Entertainment News Live Updates 17 October: टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 17 Oct 2022 02:58 PM
Drishyam 2 Trailer : Ajay Devgan च्या 'दृश्यम 2'चा ट्रेलर रिलीज

Drishyam 2 : अजय देवगनच्या बहुचर्चित 'दृश्यम 2' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सोशल मीडियावर 'दृश्यम 2' च्या ट्रेलरची चर्चा आहे. हा सिनेमा 18 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात पार पडणार 'फटा पोश्टर निकाला झिरो' नॉमिनेशन कार्य

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल निखिल राजेशिर्केला बाहेर जावे  लागले. आज घरामध्ये  'फटा पोश्टर निकाला झिरो' हे नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. 





Ekdam Kadak : तरुणाईला भुरळ पाडायला 'एकदम कडक' सज्ज

Ekdam Kadak : 'एकदम कडक' (Ekdam Kadak) हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर आऊट झाले आहे. रोमँटिक आणि आशयघन अशा धाटणीचा 'एकदम कडक' हा सिनेमा 2 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Kantara Movie Review : मानव-निसर्गाच्या संघर्षावर गुंफलेला 'कांतारा'

Kantara Movie Review : तुम्हाला शापित 'हस्तर' आठवतोय? हो तोच 'हस्तर' (Hastar) ज्याच्या शरीरातून सोनं पडायचं. बरोबर चार वर्षांपूर्वी 12 ऑक्टोबरला दिग्दर्शक राही बर्वेचा थरकाप उडवणारा 'तुंबाड' (Tumbbad) हा सिनेमा ज्याला 'काल्पनिक भयपट' म्हणावं की 'साहसपट' हे लेखक नारायण धारपांच्या चाहत्यांवर सोडून देऊ. मात्र असा चित्रपट जो आजही लक्षात राहिला आहे. आता तुम्ही म्हणाल की 'तुंबाड' आजच का आठवला? याचं कारण कन्नड भाषेतील सिनेमा 'कांतारा' (Kantara) आहे.


Kantara Movie Review : मानव-निसर्गाच्या संघर्षावर गुंफलेला 'कांतारा'

Vaishali Thakkar : लग्नाआधीच वैशाली ठक्करने संपवलं जीवन

Vaishali Thakkar Suicide : मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री वैशाली ठक्करने (Vaishali Thakkar) आत्महत्या केल्याने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला. तपासादरम्यान पोलिसांना वैशालीच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. आधीच्या बॉयफ्रेडकडून छळ होत असल्याने तिने सुसाईड केल्याचं समोर आलं आहे. 

Alia Bhatt : आलिया भट्टने घेतला मॅटरनिटी लीव्हवर जाण्याचा निर्णय

Alia Bhatt Pregnancy Update : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) लवकरच आई होणार आहे. आलिया आणि रणबीर 14 एप्रिलला लग्नबंधनात अडकले आहेत. तर जूनमध्ये आलियाने चाहत्यांना गोड बातमी दिली. गेल्या काही दिवसांपासून आलिया आगामी सिनेमांच्या शूटिंग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच आलियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. बाळाच्या जन्मानंतर आलिया एक मोठा ब्रेक घेणार आहे. 





Bigg Boss 16 : कॅप्टनसी टास्कदम्यान Shiv Thakare आणि Nimrit Kaur मध्ये जोरदार भांडण

Bigg Boss 16 New Promo : 'बिग बॉस 16' हा कार्यक्रम दोन आठवड्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. घरातील सदस्यांच्या नाट्यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. 'बिग बॉस 16'च्या आगामी भागात शिव ठाकरे (Shiv Thakare) आणि निमरित कौरमध्ये (Nimrit Kaur) भांडण झालेलं दिसणार आहे. 





Fu Baai Fu : जिथे असाल तिथे हसाल! 'फु बाई फू' होणार सुरू

Fu Baai Fu : गेल्या काही दिवसांत वेगवेगळा आशय असलेले मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'फू बाई फू' (Fu Baai Fu) हा लोकप्रिय कार्यक्रम गेल्या काही दिवासांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.  या कार्यक्रमाचे तब्बल 14 भाग प्रदर्शित झाले आहेत. आता नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा 'फू बाई फू' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 





Sa Re Ga Ma Pa L'il Champs : रिक्षा चालकाच्या मुलीच्या गाण्याने प्रेक्षकांना केलं थक्क

Sa Re Ga Ma Pa L'il Champs : 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' (Sa Re Ga Ma Pa L'il Champs) हा लोकप्रिय कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या पर्वातील मराठमोळ्या मुलीने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमातील एका मराठमोळ्या मुलीच्या भन्नाट परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केलं आहे. ज्ञानेश्वरी घाडगे (Dnyaneshwari Ghadge) असे या मुलीचे नाव आहे. 12 वर्षीय ज्ञानेश्वरीच्या गाण्याने सर्वच अवाक झाले आहेत.


