Entertainment News Live Updates 17 November : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE
Background
Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
Surya Marathi Movie: ‘सुर्या’ च्या विरोधात खलनायकांची फौज
चित्रपटात मुख्य नायक - नायिकेइतकाच नकारात्मक भूमिका साकारणाऱ्या कलाकारांचाही महत्त्वाचा वाटा असतो. नायक खलनायकाची जुगलबंदी प्रेक्षकांसाठी नेहमीच मनोरंजक असते. आपल्या प्रभावी अदाकारीतून नायकाला जबर आव्हान देणारा खलनायक प्रेक्षकांनाही पहायला आवडतो. आगामी ‘सुर्या’ (Surya) या मराठी चित्रपटात मराठी-हिंदीतील सशक्त अभिनेत्यांची फौज आपल्याला खलनायकाच्या रुपात दिसणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटाच्या नायकाचा सामना या सर्व खलनायकांशी होणार आहे. ‘सुर्या’ या चित्रपटात अखिलेन्द्र मिश्रा, हेमंत बिर्जे, हॅरी जोश, उदय टिकेकर, गणेश यादव ही मंडळी आपल्या खलप्रवृत्तीतून ‘सुर्या’ला बेजार करताना दिसतील. प्रसाद मंगेश हा युवा अभिनेता आपल्याला ‘सुर्या’च्या डॅशिंग भूमिकेत पहायला मिळणार आहे.
'त्या राक्षसाला...' श्रद्धा हत्याकांड प्रकरणावर स्वरा भास्करची प्रतिक्रिया
श्रद्धा वालकरच्या (Shraddha Murder Case) हत्याकांड प्रकरणानं संपूर्ण देश हदरला आहे. दिल्लीतील (Delhi) मेहरौली भागात श्रद्धा वालकर नावाच्या तरुणीची तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबनं गळा दाबून हत्या केली. आफताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे तब्बल 35 तुकडे केले. हे तुकडे त्यानं फ्रीजमध्ये ठेवले. आफताबनं केलेल्या या अमानुष हत्येवर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. नुकतच अभिनेत्री स्वरा भास्करनं (Swara Bhasker) एक ट्वीट शेअर केलं आहे. या ट्वीटमध्ये तिनं, हे प्रकरण किती भयानक, भीषण आणि दुःखद आहे.' असं लिहिलं आहे.
Mi Pan Nathuram Godsech Boltoy : 'मी पण नथुराम गोडसेच बोलतोय' नाटक वादात; नाट्यप्रयोग सुरू असताना सावरकरप्रेमींनी घातला गोंधळ
Mi Pan Nathuram Godsech Boltoy Marathi Play : अहमदनगरच्या माऊली सभागृहात सुरू असलेल्या 61व्या हौशी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान गोंधळ झाल्याची घटना समोर आली. ‘मी पण नथुराम गोडसेच बोलतोय’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान हा गोंधळ झाला आहे. या नाटकात दिग्दर्शक आणि कलाकारांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चुकीचा इतिहास मांडल्याचा आरोप सावरकरप्रेमींनी केला आहे.
Ekdam Kadak Trailer: 'एकदम कडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज; 2 डिसेंबरला चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस
Ekdam Kadak Trailer: 'एकदम कडक' (Ekdam Kadak) चित्रपटाच्या टिझरने साऱ्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं आणि आता चित्रपटाच्या ट्रेलरने चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे. "प्रेम द्यायचं असतं, प्रेम घ्यायचं असतं" पासून 'प्रेम बीम काय नाय बरं का' या डायलॉग पर्यंत पोहोचण्यासाठी कलाकारांनी घातलेला धुडगूस पाहणं रंजक ठरणार आहे. एकदम कडक म्हणत तरुणाईला भुरळ पाडणाऱ्या लक्षणीय अभिनेत्रींना तरुण कलाकारांचा घोळका तोडीस तोड देतोय हे ट्रेलरमध्ये स्पष्ट दिसतंय. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत एकदम कडक चित्रपटातून अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने रुपेरी पडद्यावर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाले आहेत. येत्या 2 डिसेंबरला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार आहे.
India Lockdown Trailer Out Now: 'इंडिया लॉकडाऊन' चा ट्रेलर रिलीज; सई ताम्हणकर, प्रतीक बब्बर प्रमुख भूमिकेत
India Lockdown Trailer Out Now: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भंडारकर (Madhur Bhandarkar) यांच्या 'इंडिया लॉकडाउन' (India Lockdown) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. कोरोना लॉकडाऊन दरम्यान अस्थाव्यस्थ झालेलं जनजीवन आणि त्यामुळे उद्भवलेली भीषण परिस्थिती, यासंदर्भातील वास्तव हे 'इंडिया लॉकडाउन' या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट ओटीटीवरुन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
पाहा ट्रेलर
Jeta Trailer: 'जेता' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; 25 नोव्हेंबर रोजी चित्रपट होणार रिलीज
Jeta: असंख्य संकटांवर मात करत अनेक वादळांना कवेत घेत प्रचंड जिद्दीच्या बळावर विजयी होणाऱ्या विजेत्याची कहाणी सांगणारा 'जेता' (Jeta) हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच 'जेता'चा उत्साहवर्धक ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या ट्रेलरचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 25 नोव्हेंबर रोजी 'जेता' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
Prajaktta Mali: 'तेरी झुकी नजर...'; प्राजक्ता माळीच्या फोटोवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा
Prajaktta Mali: प्राजक्ता माळीनं (Prajaktta Mali) नुकतेच तिच्या खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत.प्राजक्तानं निळ्या रंगाचा ड्रेस, हिरव्या आणि निळ्या रंगाची ओढणी आणि स्टोनची ज्वेलरी अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केले आहेत. प्राजक्ताच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
View this post on Instagram
Tamanna Bhatia: तमन्ना भाटिया बिझनेसमनशी करणार लग्न? अभिनेत्रीनं व्हिडीओ शेअर करुन दिलं उत्तर
Tamanna Bhatia: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamanna Bhatia) ही तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. तमन्ना हा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. तपन्ना ही एका मुंबईतील बिझनेसमनशी लग्न करणार आहे, अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाच्या चर्चेवर आता तमन्नानं मौन सोडलं आहे. तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन लग्नाबाबत सांगितलं. 'हा माझा बिझनेसमन पती आहे.' अशी पोस्ट तमन्नानं सोशल मीडियावर शेअर केली आहे.