Entertainment News Live Updates 15 December : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 15 Dec 2022 03:11 PM
Mrunmayee Deshpande : 'शाब्बास सुनबाई' मालिकेत होणार मृण्मयी देशपांडेची एन्ट्री

Mrunmayee Deshpande On Shabbas Sunbai : लग्नानंतर स्वतःच्या संसारात अडकून पडल्यावर आपली स्वप्नं, स्वप्नंच  राहून जातात. लग्नानंतर बऱ्याचजणी चूल आणि मूल यातच अडकून राहतात. पण अशातही मार्ग काढून आपली स्वप्नं पूर्ण करणाऱ्या प्रत्येकीची गोष्ट म्हणजे 'शाब्बास सुनबाई' (Shabbas Sunbai) ही मालिका. आता या मालिकेत मृण्मयी देशपांडेची (Mrunmayee Deshpande) एन्ट्री होणार आहे.





Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या याचिकेशी संबंधित कागदपत्रे गहाळ

Mamta Kulkarni : अभिनेत्री ममता कुलकर्णीने (Mamta Kulkarni) दाखल केलेल्या याचिके संबंधित कागदपत्रे गहाळ झाली आहेत. कागदपत्रांअभावी सुनावणी होत नसल्यानं मुंबई उच्च न्यायालयाकडून (Bombay  High Court) नाराजी व्यक्त केली आहे. आता पुढील सुनावणी दरम्यान कागदपत्रे सादर करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत.

Parag Bedekar : मनोरंजनसृष्टीवर शोककळा; 'आभाळमाया' मालिकेतील अभिनेत्याचं निधन

Parag Bedekar : अभिनेते पराग बेडेकर (Parag Bedekar) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांनी मराठी मालिका आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. आता त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. 

Avatar 2 : जाणून घ्या 'अवतार : द वे ऑफ वॉटर'बद्दल सर्वकाही...

Avatar 2 Advance Booking : सिनेप्रेमींसाठी सध्या सुगीचे दिवस आहेत. सिने-दिगर्शक जेम्स कॅमेरॉन (James Cameron) तेरा वर्षांनंतर सुपरहिट 'अवतार'चा (Avatar) दुसरा भाग घेवून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. जाणून घ्या या सिनेमासंबंधित महत्त्वाच्या गोष्टी...


Avatar 2 : रिलीज डेट, स्टारकास्ट, बजेट; जाणून घ्या 'अवतार : द वे ऑफ वॉटर'बद्दल सर्वकाही...

Genelia Deshmukh : 'रंग माझा वेगळा' मालिकेत जिनिलिया देशमुखची एन्ट्री!

Genelia Deshmukh On Rang Maza Vegla : अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) गेल्या काही दिवसांपासून 'वेड' (Ved) सिनेमामुळे चर्चेत आहेत. आता या सिनेमाच्या प्रमोशनसाठी जिनिलिया टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या 'रंग माझा वेगळा' (Rang Maza Vegla) या मालिकेत एन्ट्री करणार आहे. 

Shriya Pilgaonkar : ताजा खबर! सचिन पिळगावकरांची लेक साकारणार सेक्स वर्करची भूमिका

Shriya Pilgaonkar : 'क्रॅकडाऊन' (Crackdown),'द ब्रोकन न्यूज' (The Broken News) आणि गिल्टी माइंड्स' (Guilty Minds) अशा दमदार वेबसीरिजच्या माध्यमातून सचिन पिळगावकरांची (Sachin Pilgaonkar) लेक अर्थात श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) घराघरांत पोहोचली आहे. आता पुन्हा एकदा श्रिया 'ताजा खबर' या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. 


 





Usha Mangeshkar Birthday : शेकडो सुमधुर गाणी गाणाऱ्या उषा मंगेशकर!

Usha Mangeshkar : पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर (Usha Mangeshkar) यांचा आज जन्मदिन आहे. त्या आज त्यांचा 87 वा वाढदिवस साजरा करत आहेत. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची धाकटी बहीण असलेल्या उषा मंगेशकर यांचा जन्म 15 डिसेंबर 1935 रोजी मध्य प्रदेशात झाला.


Usha Mangeshkar Birthday : 'या' गाण्यामुळे उषा मंगेशकर रातोरात स्टार बनल्या; जाणून घ्या अलौकिक संगीत प्रवास

पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


Mahesh Manjrekar : दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल


Mahesh Manjrekar : मराठीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे महेश मांजरेकर (Marathi director Mahesh Manjrekar) हे अनेक कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतात. नुकताच त्यांच्या 'वेडात मराठी वीर दौडले सात' (Vedat Marathi Veer Daudale Saat Movie) या चित्रपटामुळे ते चर्चेत होते. मात्र, आता महेश मांजरेकर पुन्हा अडचणीत आले आहेत. पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावात झालेल्या अपघातामुळे त्यांच्या अडचणीत वाढ निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हर हर महादेव चित्रपट प्रदर्शनासंदर्भात झी मराठीचा मोठा निर्णय


Har Har Mahadev:    गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा हर हर महादेव (Har Har Mahadev) हा  चित्रपट झी मराठी वाहिनीवर 18 डिसेंबर रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपट प्रदर्शनास संभाजी ब्रिगेडसह (Sambhaji Brigade) माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Swarajya Sanghatana) आणि राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र देखील संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिले होते. आता झी मराठीनं या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपटातील वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा निर्णय झी मराठीनं घेतला असल्याचं संभाजी ब्रिगेडकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.   


गुगलवर सर्वाधिक सर्च केला जाणारा शायर, जॉन एलिया!


Jaun Elia Birth Anniversary: ''होय, मी अमरोहाचा (उत्तर प्रदेश) आहे, भारताचा आहे आणि नेहमीच भारताचाच राहिलो. मलिकजादा मंजूर अहमद यांना माहीत आहे की, मी पाकिस्तानातून भारतात आलो तेव्हा अमरोहाला पोहोचल्यानंतर त्या जमिनीवर डोकं टेकवून, त्या मातीतच झोपलो. मी भारताचा होऊ शकलो असतो आणि होऊ शकतो. देशाचे दोन तुकडे झाले आहेत, यावर बरेच दिवस माझा विश्वास बसत नव्हता. मी या फाळणीच्या विरोधात होतो. अशा प्रकारच्या विभाजनाला माझा विरोध होता. पण मला जावं लागलं. पुन्हा यायचे होते पण येऊ शकलो नाही'', हे शब्द आहेत भारतात जन्मलेल्या आणि पाकिस्तानात मृत्यू झालेले प्रसिद्ध शायर जॉन एलिया (Jaun Elia) यांचे. जॉन हयात असताना जितके आपल्या शायरीसाठी प्रसिद्ध होते, तितकेच ते आजही आहेत. आज गुगलवर सर्वाधिक सर्च केलं जाणाऱ्या शायरांपैकी ते एक आहेत. आजच्या तरुणांमध्ये जॉन हे खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत. उर्दूच्या अनेक बड्या शायरांचं म्हणणं आहे की, लोक आज जितकं 'मिर्झा गालिब' (Mirza Ghalib) यांना वाचतात, तितकेच ते जॉन एलिया (Jaun Elia) यांनाही वाचतात.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.