आकड्यानंतर चित्रपटाची आतापर्यंतची एकूण कमाई 191 कोटींवर गेली आहे. नवव्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने 14 कोटींची कमाई केली आहे, तर इतर भाषांमध्ये डब केलेल्या व्हर्जनने सुमारे 1 कोटींची कमाई केली आहे.


 





प्रभास-क्रिती एकमेकांना डेट करतायत? ‘आदिपुरुष’च्या जोडीची जोरदार चर्चा...

साऊथचा सुपरस्टार प्रभास (Prabhas) त्याच्या प्रोफेशनल लाईफसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. प्रभाससोबत सतत एखाद्या अभिनेत्रीचे नाव जोडले जात असते. मात्र, सध्या चर्चा रंगलीये ती क्रिती (Kriti Sanon) आणि प्रभासच्या जोडीची.. सध्या क्रिती सेनन आणि प्रभासचे नाव एकत्र जोडले जात आहेत.


 





प्रार्थना बेहेरेच्या साडी लूकवर भाळले चाहते!

मराठी मालिका आणि चित्रपटविश्व गाजवणारी अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे आपल्या निखळ सौंदर्याने आणि दिलखुलास हास्याने लाखो मराठी रसिकांच्या हृदयावर राज्य करते. आपल्या दमदार अभिनयानं ती चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते.


 





‘ओशन इलेव्हन’ फेम हॉलिवूड स्टार हेन्री सिल्वा यांचे निधन, 95व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘ओशन्स इलेव्हन’ (Oceans eleven) आणि ‘द मंचुरियन कँडीडेट’ (The Manchurian Candidate)  यासह अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते हेन्री सिल्वा (Henry Silva) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी ते 95 वर्षांचे होते. हॉलिवूड चित्रपटांमध्ये हेन्री यांनी नेहमीच गँगस्टर आणि खलनायकाची प्रत्येक पात्रे खूप छान वठवली.


वाचा संपूर्ण बातमी

अक्षय कुमार-सलमान खानच्या इशाऱ्यानंतरही जॅकलिन ऐकलीच नाही!

जॅकलिनच्या कोस्टार्सनी तिला सुकेशपासून लांब राहण्याचा सल्ला दिला होता. परंतु, तरीही ती सुकेशला भेटत राहिली आणि त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू घेत राहिली. जॅकलिनने अक्षय आणि सलमानला सांगितले की, तिला 'उद्योगपती आणि नेता' असणाऱ्या सुकेशसोबत लग्न करायचे आहे.


 





Happy Birthday Shabana Azmi : एक-दोन नव्हे तब्बल पाचवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारी अभिनेत्री!

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा आज (18 जानेवारी) वाढदिवस आहे. त्या आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहे. पाच वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शबाना आझमी यांनी 70 च्या दशकात आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर 80 आणि 90 च्या दशकात अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


‘ऑस्कर’ विजेत्या विल स्मिथवर ‘या’ कार्यक्रमाने घातली बंदी!


हॉलिवूड अभिनेता विल स्मिथ याने अभिनेता ख्रिस रॉक याला मारलेली थप्पड आता त्यालाच महागात पडत आहे. ‘ऑस्कर’ सोहळ्यात घडलेल्या या प्रकाराला आता अनेक महिने उमटले असले, तरी या प्रकरणाचे पडसाद आजही उमटताना पाहायला मिळतायत. याच प्रकरणामुळे एका कार्यक्रमातून अभिनेता विल स्मिथची हकालपट्टी करण्यात आली आहे. ‘SNL’ने विल स्मिथवर कायम स्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.


'ती मी नव्हेच' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला


'ती मी नव्हेच' या सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदे, उर्मिला मातोंडकर आणि निनाद कामत महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. 'ती मी नव्हेच' या सिनेमानं आता सिनेसरिकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.


किच्चा सुदीपच्या 'कब्जा'चा ट्रेलर आऊट


दाक्षिणात्य सुपरस्टार किच्चा सुदीपच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या किच्चा सुदीप त्याच्या आगामी 'कब्जा' सिनेमामुळे चर्चेत आला आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. या सिनेमात किच्चा सुदीपसह उपेंद्रदेखील मुख्य भूमिकेत आहे.


चंद्रपूरमध्ये 'झाडीपट्टी' नाट्य संमेलनाला सुरुवात


चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात आजपासून चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन सुरू झाले आहे. विदर्भातील चार जिल्ह्यातल्या झाडीपट्टी नाट्यकलेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी झाडीपट्टी नाट्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा प्रसिद्ध झाडीपट्टी कलाकार अनिरुद्ध वनकर संमेलनाध्यक्ष आहेत.


'नेने वस्थुन्ना'मध्ये धनुष दिसणार दुहेरी भूमिकेत


दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष सध्या त्याच्या आगामी 'नेने वस्थुन्ना' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. सेल्वाराघवनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात धनुष दुहेरी भूमिकेत दिसून येणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.