Entertainment News Live Updates 18 May : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 18 May 2023 04:28 PM
Tuzech Mi Geet Gaat Aahe: गुंडांनी पुन्हा मंजुळाला पकडून नेलं; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो व्हायरल

Tuzech Mi Geet Gaat Aahe:  तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  या मालिकेत मोठा ट्वीस्ट येणार आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, गुंडांनी मंजुळाला पुन्हा पकडून नेलं आहे. आता मंजुळाची गुंडांपासून सुटका होईल की नाही? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे.



सलमान खानच्या बहिणीच्या घरी चोरी; घरातील नोकराला पोलिसांनी केली अटक

Arpita Khan Sharma: बॉलिवूड अभिनेता सलमान खानची (Salman Khan) बहीण अर्पिता खान शर्मा (Arpita Khan Sharma) हिच्या खार (Khar) येथील घरात चोरी झाल्याचे नुकतेच उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर खार पोलीसांनी आरोपी संदीप हेगडेला अटक करून त्यानं चोरी केलेले हिऱ्याचे झुमके जप्त केले आहे. ज्याची किंमत 5 लाख रुपये असल्याचे बोलले जात आहे. संदीप हेगडे हा विलेपार्ले पूर्व आंबेवाडी झोपडपट्टीतील रहिवासी आहे. 



Parineeti Chopra Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यातील खास क्षण; शेअर केले फोटो

Parineeti Chopra Raghav Chadha : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते राघव चढ्ढा (Raghav Chadha) आणि  बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) यांचा साखरपुडा काही दिवसांपूर्वी धुमधडाक्यात पार पडला.  या दोघांच्या साखरपुड्याला काही नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.  परिणीती आणि राघव यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमावेळी अरदास म्हणजेच प्रार्थना देखील करण्यात आली होती. या खास क्षणाचे फोटो परिणीती आणि राघव यांनी शेअर केले आहेत. 



Mrs Asia GB: कौतुकास्पद! मराठमोळी सोनल काळे ठरली Mrs Asia GB सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट

Mrs Asia GB : अनेक भारतीय वंशाचे लोक परदेशात जाऊन विविध क्षेत्रात काम करत असतात. अशीच एक भारतीय वंशाची महिला Mrs Asia GB या  सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट ठरली आहे.  सोनल काळे (Sonal Kale) ही लंडनमध्ये (London) स्थायिक झालेली भारतीय वंशाची महिला आहे. ती  Mrs Asia GB या  सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या सीझनची फायनलिस्ट ठरली आहे. ही सौंदर्य स्पर्धा aglp एंटरप्राइजेसद्वारे आयोजित केली गेली आहे.  





Anushka Sharma: हेल्मेट न घालता बाईक चालवणं अनुष्का शर्माच्या बॉडीगार्डला पडलं महागात; भरावा लागला दंड

Anushka Sharma: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्माचा (Anushka Sharma)  एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती तिचा बॉडीगार्ड सोनूसोबत मुंबईच्या रस्त्यावर बाईकवर प्रवास करताना दिसली होती. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, अनुष्का आणि तिच्या बॉडीगार्डने हेल्मेट घातला नव्हता. त्यामुळे आता अनुष्काच्या बॉडीगार्डला दंड भरावा लागला आहे. 




Satyaprem Ki Katha Teaser: कियारा आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज; ‘सत्यप्रेम की कथा’ चा टीझर रिलीज

Satyaprem Ki Katha Teaser: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. कियारा आणि कार्तिक यांच्या  ‘सत्यप्रेम की कथा’  (Satyaprem Ki Kath) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे. 



AI Photos Of Actresses In Old Age: बॉलिवूड अभिनेत्री म्हाताऱ्या झाल्यानंतर कशा दिसतील? AI ने बनवलेले फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले...

AI Photos Of Actresses In Old Age: साहिद नावाचा AI (Artifical Intelligence) एंथुजियास्ट हा सोशल मीडियावर विविध फोटो शेअर करत असतो. ते फोटो AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करुन तयार केलेले असतात. नुकतेच साहिदनं दीपिका पादुकोण (Deepika Padukone), कृती सेनन (Kriti Sanon), ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra), कतरिना कैफ (Katrina Kaif), अनुष्का शर्मा (Anushka Sharma), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचे काही AI जनरेटेड फोटो शेअर केले आहेत. या बॉलिवूड अभिनेत्री म्हाताऱ्या झाल्यानंतर कशा दिसतील? याचा अंदाज हे फोटो पाहून लावला जाऊ शकतो. 



पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Gautami Patil : "लग्नाला यायचं हं! पत्रिकाही देईन"; गौतमीने चाहत्यांना दिलं लग्नाचं आमंत्रण



Gautami Patil On Wedding : नृत्यांगणा गौतमी पाटीलने (Gautami Patil) महाराष्ट्रभर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रभर गौतमीचा मोठा चाहतावर्ग असून तिच्या लावणी कार्यक्रमाला चाहते मोठी गर्दी करत असतात. दिवसेंदिवस तिच्या चाहतावर्गामध्ये वाढ होत आहे. अशातच आता एबीबी माझाला दिलेल्या मुलाखतीत गौतमीने लग्न कधी करणार याबद्दल मौन सोडलं आहे. 


वाचा सविस्तर


Shah Rukh Khan : अरे रे...! 'Don 3'मधून शाहरुख खानची एक्झिट



Shah Rukh Khan says no to Don 3 : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून किंग खानच्या चाहत्यांना त्याच्या आगामी सिनेमांची प्रतीक्षा आहे. फरहान अख्तरच्या (Farhan Akhtar) 'डॉन 3' (Don 3) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा झाली. या सिनेमात शाहरुख खान मुख्य भूमिकेत असणार असे म्हटले जात होते. पण आता शाहरुखने या सिनेमातून एक्झिट घेतल्याची माहिती समोर आली आहे. 


The Kerala Story : 'द केरळ स्टोरी'ची रेकॉर्डब्रेक कमाई; 12 दिवसांत 150 कोटींच्या कल्बमध्ये सामील!



The Keral Story Box Office Collection Day 12 : 'द केरळ स्टोरी' (The Keral Story) या सिनेमाला रिलीजआधी आणि रिलीजनंतर अनेक वादांचा सामना करावा लागला आहे. काही राज्यांत या सिनेमावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाला भरभरुन प्रेम मिळाले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात या सिनेमाला यश आले. 


Aai Kuthe Kay Karte : वीणा अरुंधतीला म्हणाली,"तू तीन मुलांची आई, अनिरुद्धसोबत 25 वर्षांचा संसार..."



Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस यावी साठी निर्माते सतत नव-नवे ट्वीस्ट आणत आहेत. आता या मालिकेच्या आगामी भागात वीणा अरुंधतीला तिच्या लव्हस्टोरीबद्दल विचारताना दिसणार आहे. 





 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.