Entertainment News Live Updates 17 April : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 17 Apr 2023 02:18 PM
Aai Kuthe Kay Karte: आशुतोष घेतोय अरुंधतीची काळजी; 'आई कुठे काय करते !'च्या प्रोमोनं वेधलं लक्ष

Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. नुकताच या मालिकेच्या आगामी एपिसोडचा एक प्रोमो रिलीज झाला आहे. या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


पाहा प्रोमो:



Pooja Hegde Troll: इफ्तार पार्टीसाठी पूजा हेगडेनं केलेल्या लूकवर भडकले नेटकरी; म्हणाले, 'ही डान्स पार्टी नाही...'

Baba Siddique:  काल (16 एप्रिल) मुंबईतील (Mumbai) ताज लँड्स हॉटेलमध्ये बाबा सिद्दीकी (Baba Siddique)  आणि त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनी इफ्तार पार्टी आयोजित केली होती.या पार्टीला मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या पार्टीमध्ये अभिनेत्री पूजा हेगडेनं (Pooja Hegde) खास लूकमध्ये हजेरी लावली.  इफ्तार पार्टीतील पूजाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. इफ्तार पार्टीसाठी पूजानं केलेल्या लूकला अनेकांनी ट्रोल केलं आहे. 



Mahima Chaudhry Mother Passed Away: अभिनेत्री महिमा चौधरीवर कोसळला दु:खाचा डोंगर; आईचे झाले निधन

Mahima Chaudhry Mother Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीच्या (Mahima Chaudhry) आईचे निधन झाले आहे. महिमा चौधरीच्या आईचे तीन ते चार दिवसांपूर्वी निधन झाल्याची, माहिती समोर आली आहे. महिमा आणि माहिमाची मुलगी आरियाना यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महिमा आणि तिच्या मुलीसाठी हा खूप कठीण काळ आहे.


एका रिपोर्टनुसार, महिमाची आई काही महिन्यांपासून आजारी होती. अभिनेत्री महिमा आणि चौधरी कुटुंबानं  अजून याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.  महिमा तिच्या आईसोबतचे तसेच तिच्या कुटुंबाचे फोटो मीडियावर  फोटो शेअर करत असते.



800 Poster: '800' चा फर्स्ट लूक रिलीज; 'हा' अभिनेता मुथय्या मुरलीधरनच्या भूमिकेत

800 Poster:  श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) हा एक स्पिन‌र म्हणून जगभरात ओळखला जातो.  मुथय्याने आपल्या करिअरमध्ये एकूण 16 विश्वविक्रम केले आहेत.   2002 मध्ये, मुरलीधरनला विस्डेनच्या क्रिकेटर्स अल्मानॅकने जगातील सर्वोत्तम कसोटी सामना गोलंदाज म्हणून घोषित केले. 2017 मध्ये, मुरलीधरन हा ICC हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट होणारा पहिला श्रीलंकेचा गोलंदाज ठरला. मुरलीधरनचा आज (17 एप्रिल) वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त 800 या चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट मुथय्या मुरलीधरनच्या आयुष्यावर आधारित असणार आहे.



R Madhavan Son Gets Medals For India: कौतुकास्पद! आर माधवनच्या लेकानं जिंकली पाच सुवर्णपदकं, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

R Madhavan Son Gets Medals For India:  अभिनेता आर. माधवन (R Madhavan) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. आर. माधवनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.  आर. माधवन हा सध्या त्याच्या मुलामुळे चर्चेत आहे. आर माधवन हा आपल्या मुलाला नेहमी सपोर्ट करतो. त्याचा मुलगा वेदांत हा चित्रपटसृष्टीपासून दूर राहून क्रीडा क्षेत्रात आपल्या कौशल्याने देशाचे आणि आपल्या वडिलांचे नाव परदेशात उंचावत आहे. वेदांत हा स्विमर आहे. वेदांतनं एका स्पर्धेत पाच सुवर्णपदकं पटकावली आहेत. याबाबत आर. माधवननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली आहे. 



Akhil Bhartiya Marathi Natya Parishad : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले विजयी

Akhil Bhartiya Marathi Natya Parishad :  अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या (Akhil Bhartiya Marathi Natya Parishad) निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर पहाटे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत  प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी ठरले आहेत. 

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Madhurani Prabhulkar: आई कुठे काय करते मालिकेतील मधुराणी प्रभुलकर यांनी शेअर केला खास व्हिडीओ; म्हणाल्या, 'मोस्ट फेव्हरेट...'



Aai Kuthe Kay Karteआई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला आणि कथानकाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आई कुठे काय करते मालिकेमध्ये अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) या अरुंधती ही भूमिका साकारतात. नुकतीच मधुराणी यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले.


Tuzech Mi Geet Gaat Aahe: 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत नवा ट्वीस्ट; नेटकरी म्हणाले, 'चला आता तरी ...'



 Tuzech Mi Geet Gaat Aahe:  छोट्या पडद्यावरील तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe)  मालिकेत लवकरच एक नवा ट्वीस्ट. मल्हार आणि स्वरा यांच्या आयुष्यात लवकरच मंजुळाची एन्ट्री होणार आहे. तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मंजुळा ही भूमिका अभिनेत्री उर्मिला कानेटकर  ही साकारणार आहे. नुकताच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये स्वरा उर्फ स्वराज आणि मंजुळा हे दिसत आहेत. या प्रोमोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.


Mrunmayee Deshpande : 'ढाप अजून...'; मृण्मयी देशपांडेच्या फोटोला गौतमीनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष



Mrunmayee Deshpande : मृण्मयीनं तिचा एक सेल्फी सोशल मीडियावर शेअर केला.  'मी पोचले महाबळेश्वर ला...' असं कॅप्शन मृण्मयीनं तिच्या फोटोला दिलं.  या फोटोमध्ये मृण्मयी ही नो मेक-अप लूकमध्ये दिसत आहे. मृण्मयीच्या फोटोला गौतमीनं कमेंट केली, 'ढाप अजून माझे कपडे आणि म्हण मी गेल्या दोन वर्षात एक नवीन कपडा नाही घेतला.' गौतमीच्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.