Pathaan Box Office Collection: व्हॅलेंटाईन-डे 'पठाण'साठी ठरला खास; 21व्या दिवशी केली एवढी कमाई
अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता या चित्रपटानं 'व्हॅलेंटाईन-डे' (Valentine's Day) ला (14 फेब्रुवारी) कोट्यवधींची कमाई केली.
Pathaan Box office Collection: अॅक्शन, ड्रामा आणि सस्पेन्सनं सजलेला पठाण (Pathaan) हा चित्रपट गेल्या काही दिवसापासून भारतातीलच नाही तर जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करत आहे. आता या चित्रपटानं 'व्हॅलेंटाईन-डे' (Valentine's Day) ला (14 फेब्रुवारी) कोट्यवधींची कमाई केली. हा चित्रपट 500 कोटींच्या क्लबमध्ये लवकरच सामील होईल असा अंदाज लावला जात आहे. जाणून घ्या 21 व्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
पठाणनं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 55 कोटींची कमाई करुन बॉक्स ऑफिसवर ग्रँड ओपनिंग केले. आता हा चित्रपट रिलीज होऊन 21 दिवस झाले आहेत. तरी देखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई करत आहे. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, 21व्या दिवशी म्हणजेच, मंगळवारी (14 फेब्रुवारी) या चित्रपटानं 5.65 कोटींची कमाई केली आहे. आता या चित्रपटाची एकूण कमाई 498.90 एवढी झाली आहे. 500 कोटींच्या क्लबमध्ये हा चित्रपट सामील होईल का? या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच शाहरुखच्या चाहत्यांना मिळेल. जगभरातही या चित्रपटाची कमाई 1000 कोटींचा टप्पा गाठेल, असं म्हटलं जात आहे.
पठाण चित्रपट हिट होण्यामागे ही आहेत कारणे?
पठाण हा शाहरुख खानचा चित्रपट हिट होण्यामागे अनेक कारणे आहेत. पण शाहरुखचं रुपेरी पडद्यावर पुनरागमन, पठाणमधील बेशरम रंग गाण्याचा वाद आणि पठाणमधील सलमानचा कॅमिओ या कारणांमुळे पठाण हा चित्रपट हिट ठरला, असं काही समीक्षकांसह चाहत्यांचं म्हणणं आहे.
पठाण चित्रपट हा आदित्य चोप्राच्या (Aditya Chopra) स्पाय युनिव्हर्समधील एक चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुखसोबतच दीपिका पादुकोण (Deepika Padukone), जॉन अब्राहम (John Abraham), आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया या कलाकरांनी मुख्य भूमिका साकारली आहे. पठाणमधील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील बेशरम रंग आणि झुमे जो पठाण या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले.
शाहरुखचे आगामी चित्रपट
पठाणच्या यशानंतर शाहरुखचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटांची वाट बघत आहेत. शाहरुखचे डंकी आणि जवान हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
महत्वाच्या इतर बातम्या :