(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bigg Boss Marathi 4: अमृता आणि तेजस्विनीमध्ये उडाले खटके; बिग बॉसच्या आगामी एपिसोडमध्ये काय होणार?
नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली.
Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस मराठी'चा(Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये BFF असणाऱ्या अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि तेजस्विनीमध्ये (tejasvini lonkar) वादाची पहिली ठिणगी पडणार आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे कि, अमृता तेजस्विनीवर जेवणाच्या मुद्द्यावरून भडकली. याच वरून दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. तेजस्विनी तू आता काय करते आहेस ? त्यावर तेजस्विनी म्हणाली, 'ही पध्दत नव्हे' त्यावर अमृताचा पारा चढला. " हो हीच पद्धत आहे आता" असे अमृताने तेजस्विनीला ठणकावून सांगितले. तेजस्विनीचे म्हणणे आहे, "अरे रा वीची भाषा नको करुस, हाय वे माय वे मला नाही चालतं." अमृता स्वतःशी बोलताना म्हणाली, "सगळ्यांचीच मनधरणी करायला आली आहे मी." घरामध्ये झाल्या प्रकारामुळे अमृताला अश्रू अनावर झाले. बघूया आजच्या भागामध्ये या दोघींमधील भांडणं मिटेल की अजूनच वाढेल?
पाहा प्रोमो
View this post on Instagram
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अपूर्वा, रुचिरा आणि समृद्धीमध्ये रंगणार आहे चर्चा. ज्यामध्ये अपूर्वा रुचिरासमोर आपला मुद्दा मांडताना दिसणार आहे. अपूर्वा रुचिराला सांगताना दिसणार आहे, "त्या परिस्थितीमध्ये सुद्धा मी तुला सांगते कि आपलं हे ठरलं होतं कोणी जिंकू दे अक्षय किंवा रोहित आपणं दोघांच्या आनंदात क्लिअर आहोत... मला काळजी तुझी वाटतं होती कारण तू नॉमिनेटेड आहेस. ही तुझी सिद्ध करण्याची संधी होती, हे देखील मी तुला पोट तिडकीने सांगत होते. आता हे सगळं करत असताना, जर आज मी रोहितच्या बाजूने खेळते आहे तर मी अक्षयच्या बाजूने नाही बोलणार मी अशी मुलगी आहे.'
"मी कट्टर आहे" आणि याच मुद्द्यावरून माझं आणि समृद्धीचं वाजलं होतं. कारणं मला तेजस्विनीने जिंकावं (पहिले कॅप्टन्सी कार्य) असं वाटतं होतं, आणि जे चुगलीमध्ये आलं देखील. मी तेजूच्या बाजूने खेळतं होते आणि म्हणून समृद्धी भडकली होती. मी नाही biased खेळू शकतं. मी जर एका व्यक्तीला पाठिंबा देत असेन तर मी त्याच्याच नावाने बोलबाला करेन". आता या सगळ्यावर रुचिरा आणि समृद्धीचे काय म्हणणे आहे बघूया आजच्या भागामध्ये.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: