Entertainment News Live Updates 15 February : पठाणनं 21व्या दिवशी केली एवढी कमाई

Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Feb 2023 05:28 PM
Shiv Thakare Amravati: फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर; अमरावतीकरांनी केलं शिव ठाकरेचं जंगी स्वागत

Shiv Thakare Amravati:  छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) चा काही दिवसांपूर्वी ग्रँड फिनाले पार पडला. या कार्यक्रमाचा एमसी स्टॅन (MC Stan) हा विजेता ठरला. तर शिव ठाकरे (Shiv Thakarey) हा बिग बॉस-16 चा रनरअप ठरला. शिव ठाकरे हा बिग बॉस-16 चा विजेता ठरावा, अशी त्याच्या चाहत्यांची इच्छा होती. पण शिवच्या मंडली ग्रुपचा एमसी स्टॅन जिंकल्यानं त्याचे चाहते नाराज झाले नाहीत. आता शिव त्याच्या घरी म्हणजेच अमरावती (Amravati) येथे पोहोचला. अमरावतीकरांनी शिवचं जंगी स्वागत केलं आहे. 



Dharmendra: धर्मेंद्र झाले सुफी संत; 'ताज रॉयल ब्लड' सीरिजमधील लूकचा फोटो केला शेअर

Dharmendra Taj Royal Blood Series: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) हे त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. धर्मेंद हे विविध भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. आता त्यांची नवी वेब सीरिज (Web Series) ओटीटीवर (OTT)  रिलीज होणार आहे. या सीरिजचं नाव 'ताज रॉयल ब्लड' (Taj Royal Blood) असं आहे. या सीरिजमध्ये धर्मेंद्र हे सलीम चिश्ती नावाच्या सुफी संतांची भूमिका साकारणार आहेत. धर्मेंद्र यांनी त्यांच्या या सीरिजमधील लूकचा फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. 





Prateik Babbar: स्मिता पाटीलचा लेक पुन्हा पडलाय प्रेमात; शेअर केला 'या' अभिनेत्रीसोबतचा फोटो, पोस्टनं वेधलं लक्ष

Prateik Babbar: अभिनेता प्रतिक बब्बर (Prateik Babbar) हा वेगवेगळ्या चित्रपटांमधून आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो. प्रतिक हा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) ला प्रतिकनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून प्रतिकनं त्याच्या रिलेशनशिपची माहिती चाहत्यांना दिली. त्याच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.



Pathaan Box Office Collection: व्हॅलेंटाईन-डे 'पठाण'साठी ठरला खास; 21व्या दिवशी केली एवढी कमाई

Pathaan Box office Collection: अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सनं सजलेला पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता या चित्रपटानं 'व्हॅलेंटाईन-डे' (Valentine's Day) ला (14 फेब्रुवारी) कोट्यवधींची कमाई केली. हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होईल असा अंदाज लावला जात आहे. जाणून घ्या 21 व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...


सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ahmednagar Film Festival: अहमदनगरमध्ये प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाला सुरुवात; 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान होणार महोत्सव

Ahmednagar Film Festival: अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये प्रतिबिंब चित्रपट महोत्सवाचा नुकताच शुभारंभ झाला आहे, चित्रपट अभिनेते ललित प्रभाकर, भाऊ शिंदे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला. 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान राजर्षी शाहू सभागृह हा चित्रपट महोत्सव संपन्न होईल. यंदा या महोत्सवाचे हे 16 वे वर्षे आहे. यामध्ये चित्रपट रसिकांना जगभरातील दर्जेदार चित्रपट विनामूल्य पाहता येणार आहेत, तसेच राष्ट्रीय लघुपट आणि माहितीपट स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे, यावेळी अहमदनगरमध्ये प्रथमच होणारा प्रतिबिंब फोटो फेस्टिव्हल हे यंदाचे आकर्षण आहे. फोटो फेस्टिव्हलमध्ये 140 छायाचित्रे निवडण्यात आलीये, तर प्रतिबिंब चित्रपट महोत्सवात 43 चित्रपट दाखवले जाणार आहेत.दरम्यान नगर सारख्या ग्रामीण पट्ट्यात शिकणारे विद्यार्थी चित्रपट क्षेत्रात चांगले काम करत असल्याचे अभिनेता ललित प्रभाकर यांनी म्हंटलंय. त्यांचा येऊ घातलेल्या टर्री चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग नगरमध्येच झाले आहे.

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Kohli's Pathaan Step Viral: विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस; म्हणाला, 'यांच्याकडून शिकावं लागेल'


Kohli's Pathaan Step Viral: अभिनेता  शाहरुख खान (Shah Rukh Khan)  हा त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.  बॉलिवूडचा बादशाह अशी शाहरुखची ओळख आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. काही दिवसांपूर्वी त्याचा पठाण (Pathaan) हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता काही क्रिकेटर्सला देखील पठाणमधील गाण्यांची भूरळ पडली आहे, असं दिसत आहे. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काही क्रिकेटर्स डान्स करताना दिसत आहेत. 


Shah Rukh Khan Ask SRK: 'जेवण केलं का?', 'पठाणच्या सेटवर अबराम काय करत होता?'; चाहत्यांचे मजेशीर प्रश्न; शाहरुखच्या उत्तरांनी वेधलं लक्ष


Shahrukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा त्याच्या पठाण (Pathaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. शाहरुखच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड्स तोडले. शाहरुख गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांनी ट्विटरवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत आहे. आता आस्क एस आर के (#AskSRK) हा हॅश टॅगचा वापर करुन काही चाहत्यांनी शाहरुखला मजेशीर प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं उत्तरं दिली आहे. 


Madhuri Pawar : महेश मांजरेकरांच्या 'वेडात वीर दौडले सात' ऐतिहासिक सिनेमात झळकणार माधुरी पवार!








Madhuri Pawar On Vedat Marathe Veer Daudle Saat : 'महाराष्ट्राची महाअप्सरा' अशी ओळख असलेली अभिनेत्री, नृत्यांगना माधुरी पवारने (Madhuri Pawar) आपल्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. नृत्या बरोबरच छोट्या पडद्यावरील 'वाहिनीसाहेब' ही व्यक्तिरेखा असो की 'रानबाजार' वेबसिरीज मधील  राजकारणातील एक महत्वकांशी, करारी प्रेरणा सायाजीराव पाटील सानेची भूमिका असो माधुरी पवारने आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षकांची दाद मिळविली आहे. 






 






 


















 











- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.