Sushmita Sen : डेटिंगच्या चर्चेदरम्यान सुष्मिता सेनने पुन्हा शेअर केली एक पोस्ट, बोल्ड फोटो शेअर करत म्हणाली...
Sushmita Sen : अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ललित मोदींनी नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते सुष्मिताला डेट करत आहेत.

Sushmita Sen : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या प्रत्येकजण फक्त तिच्याबद्दलच बोलत आहे. जेव्हापासून या अभिनेत्रीचे नाव बिझनेसमन ललित मोदीसोबत (Lalit Modi) जोडले गेलेय, तेव्हापासून ती आणखीनच चर्चेत आली आहे. आता अभिनेत्रीने माजी आयपीएल चेअरमन ललित मोदींसोबत मालदीवला सुट्टी घेतल्यानंतर काही दिवसांनी या ट्रीपमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने एक हटके कॅप्शन देखील दिले आहे.
अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ललित मोदींनी नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते सुष्मिताला डेट करत आहेत. ललित यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुष्मितासोबतचे काही फोटोही शेअर केले होते, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता सुष्मिताने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
लेकीला दिले क्रेडिट!
आता सुष्मिता समुद्र किनारी उभी राहूब शांतता अनुभवत आहे. नवीन फोटो शेअर करत सुष्मिताने लिहिले की, ‘किती शांतता आहे. हे शांतता आणि निसर्ग सौंदर्याची ताकद आहे...’ तिने या फोटोचे क्रेडिट तिची मुलगी अलिशा सेन हिला दिले आहे. बोल्ड अंदाजात उभ्या असलेल्या सुष्मिताच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केले आहे.
पाहा पोस्ट :
या फोटोमध्ये सुष्मिता सेन व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. फोटोत सुष्मिता फोटो पोज देताना दिसत आहे आणि तिने पांढऱ्या रंगाचा श्रग घातला आहे. सुष्मिताने या फोटोमध्ये लोकेशन दिलेले नाही, पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हा फोटो मालदीवचा आहे.
नेटकऱ्यांच्या कमेंट्स
सोशल मीडिया यूजर्स सुष्मिताच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. एकीकडे सुष्मिताचे चाहते अभिनेत्रीचे खूप कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे ललित मोदींचा देखील कमेंट सेक्शनमध्ये उल्लेख करत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्सने विचारले की, ललित मोदी आणि तुम्ही खरंच एकत्र आहात का? तर एकाने विचारले की, दोघे किती दिवसांपासून डेटिंग करत आहात? त्याचबरोबर काही सोशल मीडिया यूजर्सनी ललित-सुष्मिताला #lalmita म्हणायला सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या
ब्रेकअप के बाद! सुष्मिता सेन पुन्हा एकदा प्रेमात, ललीत मोदींनी पोस्ट केले रोमँटिक फोटो
Lalit Modi Biopic: 'थालावी' आणि '83'चे निर्माता विष्णु वर्धान इंदुरी आता ललित मोदींवर चित्रपट बनवणार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