Happy Birthday Smita Patil : वयाच्या 19 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण ते 22 व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार

स्मिता पाटील यांचा जन्म 17 ऑक्टोबर 1955 रोजी पुण्यात झाला. तर वयाच्या 31 व्या वर्षी आजारपणामुळे त्यांचे निधन झाले. 'राजा शिवछत्रपती' या सिनेमाच्या माध्यमातून 1974 साली वयाच्या 19 व्या वर्षी स्मिता पाटील यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. हा सिनेमा हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्या 'चल', 'सामना', 'निशांत', 'मंथन' अशा सिनेमांत दिसून आल्या. 

House of the Dragon : 'हाऊस ऑफ द ड्रॅगन'ची प्रतीक्षा संपली

House of the Dragon Episode 9 : 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'मध्ये (House of the Dragon) 'गेम ऑफ थ्रोन्स' कथेच्या 200 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगण्यात आली आहे. ही सीरिज यूएस आणि युरोपच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. गेम ऑफ थ्रोन्स प्रमाणे 'हाऊस ऑफ द ड्रॅगन्स'चा एकावेळी एक भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता या मालिकेतला नऊवा भाग प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. 





Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'च्या घरामधून निखिल राजेशिर्के बाहेर!

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी 4' (Bigg Boss Marathi 4) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेल्या काही दिवसांपासून हा कार्यक्रम स्पर्धकांमुळे तसेच त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. आता दोन आठवड्याच्या प्रवासानंतर 'बिग बॉस'च्या घरातून कोणता सदस्य बाहेर पडेल याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वातलं पहिलं एलिमिनेशन पार पडलं असून निखिल राजेशिर्केला (Nikhil Rajeshirke) घराबाहेर जावं लागलं आहे. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अभिनेत्री मनवा नाईकसोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला बेड्या


Manva Naik News: चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मनवा नाईक (Manva Naik) सोबत गैरवर्तन करणाऱ्या कॅब चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.  बीकेसी पोलीस ठाण्यात (BKC Police Station) आरोपी विरोधात गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 24 वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली असून त्याचे नाव मोहम्मद मुराद आझम अली असून तो अँटॉपहिल येथील रहिवासी आहे.


आयुष्मान खुरानाच्या ‘डॉक्टर जी’ला मिळतेय चाहत्यांची पसंती!


बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा (Ayushmann Khurrana) 'डॉक्टर जी' (Doctor G) हा चित्रपट शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. आयुष्मानचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 3.65 कोटींचे नेट कलेक्शन केले होते. पहिल्या दिवशी चांगली कमाई केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी अंदाजे 5.25 कोटी (Doctor G Collection)  रुपयांचा व्यवसाय केला आहे. चित्रपटाच्या नेट कलेक्शनमध्ये जवळपास 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


सर्वसामान्य माणसाचं कंबरडं मोडलयं...आणि तुम्ही...; पोस्ट शेअर करत केदार शिंदेंची नाराजी


राज्याला परतीच्या पावसाने झोडपलं आहे. राज्यभरात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. तसेच पुढील काही दिवस मुंबईसह राज्यभर मुसळधार पाऊस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या सगळ्या परिस्थितीवर भाष्य करणारी केदार शिंदे (Kedar Shinde) यांची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. 


पार पडलं ‘बिग बॉस 16’चं पहिलं एलिमिनेशन; अभिनेत्री श्रीजिता डे बिग बॉसच्या घराबाहेर!


टीव्ही विश्वातील सर्वात वादग्रस्त रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) सुरुवातीपासूनच खूप चर्चेत आहे. शोच्या नव्या सीझनमध्ये प्रेक्षकांना सुरुवातीपासूनच नवे धमाके पाहायला मिळत आहेत. यातच शनिवारी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये पुन्हा एकदा मनोरंजनाचा डबल डोस पाहायला मिळाला. एकीकडे सलमान खानने शालीन भानोतची जोरदार शाळा घेतली, तर दुसरीकडे या सीझनमधून घरातून बाहेर पडलेल्या पहिल्या सदस्याचे नावही जाहीर करण्यात आले. स्पर्धक-अभिनेत्री श्रीजिता (Sreejita De) ‘बिग बॉस 16’च्या घरातून बाहेर गेली आहे.


'मिर्झापूर' फेम जितेंद्र शास्त्री यांचे निधन; कलाकारमंडळी भावूक


'मिर्झापूर' फेम अभिनेते जितेंद्र शास्त्री (Jitendra Shastri) यांचे निधन झाले आहे. जितेंद्र यांनी अनेक सिनेमांसह अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या 'मिर्झापूर' (Mirzapur) या वेबसीरिजमध्येदेखील काम केलं आहे. जितेंद्र यांच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली आहे. तसेच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.