Entertainment News Live Updates 17 July : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 17 Jul 2022 02:31 PM
Masai Mara Trip: रणबीरने आलियाला ‘या’ सुंदर ठिकाणी केला होता लग्नासाठी प्रपोज! करण जोहरच्या शोमध्ये उलगडलं रहस्य...

Masai Mara Trip: बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरचा (Karan Johar) बहुचर्चित शो 'कॉफी विथ करण'चा (Koffee With Karan) नवीन सीझन सुरू झाला आहे. करण जोहरच्या या शोमध्ये अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या शोच्या सेटवर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गुपितेही उघड केली. करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7'मध्ये आलिया भट्टने तिच्या आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) रोमान्स आणि लग्नाशी संबंधित अनेक गुपिते उघड केली होती. यावेळी आलियाने तिच्या प्रपोज विषयी देखील अनेक गोष्टींचा खुलासा केला.


वाचा संपूर्ण बातमी

Kesariya Song Released: आलिया-रणबीरच्या प्रेमाची कहाणी, ‘ब्रह्मास्त्र’चं ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Kesariya Song Released: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांचा 'ब्रह्मास्त्र'(Brahmastra) हा चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत आहे. 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटासोबतच त्याच्या 'केसरिया' (Kesariya) गाण्याचीही चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. या गाण्याची छोटीशी झलक या आधीच रिलीज करण्यात आली होती. याला चाहत्यांचा आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता. लोकांना या गाण्याची असलेली क्रेझ पाहून आता हे संपूर्ण गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याची झलक पाहिल्यानंतर हे गाणे लवकरात लवकर रिलीज करावे अशी मागणी प्रेक्षक करत होते.


 


ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाची कथा, ‘मी धामापूर तलाव बोलतोय’ लघुपटाचे मुंबईत सादरीकरण

Mi Dhamapur Talav Boltoy : 'उरला -सुरला धामापूरच्या तळ्यात' ही तळकोकणातली प्रसिद्ध म्हण सर्वांनाच माहिती आहे. विपुल निसर्ग-संपदा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धामापूर तलावाने आजवर अनेक जीवांना आपल्या कुशीत आसरा दिला आहे आणि कित्येक शतकांपासून कोकणात मानाचा दर्जा मिळवला आहे. जुन्या-जाणत्या माणसांच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून आज धामापूर तलावाच्या रचनेकडे बघितले जाते. 2020मध्ये 'जागतिक वारसा सिंचन स्थळ' हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळवणारा धामापूर तलाव हा महाराष्ट्रातील पहिला आणि एकमेव तलाव आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Sushmita Sen : डेटिंगच्या चर्चेदरम्यान सुष्मिता सेनने पुन्हा शेअर केली एक पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली...

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या प्रत्येकजण फक्त तिच्याबद्दलच बोलत आहे. जेव्हापासून या अभिनेत्रीचे नाव बिझनेसमन ललित मोदीसोबत (Lalit Modi) जोडले गेलेय, तेव्हापासून ती आणखीनच चर्चेत आली आहे. आता अभिनेत्रीने माजी आयपीएल चेअरमन ललित मोदींसोबत मालदीवला सुट्टी घेतल्यानंतर काही दिवसांनी या ट्रीपमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने एक हटके कॅप्शन देखील दिले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Happy Birthday Zarina Wahab : ‘चित्तचोर’मधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री जरीना वहाब!

Zarina Wahab Birthday : बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री जरीना वहाब (Zarina Wahab) आज (17 जुलै) आपला 63वा वाढदिवस साजरा करत आहे. जरीना वहाब बॉलिवूडच्या अशा सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी मोठ्या पडद्यावर तसेच छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. 17 जुलै 1959 रोजी विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश येथे जरीना वहाब यांचा जन्म झाला. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेल्या जरीना यांची हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त उर्दू आणि तेलगू भाषांवर चांगली पकड आहे.


वाचा संपूर्ण बातमी

Rangbaaz 3 : ‘रंगबाज 3’मध्ये दिसणार विनीत कुमार सिंहची रंगबाजी, भूमिकेबद्दल सांगताना अभिनेता म्हणतो...

Rangbaaz 3 : अभिनेता विनीत कुमार सिंह (Vineet Kumar Singh) हा असाच एक अभिनेता आहे, ज्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मनोरंजन क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे. 'मुक्काबाज' चित्रपटात बॉक्सरची भूमिका साकारून त्याने लोकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आणि नंतर आपल्या वेगवेगळ्या अवतारांनी लोकांना चकित करत राहिला. मग, तो ‘बेताल’मधील त्याचा लष्करी अधिकाऱ्याचा अवतार असो किंवा ‘गुंजन सक्सेना’मधील वायुसेनेचा पायलट असो. त्याने आपल्या कामगिरीने स्वतःला सिद्ध केले आहे.


वाचा संपूर्ण बातमी

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Allu Arjun Pushpa 2 : 'पुष्पा : द रुल'साठी अल्लू अर्जुनने वाढवली फी; भाग 1च्या दुप्पट किंमतीत करणार काम


साउथ सिनेसृष्टीतील दिग्गज अल्लू अर्जुन (Allu Arjun) उर्फ ​​पुष्पाची (Pushpa) क्रेझ सध्या खूप वाढली आहे. पुष्पा पार्ट वनच्या (Pushpa Part 1) प्रचंड यशानंतर निर्माते पुष्पा : द रुलच्या (Pushpa : The Rule) तयारीत व्यस्त आहेत. दरम्यान पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनने पुष्पा पार्ट 2 साठी फी वाढवल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. असे सांगितले जात आहे की रील लाइफ पुष्पा आता पहिल्या भागाच्या दुप्पट किमतीत पुष्पा 2 चित्रपटात काम करणार आहे.


विशेष म्हणजे पुष्पा : द राइज (Pushpa : The Rise) हा अल्लू अर्जुनच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा सुपरहिट चित्रपट ठरला आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाने थिएटरमध्ये प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. यासोबतच अल्लूच्या दमदार अभिनयाचेही सर्वांनी कौतुक केले आहे. अशा स्थितीत अल्लु पुष्पा : द रुलची फी वाढविणे साहजिक होते. असंच काहीसं घडलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुष्पा 1 च्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या भाग 2 साठी 85 कोटी रुपये शुल्क आकारले आहे. रिपोर्ट्सनुसार, अल्लूने पुष्पाच्या पहिल्या भागासाठी 30-40 कोटी रुपये घेतले होते. अशा परिस्थितीत अल्लू अर्जुन पुष्पा 2 साठी दुप्पट फी घेणार आहे.


पुष्पा 1 च्या भरघोस यशानंतर निर्माते ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये पुष्पा : द रुल म्हणजेच भाग 2 चे शूटिंग सुरू करू शकतात. पुष्पा पार्ट 2 मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) पुन्हा एकदा साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनसोबत धमाल करताना दिसणार आहे. अल्लू अर्जुनच्या पुष्पाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केल्याची माहिती आहे. यासोबतच प्रेक्षकांना आतापासूनच पुष्पाच्या सिक्वेलची उत्सुकता लागली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.